Municipal Election Date : मुंबई, ठाणे ते संभाजीनगर… कोणकोणत्या पालिकांची निवडणूक रंगणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर!
राज्यात महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होईल. तसेच 16 जानेवारीला मतमोजणी केली जाईल.

Municipal Election Date : राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित करत राज्यातील मुंबई, ठाणे पालिकांसह एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर आता आचारसंहित लागू झाली आहे. या महापालिकेच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. दरम्यान, या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक केंद्रस्थानी असणार आहे. असे असले तरी राज्यातील इतरही काही महापालिकांत चुरशीची लढत होणार आहे. त्यामुळे या पालिकांमध्येही कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता असणार आहे. त्याुळेच राज्यात मुंईसह इतर कोण-कोणत्या 29 महापालिकांची निवडणूक होणार आहे? ते जाणून घेऊ या…
राज्यात कोणकोणत्या महापालिकांची निवडणूक होणार आहे?
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, मिरा भाईँदर, वसई विरार, पनवेल, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, मालेगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाडा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर
महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम काय?
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील सर्वच 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यानंतर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी केली जाईल. इच्छुक उमेदवारांना 23 ते 30 डिसेंबर 2025 या काळात उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तर 31 डिसेंबर 2025 रोज अर्चांची छाननी होईल. उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026 असेल. उमेदवारांना चिन्हांचे वाटप आणि अंतिम उमेदारांची यादी 3 जानेवारी 2026 रोजी जाहीर केली जाईल.
दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार
दरम्यान, राज्यात महापालिकेच्या निवडणुकीच घोषणा होण्याआधी विरोधकांनी मतदार याद्यांबाबत गंभीर आक्षेप नोंदवले होते. अनेक ठिकाणी मतदार याद्यांत घोळ आहे. काही ठिकाणी तर दुबार मतदार आहेत, असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर तोडगा म्हणून आता दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार मार्क दिसेल, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. त्या मतदाराला मतदान नेमके कुठे करणार, याची विचारणा केली जाणार आहे.
