
मध्य रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. त्यामुळे लोकल 30 ते 35 मिनिटं उशिराने धावत आहेत. कर्जत आणि बदलापूर दरम्यान सुरू असलेल्या कामामुळे वेळापत्रकावर परिणाम झाल्याची माहिती समोर येत आहे. दृश्यमानता कमी झाल्याने देखील रेल्वे उशिराने धावत आहे आणि त्याचा एक्स्प्रेसवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. तर दुसरीकडे अपघाताची माहिती देखील समोर येत आहे. बार्शी तालुक्यातील जांभळबेट पुलावर मालट्रक आणि कारचा समोरासमोर झालेल्या अपघातात कारचा चुराडा झाला आहे. नवविवाहित दाम्पत्य तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात नवरा नवरीचा जीव वाचला. मात्र कारमधील 7 पैकी 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. निवडणुकांबद्दल देखील महत्त्वाची माहिती आहे. नगरपरिषद निवडणुकांसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यात सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिन्नर आणि पिंपळगाव मध्ये तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्र्यंबकेश्वर मध्ये सभा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील नाशिक जिल्ह्यात भगूर, पिंपळगाव आणि ओझर या नगरपरिषदांसाठी तीन सभा होणार आहेत… यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
बदलापूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार संपला
उद्या थेट नगराध्यक्ष पदासह 43 जागांसाठी मतदान
कोण होणार बदलापूरचा नगराध्यक्ष?
बदलापुरात नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत
प्रचाराच्या व्यस्ततेतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्नर येथे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या दोन सख्या भावंडांच्या कुटुंबीयांची भेट घेत कुटुंबाचं सांत्वन केलं आहे. जुन्नर शहराच्या इदगाह मैदानाजवळ असलेल्या शेततळ्यात बुडून आफान अफसर इनामदार (वय १० वर्षे) आणि रिफत अफसर इनामदार (वय ७ वर्षे) या दोन सख्या भावंडांचा २२ नोव्हेंबर रोजी दुर्देवी मृत्यू झाला होता, त्यानंतर आज शिंदे यांनी या कुटुंबाची भेट घेत त्यांना आधार दिला आहे.
16 जिल्ह्यातल्या 25 नगरपालिका क्षेत्रात जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द
न्यायालयीन अपिलांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलल्याने सुट्टी करण्यात आली रद्द
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड आणि धर्माबाद या दोन नगरपालिकेचा यात समावेश
काही ठिकाणच्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीला स्थगिती दिल्यामुळे सुट्टी रद्द
रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटानं पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.“जिथे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीमध्ये लढत आहेत, तिथे नक्कीच भाजपा आणि शिवसेना विजय होतील. आणि जिथे शिवसेना एकटीच लढत आहे तिथे शिवसेना नक्कीच विजय होईल” असा दावा करतानाच शिवसेना शिंदे गटानं तीन तारखेला दूध का दूध पानी का पानी होईल असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाला टोला लगावला आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती ‘अत्यंत गंभीर’ असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
श्रीगंगानगरमध्ये एका मोठ्या कारवाईत, राजस्थान पोलिसांच्या सीआयडी इंटेलिजेंस विंगने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या पंजाबमधील एका तरुणाला अटक केली आहे.
वंदे मातरमच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त लोकसभेत गुरुवार किंवा शुक्रवारी विशेष चर्चा होण्याची शक्यता आहे. ती संपूर्ण दिवस चालण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी लोकसभेतही भाषण करतील. राज्यसभेत पुढील आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
अमृतसरच्या काउंटर इंटेलिजेंस विभागाने एका मोठ्या यशात, पाकिस्तानशी संबंधित आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. एका तस्कराला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून 5 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले.
जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची सांगता सभा सुरु असून या सभेला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, मेहबूब शेख, नितीन बानगुडे पाटील, सचिन खरात उपस्थित आहेत.
