
पहलगाम हल्ल्यात थोडक्यात बचावले कृष्णा आणि साक्षी लोलगे यांनी थरार सांगितला. पहलगाम व्हँलीतून खाली उतरत असतांना कानावर गोळ्यांचा आवाज पडला. तेव्हा पहलगाम व्हँलीत जवळपास वेगवेगळ्या ठिकाणी 3 हजार पर्यटक असल्याचा दावा लोलगे कुटुंबीयांनी केला. आर्मीचे जवान, चाँपर जात असतांना संशय आल्याचं देखील कुटुंबियांनी सांगितलं आहे. शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष निवडीसाठी उद्या भाजपची बैठक…. प्रदेश सरचिटणीस साधणार पदाधिकाऱ्यांशी संवाद.. आजी माजी आमदारांशी चर्चा करून नवीन शहराध्यक्ष आणि दोन जिल्हाध्यक्षांच्या निवडीचा प्रस्ताव प्रदेशकडे पाठवणार… विद्यमानांनाच मुदतवाढ मिळते की नव्या नावाचा विचार केला जातो याकडे पक्षातील अनेकांचे लक्ष… यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा..
सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पाणपोईचे उदघाट्न करण्यात आलं आहे. सोलापूर बस स्टँडवर युवक काँग्रेसच्या वतीने पाणपोई उभारण्यात आली आहे. एसटी स्टँड आवारात ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना वाढत्या उन्हामुळे कोणत्याही प्रकारची पाण्याची अडचण भासू नये, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. युवक काँग्रेसच्या पाणपोईमुळे प्रवाशांना आत्मिक समाधान मिळेल, अशी प्रतिक्रिया खासदार प्रणिती शिंदे यांनी उदघाट्नानंतर दिली.
अक्षय शिंदे गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय शिंदे प्रकरणातील संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. गुन्हे शाखेचे पीआय मंगेश देसाईकडून गुन्हा दाखल होणार आहे. राज्य सरकारने याबाबतची माहिती मुंबई उच्च न्यायालयात दिली.
जळगावच्या सराफ बाजारात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार रूपयांची घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दरात घसरण झाल्यानंतर सोन्याचे दर आता जीएसटीसह 98 हजार रुपयांवर आले आहेत. सोन्याच्या दराने एक लाख रुपयांचा आकडा पार केला होता. मात्र गेल्या दहा दिवसात सोन्याच्या दरात 1700 रुपयांची घसरण झाली आहे.
या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी 1931 साली जातीय जणगणना करण्यात आली होती.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पुण्यातील सोन्याच्या दुकानांमध्ये सोने खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली आहे.
“शरद पवार आमच्यासाठी दैवत, शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आनंदच” असं वक्तव्य विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केलं आहे. महाराष्ट्र गौरव रथ यात्रेची 25 तारखेपासून सुरुवात झाली आहे. त्यावेळी अण्णा बनसोडे यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले की, ” राष्ट्रवादी पक्ष फुले, शाहू, आंबेडकरांच्या मार्गवर चालतोय. शरद पवार हे आमच्यासाठी दैवत आहेत, शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर महाराष्ट्रातील जनतेला आनंदच आहे’. कारवार, बेळगाव येथील मराठी बांधवांच्या संदर्भात विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
अमरावतीमधील बुद्धगया येथील महाबोधी बुद्धविहार बौद्ध भिक्षूंकडे देण्यात यावं या मागणीसाठी अमरावती शहरात हजारो बौद्ध समाजाने अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अमरावती शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला. रखरखत्या उन्हातही मोर्चात हजारोच्या संख्येने बौद्ध बांधव सहभागी झाले होते. यापूर्वी अनेकदा आंदोलन करूनही मागणी पूर्ण न झाल्याने अखेर मोर्चा काढण्यात आला.
जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर भागात गोळीबार करण्यात आला. 29-30 एप्रिलच्या रात्री पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरमधील नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर कोणतीही चिथावणी नसताना गोळीबार केला. भारतीय लष्कराने प्रत्युत्तर देत परिस्थिती नियंत्रणात आणली. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक संबंध अधिक तणावपूर्ण झाले असताना ही घटना घडली आहे.त्यामुळे आता जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकही आता संतापले असून भारतीय सैन्यासोबत आम्ही लढणार असल्याचं तेथील स्थानिकांनी सांगितलं आहे.
सीसीएची बैठक संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी बैठक झाली. तर आता सीसीपीएसची बैठक सुरू होत आहे. आज दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू आहे.
आता आपण पवित्र प्रांगणात आहोत. यात राजकारण आणू नका. राजकीय प्रश्न आणू नका. कोण कुटुंब एकत्र येत असेल तर आनंद आहे. पण त्यावर भाष्य करण्याचा आजचा प्रसंग नाही, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप व शिंदे गट शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी दिसून आली. मातोश्री, शिवसेना भवन व मरिन ड्राइव्ह परिसरात बॅनरद्वारे राजकीय शक्ती प्रदर्शन दिसून आले.
राजे रघुजी भोसले यांची लंडन येथे लिलावात मिळवलेली ऐतिहासिक तलवार स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला असतानाच, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या गळ्यामध्ये आयुष्यभर वापरलेली कवड्याची माळ तुळजापूर मध्ये आणण्याची मागणी तुळजापूर येथील पुजाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिवस गुरूवारी 1 मे रोजी साजरा होणार आहे या निमित्ताने राजधानी दिल्लीत विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहे. कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपरनिक्स मार्गावरील महाराष्ट्र सदनांमध्ये सकाळी निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांचा हस्ते ध्वजारोहणाचा मानाचा सोहळा संपन्न होईल.
पहलगामला झालं हा या देशावरचा हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. ज्या व्यक्तींचे कुटुंब यात शहीद झाले. त्यांनी देशासाठी किंमत दिली आहे. त्यामुळे त्यांचा धर्म, जातपात भाषा या गोष्टी आणायच्या नाही. महाराष्ट्रीयनांवर हल्ला होत असेल तर देशवासिय म्हणून एकत्र यावे लागेल. मी जाहीरपणे सांगितलं की पंतप्रधान जो काही निर्णय घेतली, उपाययोजना करतील त्याला आमचं समर्थन आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदा कॅबिनेटची बैठक घेत आहेत. पंतप्रधान मोदी हे कॅबिनेट कमेटी ऑन सिक्युरिटी (CCS), कॅबिनेट कमेटी ऑन पॉलिटिकल अफेयर्स (CCPA) आणि कॅबिनेट कमेटी ऑन इकोनॉमिक अफेयर्स (CCEA) या बैठकीत सहभागी होतील. या तीन ही समित्यांमध्ये अनेक केंद्रीय मंत्री सहभागी होतील. आज या बैठकीनंतर पाकिस्तानचे भवितव्य ठरणार आहे.
पहलगाममधील हल्ला हा देशावर झालेला हल्ला आहे. याविरोधात सरकार ज्या उपाययोजना करणार, त्याला आमचा पाठिंबा असेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत. बीकेसीमधील वेव्हज परिषदेचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 1 ते 4 मे दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट पार पडणार आहे. एस. जयशंकर, अश्विनी वैष्णवसुद्धा उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात हे आयोजन होणार असून एकनाथ शिंदे आणि अजित पवारसुद्धा हजर राहणार आहेत.
ठाण्यातील तुळजाभवानी मंदिराची प्राणप्रतिष्ठापना शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या हस्ते पार पडली. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, मिलिंद नार्वेकर हेदेखील यावेळी उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून प्रति तुळजापूर मंदिर साकारण्यात आलं आहे.
परगवाल, अखनूर, जम्मू-काश्मीर: “काल रात्री ८:३०-९ च्या सुमारास ३-४ राऊंड गोळीबार करण्यात आला. आम्ही आमचं काम करत असताना आम्हाला सर्व काही थांबवून घरी परत जाण्याचा फोन आला. त्यानंतर काहीही झालं नाही”, अशी माहिती स्थानिक राजू सिंगने दिली. २९-३० एप्रिलच्या रात्री, पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरच्या समोरील नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांनी गोळीबार सुरू केला होता.
