
मुंबईत हवामान सुखद आणि अंशतः ढगाळ राहणार आहे. तापमान सुमारे 31°C (जास्तीत जास्त) / 20°C (किमान) असून आर्द्रता कमी (35%) आहे. दिवसभर हवामान उष्ण-सुखद राहील, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. तर सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला. सातारा शहरात 9 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली आहे. यावेळी महाबळेश्वर पेक्षा सातारा शहरात तापमान कमी आहे. महाबळेश्वर मध्ये 11 अंश सेल्सिअस तर सातारा शहरात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे बँकेंतर्गत घोटाळा प्रकरण देखील समोर आलं आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंतर्गत घोटाळा प्रकरणात अप्पर निबंधकांद्वारे चौकशी होणार. शुक्रवारी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत माहिती दिली. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी बँकेवर गंभीर आरोप लावले होते. सहकार मंत्र्यांच्या घोषणेनंतर परभणीत राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
जळगावच्या चोपडा तालुक्यातील मोहरद येथील महिला सरपंच अंजुम तडवी यांची दिल्ली येथे होणाऱ्या सरपंच शक्ती या कार्यक्रमासाठी निवड झाली आहे, देशभरातील 50 महिला सरपंच या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असून, तडवी या राज्यातील एकमेव महिला सरपंच असून त्या दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनल मेस्सी हैदराबादमध्ये पोहोचला. मेस्सी तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर असून आज पहिलाच दिवस आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी हैदराबादमध्ये त्यांची भेट घेतील.
केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी पोस्ट करत म्हणाले की, “धन्यवाद, तिरुवनंतपुरम! तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत भाजप-एनडीएला मिळालेला जनादेश केरळच्या राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण आहे. जनतेला पूर्ण विश्वास आहे की केवळ आमचा पक्षच राज्याच्या विकासाच्या आकांक्षा पूर्ण करू शकतो. आमचा पक्ष या चैतन्यशील शहराचा विकास करण्यासाठी आणि तेथील लोकांसाठी ‘जीवन सुलभता’ वाढवण्यासाठी काम करेल.”
भ्रष्टाचार करणारे मंत्री आणि अधिकाऱ्यांना बिबट्याच्या ताब्यात द्या असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केलं आहे. विधानपरिषदेत शशिकांत शिंदे यांचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या किंमती 10 टक्क्यांनी कमी केल्या जातील. ईडब्ल्यूएस आणि एलआयजी प्रवर्गातील नागरिकांना यामुळे लाभ मिळणार आहे. एसआरए अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेतील विद्यार्थी हे आतंकवादी नाही, त्यांच्यावर करण्यात आलेल्या लाठी हल्ल्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटतील,असा इशारा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे नेते तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे. नागपूर येथे आंदोलन करणाऱ्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठी हल्ला केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
मीरारोड आरटीओच्या उपप्रादेशिक कार्यालयासाठी असलेल्या दोन एकर जागेची भूमिपूजन सोमवारी होणार आहे. हे १५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधले जाणार आहे आणि हे काम दोन वर्षांत पूर्ण होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
कोल्हापूर इथे शेंडेपार्क या ठिकाणी १०० एकरमध्ये आयटी पार्क तयार केले जाणार आहे. मुख्यमंत्री , दोन्ही ऊपमुख्यमंत्र्यांनी याला हिरवा कंदिल दिलाआहे. करवीर वासियांसाठी हा गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे. हजारो रोजगार मिळतील आणि कोल्हापूरच्या माणसाला पुणे , पिंपरी इथे रोजगारासाठी जावे लागणार नाही असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
जळगावच्या चोपडा तालुक्यातील मोहरद येथील महिला सरपंच अंजुम तडवी यांची दिल्ली येथे होणाऱ्या ‘सरपंच शक्ती’ या कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. देशभरातील 50 महिला सरपंचात निवड झालेल्या अंजुम तडवी या राज्यातील एकमेव महिला सरपंच असून त्या दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. दिल्ली येथे 16 ते 19 डिसेंबर दरम्यान सरपंच शक्ती हा कार्यक्रम होत आहे.
साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावळी गावात मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांचा छापा. तीन कारागीरांसह स्थानिक एक जण असे एकूण चार जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. सावरी गावामध्ये एका शेडमध्ये एमडी ड्रग्स बनवत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. याआधी मुंबई येथे मुंबई क्राईम ब्रँचने केलेल्या कारवाईत पुण्यातील कारवाईनंतर संशयित आरोपींनी सावरी गावात एमडी ड्रग्ज बनवत असल्याची मिळाली होती माहिती.