60-65 वर्ष एका विचारच सरकार होत, ते फक्त गावाचा विचार करत होते, पण त्यांनी शहरांचा विचार केला नाही, लोक गावाकडून शहरात आली, मग समस्या निर्माण झाल्या आणि अतिक्रमण, कचरा समस्या निर्माण झाल्या आणि शहर बकाल झाली, जीवन मान खाली घसरले. ग्रामीण भागात साडे सहा कोटी लोक राहतात, त्याच प्रमाणे आळंदी सारख्या शहरात साडे सहा कोटी लोक राहतात. म्हणून पहिल्यांदा या शहराच्या विकासाचा विचार पंतप्रधान मोदी यांनी केला आणि 65 वर्षानंतर पहिल्यांदा मोदी यांनी शहराच्या विकासासाठी योजना आणल्या असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलण्यास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जबाबदार आहेत असा आरोप एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी आरोप केला आहे. बॅट्समन आमचा होता, बॉलर आमचा होता, पिच आमचा होता, पण आम्ही मॅच जिंकणार हे समजताच रडीचा डाव खेळून थर्ड अंपायरच्या माध्यमातून मॅच पुढे ढकलली असे लांडगे यांनी म्हटले आहे.
जुन्नरमधील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. लाडकी बहीण योजना ही माझी आवडती योजना आहे. ही योजना कधीही बंद होणार नाही मी शब्द देतो. लाडक्या बहिणीला स्वतःच्या पायावरती मला उभ करायचे आहे, लाडक्या भावांनाही स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवचचा दिवस आहे. अशातच आज बदलापूर मध्ये तिसऱ्या आघाडीच्या उमेदवाराच्या कार्यालयावरील बॅनर फाडल्याची माहिती समोर आली आहे. भाजपला पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा बॅनर फाडला आहे. कविता सकट त्यांच्यासह पाच उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता.
सांगलीच्या जत मध्ये भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘महालक्ष्मीला कुठे बसायचं कळतय, महालक्ष्मी कमळावर बसली आहे, त्यामुळे कमळावर बसून लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे. या सभेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह जत नगरपरिषदेतील उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरा भाईंदर ते दिल्ली पदयात्रेला मराठी एकीकरण समितीने पाठिंबा दिला आहे. लहान मुलींवरील अत्याचार, हत्या आणि विकृतीविरोधात कठोर कायदे व तात्काळ अंमलबजावणीची मागणी करत ही पदयात्रा सुरू झाली आहे. काही दिवसांनी ती राजधानी दिल्लीत पोहोचणार आहे.
चंद्रपूरमधील मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता समर्थ आणि काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार्थ प्रसिद्ध गौतमी पाटीलच्या उपस्थितीत मूल शहरात आज भव्य असा रोड शो काढण्यात आला आहे. या रोड शोला नागरिकांचा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठया संख्याने उपस्थिती.
मिरा–भाईंदरमधील डोंगरी परिसरातील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्प सरकारने अखेर रद्द केला आहे. लवकरच याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या गेल्या काही काळापासून पक्षात नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता यांनी NCP शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांचा राजीनामा पक्षाकडून अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याच्या बैठका सुरु. आज 4 वाजता शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमदेवारांची बैठक होणार. पुणे शहरातील 8 विधानसभा मतदार संघाच्या बैठका घेऊन इच्छुकाच्या मुलाखती घेतल्या जाणार. त्याचबरोबर सर्व मतदार संघातील मतदार याद्या तपासल्या जाणार असल्याची माहिती.
शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी नाव न घेता भाजपच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर जिंतूर येथे केली टीका. ज्यांना सत्तेचा माज आलेला आहे त्यांना सत्तेतून बाहेर ठेवा आणि आपल्यातून माणूस निवडण्याचा प्रयत्न करा, अशी टीका परभणीच्या जिंतूर येथे शिंदे गटाचे आमदार माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर केली
मालेगाव येथील चिमुकलीच्या अत्याचार आणि खूण प्रकरणातील आरोपीची आजही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुनावणी. आरोपी विजय खैरनार याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 11 डिसेंबर पर्यंत आरोपीला न्यायालयीन कोठडी राहणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथील भाषणात, 5 तारखेला आमच्या सरकारला एक वर्ष होतील, अनेक जण म्हणाले हे निवडूण आले की लाडकी बहीण योजना बंद होईल. मात्र सरकारला एक वर्ष पूर्ण होईल- मात्र लाडकी बहीण योजना बंद झाली नाही. आता आम्हाला लकपती दीदी करायचे आहे असे म्हटले.
