
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात छत्रपती संभाजी नगर येथील औरंगाबाद उच्च न्यायालयात सुनावणी. प्रकाश आंबेडकर स्वतः राहणार उपस्थित. सर्वोच्च न्यायालयाने सोमनाथ सूर्यवंशी न्यायालीन कोठडी मृत्यू प्रकरणात औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेले गुन्हे दाखल करण्याच्या आदेश कायम ठेवले होते. परभणी पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात उद्या औरंगाबाद उच्च न्यायालयात काय होते, याकडे राज्याचे लक्ष. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी. 15 ऑगस्टपासून मेट्रो गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी धावणार. पुणे मेट्रोबाबत एक मोठी अपडेट आली आहे. सध्या गर्दीच्या वेळेत म्हणजेच 9 ते 11 आणि 4 ते 8 या कालावधीत दर सात मिनिटाला एक ट्रेन अशी सेवा पुणे मेट्रोतर्फे सेवा उपलब्ध आहे. मात्र आता येत्या १५ ऑगस्टपासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळेस दर सहा मिनिटाला प्रवाशांना सेवा देणार आहे. तर विना गर्दीच्या वेळी मात्र दर 10 मिनिटाला एक ट्रेन असणार आहे.
कोरिया प्रजासत्ताकचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन 15 ऑगस्ट रोजी भारत दौऱ्यावर येतील. त्यांच्या भेटीदरम्यान ते परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेतील.
दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात संदीपा विर्क यांना 4 दिवसांच्या अतिरिक्त ईडी कोठडीत पाठवले आहे. न्यायालयाने ईडीला संदीपा विर्क यांना 18 ऑगस्ट रोजी कोठडी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, संदीपा विर्क यांनी खोटी आश्वासने आणि फसवणूक करून त्यांच्या नावावर स्थावर मालमत्ता मिळवल्याचे तपासात उघड झाले आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील भटकूट भागातील परिस्थिती पावसानंतर आणखी बिकट होत चालली आहे. येथील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की पूरसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. स्थानिक लोकांना त्यांच्या घरातच राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्यांचे शिष्टमंडळ अलास्काला रवाना झाले आहे. ते उद्या, म्हणजे 15 ऑगस्ट रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना भेटणार आहेत. यासाठी अलास्काला छावणीत रूपांतरित करण्यात आले आहे.
ठाण्याला सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. ठाणे शहरात गडकरी रंगायतन मध्ये नाट्य रसिकांची गर्दी असते. नाट्यकर्मी देखील गडकरी रंगायतनला पसंती देत असतात. मात्र मागील दहा महिन्यापासून या गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचे काम सुरू होतं. ते काम अखेर पूर्ण झालं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतनचे उद्घाटन होणार आहे.
नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांकडून बाह्य स्त्रोतांद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीला विरोध आहे. प्रशासन दखल घेत नसल्याने आंदोलक आक्रमक झाले. आंदोलन करणाऱ्या एका आंदोलक महिलेची तब्येत बिघडली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचं गेल्या 35 दिवसांपासून आदिवासी आयुक्तालयाबाहेर आंदोलन करत आहेत. आक्रमक झालेले आंदोलक आयुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न करत असताना एका आंदोलक महिलेची तब्येत बिघडली. आंदोलनाच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी महिलेला तपासले आहे.
पुण्याच्या कुंडेश्वर अपघातात मृतांचा आकडा वाढला आहे. उपचारादरम्यान सुलाबाई बाळू चोरगे यांचे निधन झालं आहे. सुलाबाई यांना अपघातानंतर त्यांना चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुंडेश्वर अपघातात मृतांचा आकडा 11 वर पोहचला आहे. तर अजूनही 28 महिलांवर उपचार सुरु आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका चिकन मटन बंदी प्रकरणात हिंदू खाटीक व्यापारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आयुक्तांची भेट घेणार आहेत. आयुक्तांनी काल 13 ऑगस्ट रोजी वेळ देऊनही भेट दिली नाही. त्यामुळे आता हिंदू खाटीक व्यापारी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संतोष घोणे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आयुक्तांची भेट घेणार आहेत. तसेच भेट घेतल्यानंतर निवेदन देत आदेश मागे घेण्याची विनंती केली जाणार आहे.
न्याय संस्थेवर सुद्धा हल्ला होत आहे, ज्यांना न्यायाधीश म्हणून नेमले गेले त्यांनी भाजपाचं काम केलेलं आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केला आहे.
विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या दत्तात्रेय गुंड यांच्या कुटुंबाची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे. धाराशिवच्या खामसवाडी येथे दत्तात्रेय गुंड या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सरकार असताना मांस बंदीचे आदेश काढले होते. आता देवेंद्र फडणवीस यांना कसे टार्गेट करायचे एवढेच विरोधकांना काम अशी टीका भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे.
ज्यांना संघ काय हे कधीच माहिती नव्हते, हिंदुत्व पटले नव्हते, नैतिकतेचा लवलेश नव्हता अशा आयारामांमुळे संघ परिवार प्रदुषित झाला आहे, असे विधान रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी केले, तर मृत्युंजय देशासाठी संघ आणि हिंदुत्व आवश्यक असून संघ परिवाराने सावध राहण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला देत संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपला ‘आयाराम संस्कृती’वरून अप्रत्यक्ष खडसावले.
झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचं सरकारचं धोरण असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच मुंबईत मेट्रोचं नेटवर्क वाढतंय अंसही ते म्हणाले. MMRDA च्या विविध प्रकल्पांचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडला.
ठाण्यातील निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन करण्यात आले. शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या वतीने या ॲम्बुलन्स देण्यात आले आहेत. महाड,रायगड,रत्नागिरी,चिपळूण, सिंधुदुर्ग अशा कोकण विभागात रुग्णांच्या सेवेकरीता या रुग्णवाहिका धावतील. शिवसेना पक्षातील जे आमदार असतील अशा मतदार संघात ॲम्ब्युलन्स दिल्या जाणार आहेत.
पुण्याच्या राजगुरुनगर येथील तिन्हेवाडी परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे. लोकवस्तीमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार पाहायला मिळतोय. लोकवस्तीमध्ये फिरणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राजगुरुनगर वनविभागाने लोकवस्तीमधील बिबट्या बंदोबस्त करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
पुण्यातील खराडी परिसरात पोलीस उपनिरीक्षकावर हप्तेखोरीचा आरोप होत आहे. कारवाईच्या धाकाने हॉटेल व्यवसायकाकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. हॉटेल्सला रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी असताना देखील या पोलीस उपनिरीक्षकाने रात्री सव्वा बारा वाजता हॉटेलमध्ये घुसून व्हिडिओ चित्रीकरण केले होते. दुसऱ्या दिवशी हॉटेल व्यवसायिकाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवून तुम्ही माझे काम केले तर मी तुमचे काम करेल म्हणून पैशाची मागणी केली.
गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही धानाच्या चुकारापासून वंचित आहे. अद्यापही 2024 – 25 मधील खरीप हंगामाचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. 40,362 शेतकरी चुकारापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांचे 373 कोटी 36 लाख रुपये शासनाकडे अद्यापही प्रलंबित आहेत. शासनाने चुकारे लवकरात लवकर द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
खोटं राज्य, खोटं सरकार लवकरच जाणार आहे. खोटेपणा फार काळ टिकत नाही. आपलं सरकार गद्दारांनी पाडलं. सैनिकांमध्ये गद्दारांचं रक्त जाऊ देऊ नका असे संजय राऊत म्हणाले.
करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवरील रासायनिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर मूळ मूर्ती पुन्हा दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे. रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर अंबाबाईच्या मूळ मूर्तीला नवीन झळाळी आली आहे. गेल्या तीन दिवसापासून पुरातत्व विभागाकडून अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू होती.
बैलगाडा शर्यत बंदीविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये केसला न्यायालयात उपस्थित न राहिल्याने 32 जणांवर अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. अटक वॉरंटमधे भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे ,खेडचे आमदार दिलीप मोहिते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी खासदार बाळा भेगडे यांचा समावेश आहे. 2017 मध्ये पुण्याच्या चाकण येथील पुणे नाशिक महामार्गवर कोणतीही परवानगी न घेता सर्वपक्षीय नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं. अटक वॉरंट रद्द करण्यासाठी सर्व नेत्यांनी खेड उपजिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे.
व्हॉइस ऑफ देवेंद्र राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजकांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद पाडली. रोहित पवारांनी केलेल्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. ही स्पर्धा चालूच राहणार, असा खुलासा पत्रकार परिषदेत आयोजकांकडून करण्यात आला. ही स्पर्धा पुणे विद्यापीठाकडून आयोजित करण्यात आलेली नाही, तर नाशिक प्रतिष्ठान स्वारंभ फाउंडेशन संस्था अशा तीन संस्था मिळून ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली.
“जुन्या वसाहतींचं रिडेव्हलपमेंटचं काम करतोय. सामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे, यासाठी काम करतोय. ज्या अडचणी आल्या, त्यातून मार्ग काढला. 2014 ला सरकार आल्यानंतर धारावीबाबत निर्णय घेतले”, असं फडणवीसांनी सांगितलं.
“अत्यंत वेगाने कामाची सुरुवात केली. बीडीडी चाळीत पोलिसांनाही हक्काचं घर मिळालं. देशातील उत्कृष्ट कंत्राटदारांनी काम केल्याचा आनंद आहे. म्हाडाकडून सगळीकडे चांगली कामं झाली नाहीत. गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न पूर्ण झालं”, असं फडणवीस म्हणाले.
‘समाजासाठी काम करताना आडमुठी भूमिका घ्यायची नाही ही भूमिका आहे. मुंबईकरांना मुंबईतच हक्काचं घर मिळालं पाहिजे असा निर्णय घेण्यात आला. बीडीडी चाळींनी अनेक आंदोलनं पाहिली आहेत. अनेक लोकांनी बीडीडी चाळीतील लोकांना फक्त स्वप्न दाखवली,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बीडीडी चाळींनी अनेक आंदोलनं पाहिली, त्यांच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे, त्यांना आज हक्काचं घर मिळालं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचं सरकारचं धोरण आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. बीडीडीच्या पहिल्या टप्प्यातील नागरिकांना घराच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते संवाद साधत होते.
नालासोपारा:- काँग्रेस चे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील मत चोरीचे प्रकरण बाहेर काढल्या नंतर, नालासोपारा विधानसभा मतदार संघात सुद्धा मतदार यादीत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे
सुषमा गुप्ता या 39 वर्षीय महिलेचे एकाच यादीत सहा वेळा एकच नाव, एकच फोटो आहे. मात्र या प्रत्येक नावात मतदार यादीतील EPIC हा नंबर मात्र वेगळा आहे.
लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत या महिलेचे 6 वेळा नाव मतदार यादीत हे नाव आढळून आले आहे.
विद्यार्थी काँग्रेसकडून प्रशासनाचा जाहीर निषेध. पुणे विद्यापीठात कॅरी ऑनसाठी आंदोलन.
मागील ८ जुलैपासून सुरू असलेल्या कॅरी ऑन संदर्भातील विद्यार्थ्यांच्या मागणीला दीड महिना उलटूनही कुठलाही निर्णय झाला नाही. आज विद्यार्थी काँग्रेसकडून जाहीर निषेध आणि कॅरी ऑनसाठी शेकडोंच्या संख्येने तीव्र आंदोलन करत आहेत.
अजित पवार आज संभाजीनगरमध्ये जाणार आहेत. तिथे काही कार्यक्रम आणि पक्षप्रवेश कार्यक्रम झाल्यावर रात्री बीडला मुक्काम करणार. उद्या पालकमंत्री म्हणून ते बीडला ध्वजारोहण करणार आहेत.
मारहाण प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांनी नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५६ रहिवाशांच्या प्रशस्त घरात राहण्याचे स्वप्न आज प्रत्यक्षात येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने उभारलेल्या दोन पुनर्वसित इमारतींमधील घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे. आज गुरुवारी सकाळी ११ वाजता माटुंग्यातील यशवंत नाट्यमंदिरात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमावेळी बीडीडीकरांना चाव्या वाटप केल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने स्वातंत्र्यदिनानिमित्त (15 ऑगस्ट) विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेसह पालिका, सामाजिक संस्था आणि स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमांतर्गत एक हजाराहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली, ज्यात भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनीही सहभाग घेतला. याशिवाय, भारतातील 12 ऐतिहासिक किल्ल्यांचे विशेष प्रदर्शन भरवण्यात आले आहे, जेणेकरून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत राहावी.
पुण्यातील खराडी परिसरात एका पोलीस उपनिरीक्षकावर हॉटेल व्यावसायिकाकडून हप्तेखोरी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल्सला रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी असतानाही या पोलीस उपनिरीक्षकाने रात्री सव्वा बारा वाजता एका हॉटेलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित हॉटेल मालकाला पोलीस ठाण्यात बोलावून तुम्ही माझं काम केल्यास मी तुमचं काम करेन असं सांगून पैशांची मागणी केली, असा आरोप आहे. या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण हे तपास करत आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप आलं आहे. ओढ्याचं पाणी शेतात शिरल्याने उभं पीक पाण्याखाली गेलं आहे. गावातील शेतकरी नानासाहेब जाधव यांच्या अडीच एकर शेतीत गेल्या तीन दिवसांपासून पाणी साचून राहिल्याने सोयाबीन, उडीद, मका यांसारख्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतात गुडघाभर पाणी साचल्यामुळे शेतीला अक्षरशः तलावाचं रूप आलं आहे. आमच्या प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांच्या या व्यथा जाणून घेतल्या.
रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर मूळ मूर्ती पुन्हा दर्शनासाठी खुली… रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर अंबाबाईच्या मूळ मूर्तीला नवी झळाळी… गेल्या तीन दिवसापासून पुरातत्व विभागाकडून अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर सुरू होती रासायनिक संवर्धन प्रक्रिया… रासायनिक संवर्धन प्रक्रिया काळात अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन होतं बंद… रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर धार्मिक विधी पार पाडून मूर्ती दर्शनासाठी केली गेली खुली
पुण्याच्या राजगुरुनगर येथील तिन्हेवाडी परिसरात बिबट्याची दहशत वाढली.. लोकवस्तीमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार पाहायला मिळतोय … लोकवस्तीमध्ये फिरणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण… राजगुरुनगर वनविभागाने लोकवस्तीमधील बिबट्या बंदोबस्त करण्याची रहिवाशांची मागणी…
अद्यापही 2024 – 25 मधील खरीप हंगामाचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत… 40,362 शेतकरी चुकारापासून वंचित… शेतकऱ्यांचे 373 कोटी 36 लाख रुपये शासनाकडे अद्यापही प्रलंबित…. शासनाने चुकारे लवकरात लवकर करावे शेतकऱ्यांची मागणी…
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद, शिवीगाळ आणि मारहाण
‘पुण्याला थ्रेट आहे असं इनपुट नाही’ मनपा आयुक्त नवल किशोर राम यांचं वक्तव्य
पिंपरी चिंचवड शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या चऱ्होली मध्ये जिम ट्रेनर तरुणीने मित्राच्या मदतीने केली तरुणाची हत्या; हत्येनंतर गाठले पोलीस ठाणे.
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सिरसाव येथील चांदणी नदीला मोठा पूर. मुसळधार पावसामुळे पूर आल्याने सिरसाव गावावरून घारगाव, राजुरी यासह अन्य चार गावांचा संपर्क तुटला. सिरसाव गावावरून बार्शीकडे जाणारी वाहतुक पूर्णपणे झाली बंद. पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प तर पुलाची उंची वाढवण्याची स्थानिक नागरिकांची मागणी.
पिंपरी चिंचवड शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या चऱ्होलीमध्ये जीम ट्रेनर तरुणीने मित्राच्या मदतीने केली तरुणाची हत्या. हत्येनंतर गाठले पोलीस ठाणे. जिम ट्रेनर तरुणी आणि तरुणाने एकाची लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून हत्या केली आहे. ही घटना दुपारी घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी जिम ट्रेनर प्रांजल तावरे आणि यश पाटोळे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा केल्याची कबुली दिली.
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर, मुंबई उपनगरात पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, गोरेगावसह सर्वच भागात अधूनमधून पाऊस सुरू आहे.
सोलापुरात मागील चार ते पाच दिवसापासून मुसळधार पाऊस. रात्रभर पाऊस झाल्यानंतर पहाटे पावसाने घेतली उसंत. सलग सुरु असलेल्या पावसामुळे नदी, नाले, तलाव, ओढे ओसंडून वाहू लागले. उत्तर सोलापुरातील हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे शहरातील ओढा देखील ओव्हरफ्लो. सोलापूर शहरातील जुना पुणे नाका परिसरात पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद. जुना पुणे नाका ते सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग जोडणारा रस्ता वाहतुकीसाठी प्रशासनाने बंद ठेवलाय.
राज्यात जोरदार पावसाची शक्यता. बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज विदर्भ, कोकण, घाटमाथा, मराठवाड्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांत दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.