पंतप्रधान आवास योजनेच्या इमरातींना पालिकेतील अधिकाऱ्यांची नावे देण्यात येणार असल्याचा निर्णय आयुक्त जी श्रीकांत यांनी घेतला आहे. बेघर नागरिकांना घर मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान प्रधान आवास योजना आणली. याच योजनेतून छत्रपती संभाजीनगर मध्ये ही जवळपास 11 हजार घरे गरिबांना मिळणार आहेत. परंतु हे घरे बांधताना ज्या बिल्डिंग उभ्या केल्या जाणार आहेत त्यांना चक्क महापालिकेतिल अधिकाऱ्यांचे नावे देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
कल्याण स्टेशन परिसरात महावितरणच्या डीपीला आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे वायरमधून ठिणग्या पडत असून प्रवासी-नागरिक घाबराले आहेत. या सगळ्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. अग्निशामक कर्मचाऱ्यांनी मॅन्युअली आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कुन्हाळी शिवारात पिसाळलेल्या वानराने हैदोस घातला आहे. कुन्हाळी गावातील अनेक ग्रामस्थांना वानर चावल्याने ग्रामस्थ जखमी झाले आहेत. अनेक दिवसापासून नागरिकांना यांचा त्रास होत असून वानराला पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र वानराची टोळी वन विभागाच्या पिंजऱ्यात येत नसल्याने गावामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
अहिल्यानगरच्या माळीवाडा येथील ऐतिहासिक वेस पाडण्याच्या प्रशासनाच्या हालचाली. माळीवाडा वेस पाडण्यासाठी मागवल्या नागरिकांच्या हरकती. तर माळीवाडा वेस पाडू नये यासाठी नागरिक आणि इतिहास प्रेमी आक्रमक. वेस पाडण्याच्या विरोधात नागरिकांकडून हरकती नोंदवण्याचे काम सुरू. जर निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा.
“एक चांगल्या स्वभावाचे आणि देशासाठी, समाजासाठी काम करणारे वरिष्ठ मित्र आज आपल्यात नाहीत. मी आज इथे आलोय. त्याचे मला दुःख होतेय कारण निवडणूक काळात यायचो तेव्हा त्यांच्या घरी थांबायचो प्रचाराला जायचो. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इंदिरा गांधी यांचा खूप स्नेह होता. शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी त्यांना केंद्रात गृहमंत्री केले. गांधी कुटुंबाचे शिवराज पाटील यांच्यावर खूप प्रेम होते” असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
परभणी महापालिकेला प्रहार जनशक्ती पक्षाकडून परभणी ग्रामपंचायत नामकरण. नागरी सुविधा मिळत नसल्याने प्रहार करून महापालिकेवर फलक लावत आंदोलन. परभणीकरांना नागरी सुविधा मिळत नसल्याने परभणी महानगरपालिकेवर प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलन. परभणी महानगरपालिकेला परभणी ग्रामपंचायत असं नामकरण करण्यात आलं आहे. महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी प्रहारकडून ग्रामपंचायत अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे.
पारनेर तालुक्यातील पिंपरी गवळीला चौथा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात झाला जेरबंद. गेल्या एका आठवड्यात पारनेर तालुक्यात चार बिबटे झाले जेरबंद. तर याचं तालुक्यात एक बिबट्याने पिंजऱ्याला दिला चकवा. पिंजऱ्याला चकवा देतानाचा व्हिडीओ ट्रॅप कॅमेऱ्यात झाला कैद.
मुंबई पुणे राष्ट्रीय मार्ग म्हणजेच जुना मुंबई पुणे मार्गावर बोर घाटात खोपोली ते खंडाळा दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शिंग्रोबा मंदिर ते दस्तुरी वाहतूक चौकी, अमृतांजन ब्रिज, बॅटरी हिल, खंडाळा टनेल ते खंडाळा ओव्हरब्रिज, खंडाळा ते लोणावळा जुना मार्ग पर्यंत 7-8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून रायगड वाहतूक पोलीस, पुणे ग्रामीण वाहतूक पोलीस, महामार्ग वाहतूक पोलीस, वाहतूक कमी करण्याचा प्रयत्न करत असून वीकेंड असल्यामुळे मुंबईकर मोठ्या प्रमाणात मुंबई बाहेर पडल्याने व बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी झाली असल्याचे चित्र दिसत आहे.