अनगर नगरपंचायतीच्या स्थगितीवरून उमेश पाटलांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राजन पाटलांना आता तिसऱ्यांदा फुगड्या खेळण्याची संधी मिळावी. मात्र वयोमानानुसार त्यांचा पाय घसरून पडू नये याची काळजी त्यांनी घ्यावी. आमचे अपील कोर्टाने फेटाळले असले तरी आम्ही या निर्णयविरोधात हायकोर्टात जाणार आहोत असे उमेश पाटील यांनी म्हटले.
वर्धा – – देवळी येथे युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात देवळी जनशक्ती आघाडीचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. दोन तारखेची निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलल्यामुळे आंदोलन सुरू असून आंदोलनात जनशक्ती आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरण ठाकरे तसेच अपक्ष उमेदवार उमेदवारांचा सहभाग आहे.
भाजपमधील नवीन शिकाऊ काहीही बोलतात, मी बावनकुळे यांचा बाप काढलेला नाही, मी गडकरींचीच भाषा वापरली – नाना पटोले यांचं स्पष्टीकरण. आई-वजिलांना बोलले, असं म्हणून हे लोकं सहानुभूती घेतात, असा आरोपही त्यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर – ठाकरेंच्या शिवसैनिकांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर केली घोषणाबाजी,निवडणूनक रद्द झाल्याने ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली असूवन वातावरण तापलं आहे.
अनेकजण म्हणाले लाडकी बहीण योजना बंद करतील. जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहिण योजना सुरूच राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमधील सभेत म्हणाले. पुढच्या वर्षीपर्यंत कोटी बहिणी लखपती दिदी असतील. तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे राहा. कमळाची काळजी तुम्ही करा. पुढची पाच वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ असं त्यांनी सांगितलं.
पैठणमध्ये एकनाथ शिंदे सभेदरम्यान चिडले. एकनाथ शिंदे खासदार आणि कार्यकर्त्यांवर चिडल्याचं पहायला मिळालं. भाषणाला उशीर होत असून लवकर भाषण घ्यावं यासाठी शिंदे चिडले होते.
बीड- छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप असलेली भेट मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आलेल्या तरूणाला अडवलं. तरूणाने मुख्यमंत्र्यांना भेट देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला अडवण्यात आलं. आधी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्याला व्यासपीठावर येऊ नये असे सांगितलं. यानंतर सुरक्षा रक्षकाने त्याला रोखलं. यामुळे व्यासपीठाच्या समोरच काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी अंबादास दानवे यांची भेट घेतली आहे. निवडणुकांच्या चर्चेसाठी आम्ही एकत्र आलो, अशी प्रतिक्रिया दानवेंनी दिली आहे. मतदार यादीतील घोळ आंदोलनाने मिटणार नाही, असंदेखील ते म्हणाले.
नाशिक- उद्या होणाऱ्या मतदानासाठी मतदान साहित्य वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. उद्या 11 नगर परिषदांसाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात एकूण 416 मतदान केंद्रे असून 3,72,543 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महायुतीत अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती आहेत. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 56 उमेदवार रिंगणात असून नगरसेवक पदासाठी 1028 उमेदवार रिंगणात आहेत.
राजगुरुनगर येथील भर सभेतून अजित पवारांनी “बाबा लोकांचे ऐकावे लागते, कोणत्या बाबा लोकांचे ते तुम्ही ठरवा,” असं मिश्किल विधान केलं. राजगुरुनगर येथील सभा सुरु असताना अजित पवारांना राष्ट्रवादीचे नेते बाबा राक्षे हे काही मुद्दे देत असताना आता मला शिकवायला लागलेत, आता असं तसं बोला, माझं टक्कल पडलं तरी हे मलाच शिकवतात काय करावं असं म्हणत अजित पवारांनी बाबा राक्षेंच्या कृतीवरून मिश्किल टिप्पणी केली.
छत्रपती संभाजीनगर- उबाठाचे नेते आणि अंबादास दानवे यांच्या भेटीला मनसे पदाधिकारी गेले आहेत. मनसे जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकरसह शहरातील पदाधिकारी अंबादास दानवे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मुंबईप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे, उबाठाकडे युती आणि जागांची मागणी करणार आहेत.
“उद्याच्या नगरपालिका निवडणूक निकालानंतर शहाजीबापू पाटील यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल” माझी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांची टीका. “काल झालेली कारवाई एकट्या शहाजी बापूंच्या कार्यालयावर झाली नसून आमच्या ही कार्यालयावर झाली आहे. परंतु आम्ही शहाजी बापू पाटलांसारखं या कारवाईचं राजकीय भांडवल केलं नाही” असं दीपक आबा साळुंखे पाटील म्हणाले.
जतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि गाडीवर करण्यात आली दगडफेक. दगडफेकीमध्ये सुरेश शिंदेंच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान. पहाटेच्या सुमारास अज्ञातांकडून करण्यात आली दगडफेक. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांचा आरोप. माजी आमदार विलासराव जगतापांनी केला आरोप.
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे चिमुकली अत्याचार आणि खून प्रकरण. आज आरोपी विजय खैरनार याला मालेगाव न्यायालयात करणार हजर. 27 तारखेनंतर आज चार दिवसाची पोलीस कोठडी संपेल. आरोपीच्या मागील सुनावणी वेळचा प्रकार बघता मालेगाव न्यायालयाला पोलीस छावणीचे स्वरूप.
धुळ्यात गुरुदाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला. तलवारीने हल्ला. गुरुद्वारामध्ये बाबा धीरज सिंग वर्तमान वाचत असताना सेवेकऱ्याने केला हल्ला. हल्ल्यात रणवीर बाबा सह एक जखमी. नाशिक येथील उमेश नामक सेवेकऱ्याने केला हल्ला.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील अत्यंत गजबजलेला परिसर असलेल्या काळेवाडी विजयनगर येथे २७ ते २८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी एसएस सिक्युरिटी नावाच्या दुकानात मोठी चोरी झाली. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे. काळेवाडी येथील शॉप नंबर १, एप्पल प्रकृती बिल्डिंग येथील दुकानाचे कुलूप चोरट्यांनी अत्यंत कौशल्याने तोडले, त्यातील कपाटे फोडून चोरट्यांनी १३ तोळे सोनं आणि रोख रक्कम, असा लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरीच्या घटनेनंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले असून त्यांनी पोलिसांच्या गस्तीवर थेट सवाल उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा पैठण शहरात प्रचारसभा पार पडणार आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोहिनी लोळगे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी देवेंद्र फडणवीस आज पैठणमध्ये सभा घेत आहेत. माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड,रावसाहेब दानवे,मंत्री अतुल सावे यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे,आमदार विलास भुमरे यांच्या होम ग्राउंडवरून फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
शहाजीबापूंच्या कार्यालयात एलसीबी भरारी पथकाकडून तपासणी केली जात आहे. सांगोल्यात शहाजीबापूंची सभा संपताच पोलीस कार्यालयात दाखल झाले. यावेळी कार्यालयात व्हिडीओ रेकॉर्डिंग करत तपासणी करण्यात आली. गेल्या अर्धा तासापासून ऑफिसची तपासणी सुरु
नाटक करण्यासाठी बऱ्याच जागा आहेत. संसदेत निव्वळ घोषणाबाजी नको. त्याऐवजी नीतीवर काम व्हावे. काही जण पराभव पचवू शकत नाही – पंतप्रधान मोदी
हिवाळी अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार टोला लगावला आहे. विरोधकांनी बिहारच्या पराभवातून बाहेर यावे. त्यांनी आपली जबाबादारी पार पाडावी, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
