AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2026 Date : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, 15 जानेवारीला मतदान, जाणून घ्या A टू Z निवडणूक कार्यक्रम!

राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित करून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मुंबईत निवडणुकीचे बिगूल वाजले असून आचारसंहिता लागू झाली आहे.

BMC Election 2026 Date : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, 15 जानेवारीला मतदान, जाणून घ्या A टू Z निवडणूक कार्यक्रम!
bmc electionImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 15, 2025 | 4:33 PM
Share

BMC Election Schedule : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुंबई महानगपालिका निवडणुकीची चर्चा आहे. या निवडणुकीची कधी घोषणा होणार, याची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीची कधीही घोषणा होण्याची शक्यता लक्षात घेता राज्यातील सर्वच महत्त्वाचे पक्ष कामाला लागले होते. शिवसेनेचा शिंदे गट आणि ठाकरे गट आणि भाजपा या तिन्ही पक्षांसाठी ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची आहे. त्यामुळेच काहीही झालं तरी ही निवडणूक जिंकायचीच असा प्रणच या पक्षांनी केला आहे. दरम्यान, ही निवडणूक कधी लागते, असे विचारले जात असतानाच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मुंबई पालिकेच्या निवडणुकीची तारखी अखेर जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार आता मुंबईत महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी 2026 या तारखेला होणार असून निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे.

मुंबईत 11 लाख दुबार मतदार

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदारांना एकच मत द्यावे लागेल. सोबतच मुंबईत एकूण 10 हजार 111 मतदार केंद्र असतील. मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार आढळले आहेत. या मतदारांना तुम्ही नेमकं कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार, असे विचारण्यात येईल. तसेच या दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार असे नमूद असेल.

निवडणूक आयोगाने नेमके काय सांगितले?

आज (15 डिसेंबर) राज्य निवडणूक आयोगाने अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन मुंबई पालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आता मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठीचे मतदान 15 जानेवारी या तारखेला होणार आहे. तर मतमोजणी 16 जानेवारी 2026 या तारखेला केली जाईल. निकालही याच दिवशी घोषित केला जाईल. निवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 या काळात अर्ज करता येतील. तर 2 जानेवारी 2026 या तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. निवडणूक आयोग 31 डिसेंबर 2025 या तारखेपर्यंत अर्जांची छाननी करेल.

मुंबईत कोण मारणार बाजी?

मुंबईत एकूण 227 जागांसाठी ही निवडणूक आयोजित केली जाईल. या सर्व जागा जिंकण्यासाठी तसेच मुंबई महापालिका निवडणुकीत आपलाच विजय व्हावा यासाठी राजकीय डावपेच आखले जात आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजपा आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असे तिन्ही पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काहीशी फूट पडल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असे सांगितले आहे. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या ठाकरे यांचा शिवसेना पक्ष मनसेसोबत युती करून ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.