बीडच्या गेवराई परिसरातील वडगाव ढोक फाटा येथे धुळे-सोलापूर महामार्गावर काही दिवसांपूर्वी शिर्डीकडे दर्शनासाठी जात असलेल्या तेलंगणा राज्यातील कुटुंबाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटले होते. त्याचा एक व्हिडिओ जो एका ट्रक चालकाने घेतलेला होता तो देखील समोर आला होता. यानंतर धुळे-सोलापूर महामार्गावरील वारंवार होत असलेल्या लुटीचे प्रकार उघडकीस आले.
या प्रकरणानंतर बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडी येथील तिघांना एका आलिशान चारचाकीतुन केज शहराकडे जात असताना ताब्यात घेतले त्यांच्या गाडीतून लोखंडी रॉड आणि एक धारदार कोयता जप्त केला तर तीन सहकाऱ्यांच्या मदतीने या सहा जणांच्या टोळीने एकूण चार अशा प्रकारच्या घातक लुटीच्या घटना केल्याची कबुली दिली आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथील राहुल काळे, विकास काळे, अनिल काळे यांना अटक केली असुन इतरांचा शोध सुरू आहे.
जळगावातील अमळनेर येथील स्ट्रॉंग रूम येथे सशस्त्र पोलिसांकडून कडा पहारा दिला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. अमळनेर मधील इंदिरा भवन येथे प्रशासनाच्या वतीने स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेला आहे. स्ट्रॉंग रूमच्या आत तसेच बाहेरील परिसरामध्ये जवळपास असे एकूण 15 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहे. उमेदवार व उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी स्ट्रॉंग च्या बाहेरील बाजूस सीसीटीव्ही च्या भव्य डिस्प्ले ची देखील सोय करण्यात आलेली आहे.. पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर एसआरपीएफ चे सशस्त्र जवान देखील तैनात करण्यात आले असून कडा पहारा दिला जात आहे..
विधिमंडळ ची सर्कस झालीय. दशावतार म्हणा. गांभीर्या संपलं. संसदेत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मुळे जाण आहे. विरोधी पक्ष नेता असणं ही लोकशाहीची गरज आहे.गेल्या काही वर्षात 10 11 वर्षात विरोधी पक्ष नेता कुठे ठेवायचा नाही अशीच मागणी करायची.विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र मध्ये दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधारला लाज वाटायला हवी याचा अर्थ त्यांना तुम्ही घाबरता.तुमच्या चुका दाखवल्या जातात.देवेंद्र फडणवीस, अमित शहा मोदी यांना लोकशाहीचे संकेत पाळायचे नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
जळगावच्या भुसावळ येथील महावितरणमधील निवृत्त अधिकारी यांची ८० लाखांत ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. सायबर भामट्याने मनी लाँड्रींग, दहशतवादी कारवायांसाठी तुमच्या बैंक खात्यांचा वापर झाल्याची भीती घालून ८० लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. याबाबत जळगावातील सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. सुखदेव चौधरी असे 86 वर्षीय फसवणूक महावितरण च्या निवृत्त अधिकाऱ्याचे नाव आहे. सायबर चोरट्यांनी ऑनलाइन पोलिसांच्या वेशात धमकवून 80 लाख रुपये उकळल्याची देखील माहिती समोर आली आहे
गडचिरोली जिल्ह्यात मोबाईल टावर बॅटरी चोर प्रकरणात चार आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. 27 लाख 71 हजार रुपयाचे मोबाईल व बॅटरी या चोरांकडून जप्त केले.गडचिरोली आरमोरी धानोऱ्या तीन ठिकाणी दुर्गम भागातील टॉवर्सचे बॅटऱ्या चोरून विकण्याचे काम हे चोर करीत होते. या चोरांकडून पोलिसांनी 80 बॅटरी जप्त करण्यात आल्या.
उदय सामंत, अजित पवार आणि भरत गोगावले यांच्यात लॉबीत भेट झाली. राष्ट्रवादी शिवसेना सुरू असलेला संघर्ष आता थांबायला हवा यावर चर्चा झाल्याचे समजते. रायगड प्रकरणी अजित पवारांनी थेट भरत गोगावले आणि मंत्री सामंत यांची भेट घेतल्याचे समोर येत आहे.
बैठकीत दोन्ही पक्षाकडून संबंध ताणले जाऊ नये याची काळजी घ्यावी अशी विनंती करण्यात आली.चर्चेत वाद वाढायला नको खबरदारी घ्यावी अशी सूचना देण्यात आली.
अहिल्यानगर जिल्हयात वाढत्या मानव – बिबटयांच्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर उपाययोजना. जिल्हा नियोजनमधून 8 कोटी 13 लाख 44 हजारांचा निधी. या निधीतून पिंजरे , रेस्क्यू उपकरणांची खरेदी. अहिल्यानगर जिल्हयात 1150 हून अधिक बिबटे , 27 बिबटे आत्तापर्यंय जेरबंद. जिल्हयातील 897 गावे संवेदनशील म्हणून घोषीत…
सोन्याच्या दरात हजार 4 हजार 69 रुपयांनी तर चांदीच्या दरात 3 हजार 90 रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 37 हजार 145 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 850 रुपये किलोवर पोहोचली आह. सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीच्या दराने 2 लाखांचा आकडा पार केला असून सोन्याच्या दराने 1 लाख 37 हजारांचा टप्पा ओलांडला आहे
काँग्रेसचे कार्यकर्ते शेकोटी पेटून काढत आहेत रात्र जागून. सत्ताधारी पक्ष ओट चोरी करेल म्हणून पहारा देत असल्याची भावना. निवडणूक आयोगाच्या नावाखाली भाजप सरकार षडयंत्र रचत आहे. स्ट्रॉंग रूमला पहारा देणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आरोप
सकाळी 11 वाजता लिंगायत समाजाच्या रितिरिवाजाप्रमाणे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार. यावेळी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह दिग्गज नेते अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहणार. वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने शिवराज पाटील चाकूरकर यांची प्राणज्योत मालवली. शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते.
दुसऱ्या कंटेनर मध्ये आणखी 350 झाडं दखल. नाशिकच्या मखमलाबाद परिसरात झाडं उतरवण्याचे काम सुरू. मखमलाबादच्या भोईर मळा परिसरात झाडांसाठी खड्डे खणण्याचे काम सुरू. सुमारे 15000 झाडं सोमवारी शहरातील विविध भागात लावले जाणार
नुकताच संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत यांनी सत्ताधारी विरोधी पक्षनेत्यांना घाबरतात, असे म्हटले.
जायकवाडी धरणाच्या परिसरात जवळपास ५६ हेक्टर जमिनीवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. अनेक वर्षापासून हे अतिक्रमण असून, ते काढणे जिल्हा परिषद आणि जलसंपदा विभागाला अडचणी येत आहे. अखेर आता या ठिकाणची अतिक्रमने काढायला सुरुवात झाली आहे. यावेळी नागरिकांनी मुलांच्या परीक्षा होई पर्यंत अतिक्रमण काढू नये अशी अधिकाऱ्यांना विचारणा केली…
मुंबईकडून कोकणाच्या दिशेने जाणारी भरधाव कारने मागून कंटेनरला धडक दिली. अपघातात एकाच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. उर्वरित तीन जखमीवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड जवळच्या पुई गावाजवळची घटना आहे. अपघातग्रस्त कार मध्ये अडकलेल्या एकाला हायड्रॉलिक कटरच्या सहाय्याने बाहेर काढलं आहे..
10 महिन्यांत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1 हजार 187 गुन्हे दाखल झाले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या 10 महिन्यांत (जानेवारी ते ऑक्टोबर) मुलींच्या अपहरणाचे 1 हजार 187 गुन्हे दाखल झाले आहेत, म्हणजेच दिवसाला सरासरी चार ते पाच मुली बेपत्ता होत आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. आंदोलनामुळे त्रंबक रोडवरील सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने येथे आंदोलनास बंदी घालावी असा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. आंदोलकांच्या फक्त पाच व्यक्तींच्या शिष्टमंडळाला जिल्हा परिषदेत निवेदन देण्यास अनुमती द्यावी तर आंदोलनासाठीपर्यायी जागा गोल्फ क्लब, ईदगाह मैदान येथे परवानगी देण्यात यावी.. असं पत्रात म्हटलं आहे.
काँग्रेसचे कार्यकर्ते शेकोटी पेटून रात्र जागून काढत आहेत… सत्ताधारी पक्ष मत चोरी करेल म्हणून पहारा देत असल्याची भावना अनेकांच्या मनात आहे. निवडणूक आयोगाच्या नावाखाली भाजप सरकार षडयंत्र रचत आहे. स्ट्रॉंग रूमला पहारा देणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी असे आरोप केले आहेत.