कल्याण ग्रामीणमध्ये बांगलादेशी विरोधात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले. शिंदे गटाचे तालुकाप्रमुख महेश पाटील आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कल्याण ग्रामीण मधील उसाटणे आणि खोणी गावालगत असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करत स्टॉल्स टाकणाऱ्या बंगाली मुस्लिमांना मारहाण करत स्टॉल्स तोडले आहेत. पश्चिम बंगालमधील कोलकाताच्या मुस्लिमांना त्वरित गाव सोडण्याचा इशारा दिला.
भाजपच्या सोलापूर शहराध्यक्ष पदासाठी आज निवड होण्याची शक्यता आहे. सोलापुरात भाजप शहराध्यक्ष पदासाठी विद्यमान शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि माजी नगरसेवक अनंत जाधव यांच्यात चुरस आहे. भाजप सरचिटणीस राजेश पांडे आणि निरीक्षक नीता केळकर यांच्या उपस्थितीत आज बैठक होणार आहे. विद्यमान अध्यक्ष नरेंद्र काळे हे पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. तर माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी देखील जोरदार ताकद लावली आहे.
आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत आहे. शहरातील इमारतीच्या नजीक आता बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याचे वारंवार दिवसा दर्शन होत आहे. मंचर येथे शेतातील बिबट्याच्या मुक्त संचाराचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये काढला असून व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
अमरावतीत वर्षभरात दोन लाख शेतकरी कर्जासाठी सावकारांच्या दारी. मार्च अखेरीस 635 परवानाधारक सावकारांनी 255 कोटी रुपयांचे केले कर्जवाटप. शेती बेभरवशाची झाल्याने शेतकऱ्यांना सावकारांच्या दाराचे उंबरठे झीजवावे लागतायेत. बँकांद्वारे कर्ज वाटपात दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांना जावे लागत आहे सावकारांच्या दारात.
ठाणे तुळजाभवानी मंदिर प्राणप्रतिष्ठापना शरद पवार,प्रतिभा पवार यांच्या हस्ते पार पडत आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून प्रती तुळजापूर मंदिर साकारण्यात आले आहे.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप व शिंदे गट शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी. मातोश्री, शिवसेना भवन व मरिन ड्राइव्ह परिसरात बॅनरद्वारे राजकीय शक्तीप्रदर्शन. भाजपच्या बॅनरवर “उजळते भविष्य नव्हे, भगवे!” असा नारा आणि फडणवीस-शेलार यांचे फोटो. शिंदेच्या शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर “सह्याद्रीपुत्र” व काश्मीर दौऱ्याचे फोटो.
महापालिकेने २१ एप्रिलपासून मालमत्ता करात १० टक्के सूट जाहीर केली आहे. त्याचा गेल्या दहा दिवसांत १५ हजार २३६ करदात्यांनी लाभ घेतला आहे. आतापर्यंत १० कोटी ७८ लाख रुपयांचा भरणा झाला असून, करदात्यांना ८९ लाख ९० हजार रुपये सूट मिळाली आहे… नागरिक मालमत्ता कराचा भरणा करून ४०० रुपये ते १५ हजारांपर्यंत सूट मिळवत आहेत.
कारची दुचाकीला जोरदारा धडक… 19 वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू… श्रेया संदीप खैरे असे अपघातात मृत झालेल्या युवतीचे नाव… अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित…
शिवसेना ठाकरे गट आणि शेतकरी क्रांती सेनेकडून या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते… ही शर्यत पाहण्यासाठी अक्कलकोट तालुक्यासह जिल्हाभरातून मोठ्या संख्येने बैलगाडाप्रेमी दाखल झाले होते.. या शर्यतीत 110 बैलगाडा जोडीने सहभाग नोंदवला… यावेळी विजेत्या बैलगाडीला मानधन आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं.