
ण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये का तरूणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ माजली. याप्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे अखेर अटक करण्यात आली आहे. त्याला सध्या लष्कर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं असून आज 11 वाजता कोर्टात हजर करण्यात येईल. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून नव्याने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना 78 लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. नव्याने भरती करण्यात आलेल्या 39 कर्मचाऱ्याकडून बँक गॅरंटीच्या नावाखाली दोन-दोन लाख रुपये वसूल करण्यात आले. 39 कर्मचाऱ्यांकडून नोकरीच्या आधीच वसूल केले 78 लाख रुपये तर 17 कर्मचाऱ्याच्या पगारातून महिन्याला कपात 17 हजाराची केली जात आहे. डोंबिवली 65 बेकायदा इमारत महारेरा घोटाळा प्रकरणी रहिवासी आक्रमकझाले असून त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतलीआहे. 15 रहिवाशांनी विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केलेत. फसवणूक करणारा संबधीत बिल्डर, बनावट पेपर बनवणारा आणि संबधीत विभागाचे शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. या आणि देश विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी, अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
घाटकोपरध्ये होर्डींग्ज कोसळून अनेकांचे बळी गेल्याची घटना घडली ताजी असताना वांद्रा वरळी सी लिंकहून कलानगरकडे जाताना एका मोठ्या होर्डिंग नागरिकांनी धसका घेतला. नागरिकांना वारंवार रेल्वेकडे तक्रार करूनही साधारण १२०बाय १०० इतक्या ऊंचीच्या ह्या होर्डींगचा सांगाडा ऊभा आहे.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग यासह विविध विभागांच्या अधिकारांची बैठक घेतली. या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना आगामी काळातील पाणीटंचाई यासह मंजूर निधीचा विनियोग यासह विविध विषयांचा आढावा घेतला.
डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारती प्रकरणात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. खोटे दस्तावेज बनवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांकडे निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला कोर्टात घेऊन जाण्यासाठी पुणे पोलिसांनी तयारी केली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आरोपीला ज्या वाहनातून घेऊन जाणार आहे, त्या वाहनाचा मागेपुढे पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्या असतील.
राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी म्हटले की, भाजपची दलितविरोधी मानसिकता आहे. भाजप एससी आयोगाबाबत गंभीर नाही. गेल्या एक वर्षापासून अनुसूचित जाती आयोगाची दोन महत्त्वाची पदे रिक्त आहेत.
चमोली घटनेवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, आयटीबीपी-बीआरओचे बचाव कार्य सुरू आहे. लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बचावकार्यात लष्कराची मदत घेतली जात आहे. बर्फवृष्टीमुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. हिमनदी फुटल्यामुळे 57 कामगार अडकले आहेत.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मोदी सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेतून 455 कोटी रुपये गायब झाल्याचे आरटीआयमधून उघड झाले आहे. अलिकडेच आम्ही मोदीजींना “बेटी बचाओ” वर तीन प्रश्न विचारले होते, त्यापैकी एक प्रश्न आकडेवारी लपवण्यावर होता. आज माहिती अधिकाराच्या ताज्या खुलाशांमुळे, मोदी सरकारचे खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.
RTI से ख़ुलासा हुआ है कि मोदी सरकार की “बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ” योजना में ₹455 करोड़ “ग़ायब” हो गए हैं।
“बहुत हुआ नारी पर वार” वाले भाजपाई विज्ञापन की गूँज पिछले 10 वर्षों से उन सभी महिलाओं की चीखों का उपहास उड़ा रही हैं, जो भाजपा राज में और कभी-कभी भाजपा के गुंडों द्वारा… https://t.co/LrVho0i8k8
— Mallikarjun Kharge (@kharge) February 28, 2025
मराठा आरक्षणासाठी रमेश केरे पाटील यांनी गेले सहा दिवसापासून सुरू असलेले उपोषण अखेर सोडले असून त्याबद्दल मंत्री अतुल सावे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
राष्ट्रवादीचे मावळ तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष आणि एकविरा देवी ट्रस्टचे विश्वस्त मारुती देशमुख यांनी आपण आईला मारहाण करायला बुद्धू आहोत का असा सवाल करीत मारहाण केल्याचा इन्कार केला आहे.
पुणे अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रेय गाडेला शिवाजी नगर न्यायालयात हजर करण्यातसाठी हालचाली सुरू. लष्कर पोलीस ठाण्यातून आरोपीला घेऊन जाण्यासाठी पुणे पोलिसांची तयारी सुरू. लष्कर पोलीस स्थानकासमोर विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते जमायला सुरुवात.
पोलिसांच्या 13 टीम तयार करण्यात आल्या होत्या. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास शेतातून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी हे सर्व ऑपरेशन कशा पद्धतीने केलं, त्याबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा
कोल्हापूरच्या राजाराम साखर कारखान्याला भीषण आग. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.
पुण्यातील घटनेचा सर्वांनीच निषेध केलाय. आरोपीच्या चौकशीतून सर्वकाही निष्पन्न होईल. पुण्याच्या घटनेतील आरोपीला मध्यरात्री 1 वाजता अटक झाली अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर आगमन. नांदेडमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा आणि आढावा बैठक पार पाडणार.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयात कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, आमदार अर्जुन खोतकर, माजी आमदार अमरसिंह पंडित हे उपस्थित आहेत. त्याच बरोबर जलसंपदा विभागाचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित आहेत
लोणार सरोवर आणि परिसरात प्री वेडिंग शूट करायचे असेल तर मोजावे लागतील ३५ हजार रुपये… भारतीय पुरातत्व विभागानं ही नवीन नियम लागू केलेय… विशेष म्हणजे प्री वेडिंग शूट करणाऱ्या जोडप्याला किमान ७ दिवस आधी बुकिंग करावे लागणार… लोणार येथे लोणार सरोवर आणि ऐतिहासिक स्थळं आहेत… पुरातत्व ठिकाणचे संरक्षण आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी हे शुल्क आकारले जाणार आहे…
सभेत दाखवण्यापूर्ती हातात रुद्राक्षाचा माळ घालतात… औरंगजेबाचा जप ज्यांच्या सदैव तोंडी, शेलारांची टीका… ढोंगी हिंदुत्ववादी म्हणत शेलारांचा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा…
नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी शिंदे गटातील भाजपचे अनेक लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात येणार…. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जयस्वाल यांचा गौप्यस्फोट… उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून जे पदाधिकारी राष्ट्रवादी मध्ये गेले त्यांच्याकडे कुठलाही व्याप नव्हता… तिकडे जाणारे लोक हे व्यावसायिक दृष्टिकोनातून जातात… कट्टर शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर….
विनायक पाटील शेतकऱ्यांच्या शेतातील बोरवेल मधील प्रकार… शेतीच्या सिंचनासाठी पाटील यांनी केला होता आठशे फूट खोल बोरवेल… दिवसातून दोन ते तीनदा मोठ्या प्रेशरने पाणी बाहेर निघत असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान… भूगर्भ विभागाकडून तपासणीची शेतकऱ्यांची मागणी… परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण… बोरवेलमधून अचानक निघणारे पाणी पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांची मोठी गर्दी…
महाविकास आघाडीमध्ये बैठकांचा सिलसिला, शरद पवारांच्या खासदार, आमदारांची आज मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे. वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये पक्ष संघटनेच्या संदर्भात चर्चा होणार आहे.
तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आज 11.30 वाजता मातोश्रीवर बैठक होईल. या बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. विरोधी पक्षनेत्याच्या नावावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते.
नवी दिल्ली – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र. दिल्लीत ज्या तालकटोरा स्टेडियम वर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाल त्या ठिकाणी थोरले बाजीराव पेशवे, सुभेदार मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे यांचे अर्धाकृती पुतळे उभा करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली. या पुतळ्यांचा सर्व खर्च संमेलनाची आयोजक संस्था सरहद करणार, त्यासाठी कुठलाही सरकारी निधी घेणार नाही. फक्त केंद्र आणि दिल्ली सरकारने यासाठी परवानगी देण्याची शिंदे यांची विनंती.
मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याचा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सपवर पाठवण्यात आला आहे. वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. पाकिस्तानी नंबरवरून ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सअपवर हा धमकीचा मेसेज आला होता. बुधवारी दुपारी मेसेज आल्यानंतर तपासयंत्रणा अलर्ट मोडवर आहे. मेसेज करणारी व्यक्ती भारतातील की बाहेरील याचा तपास सुरू आहे.
पुणे – स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अटक केल्यानंतर पहाटे ससून रुग्णालयात त्याची तपासणी करण्यात आली. थोड्याच वेळात त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नंदुरबार ब्रेकिंग :- – गुजरात राज्यात बेकायदेशीर विदेशी दारु तस्करी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने रोखली. उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात कारवाई. दारू तस्करी साठी अनोखी शक्कल, नकली अंड्याचा ट्रेच्याआडून दारू तस्करी. बाहेरून अंड्याचा ट्रे तर आतमध्ये 132 पेट्या विदेशी दारू होती, एकूण १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अटक. गाडेला अटक केल्याची पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. गावातल्या शेतात अनेक तास शोधमोहिन केल्यानंतर अखेर गाडेला बेड्या ठोकण्यात आल्या. आज त्याला 11 वाजता न्यायलयासमोर हजर करण्यात येणार आहे.