संजय राऊत हे दररोज काहीतरी बोलत असतात. त्याला मी कालही उत्तर दिले नाही. आजही दिलं नाही. कारण त्यांनी केलेली विधान मी उत्तर देण्याच्या लायकीचे समजत नाही – देवेंद्र फडणवीस
संजय राऊत बरे झाले ही आनंदाची गोष्ट आहे. ते बरे झाले याबद्दल मला अतिशय आनंद आहे. ते त्यांचं काम करतात आम्ही आमचं काम करतो. पण कोणीही आमचा शत्रू नाही. ते आमचे राजकीय विरोधक आहेत – देवेंद्र फडणवीस
कारचं नियंत्रण सुटल्याने अपघात कार संरक्षक कठड्याला जाऊन धडकली. अपघातात दोघेजण जखमी. या परिसरात रस्त्याची काम सुरू असल्यामुळे चालकाला अंदाज न आल्याने अपघात. मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक एक तासापासून विस्कळीत. घोटी पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळावर दाखल. अद्यापही एक जण कार मध्ये अडकलेला असल्याने त्याला काढण्याचे शर्तीचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू
12 कोटी निधीत दुरुस्तीला वेग..काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करा.. चव्हाण यांच्या ठेकेदारांना सूचना तर सहा महिन्यांत काम पूर्ण करत नाट्य रसिकांना नाट्यगृह पुन्हा खुले करण्याचा चव्हाण याचा निर्धार
डोंबिवली येथे कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करून फरार झालेल्या पतीने ट्रेनसमोर उडी मारून केली आत्महत्या. पोलीस तपासात आरोपीची ओळख पटली; तणावातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय
यामध्ये बहुचर्चित अनगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला देखील स्थगिती देण्यात आली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत आदेश काढले आहे.
दहा दिवसांत तब्बल हरकतींचा आकडा 4, 737 वर. मतदारयादीतील दुबार नावे, मयत व्यक्तींचा समावेश, चुकीच्या प्रभागात नावे टाकणे अशा विविध गंभीर त्रुटींमुळे हरकती. गंभीर त्रुटींमुळे नागरिक, राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांत नाराजी
टिटवाळा येथील निलंबी गावातील तलावात बुडून सूर्या नायडू नावाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र हा अपघात नसून घातपात झाल्याचा आई-वडिलांनी गंभीर आरोप केलेत. आमदार सुलभा गायकवाड यांनी कुटुंबाची भेट घेत संबंधित पोलिसांना फोनवरून जाब विचारत योग चौकशी करून सत्य बाहेर काढत कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तर कल्याण ग्रामीण टिटवाळा पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू करत कुटुंबांना योग्य न्याय मिळणार असं आश्वासन देखील दिलं आहे.
लग्नाचे आमिष, बलात्कार, मोबाईल हॅकिंग आणि अश्लील व्हिडिओंचा वापर करत अत्याचार केले. गुन्हा दाखल होण्याची कल्पना मिळताच फरार झालेल्या आरोपी विनीत गायकरला अखेर दीड महिन्यांच्या पाठलागानंतर फडके मैदानात परिसरातून पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता आरोपीला तीन तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून.. इतर मुलींनाही ब्लॅकमेल केल्याची शक्यता असून खडकपाडा पोलिसांचा तपास सुरू आहे.
डोंबिवली येथे कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करून फरार झालेल्या पतीने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. पोलीस तपासात आरोपीची ओळख पटली आसून तणावातून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
हिराववाडीतील रहिवासी असलेले तेजस व्यास आपल्या कारमध्ये ओझर होऊन आडगाव नाक्याकडे येत असताना कारला लागली अचानक आग लागली. प्रसंगवादन राखत कारचालक वेळीच बाहेर पडल्याने मोठी हानी टळली. स्थानिक लोकांनी अग्निशामक दलाला माहिती कळवल्याने अग्निशामक दलाची कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विजवली. बर्निंग कारच्या थरारमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. कारला नेमकी कशी लागली याबाबत मात्र अद्याप माहिती समोर आलेली नाही.
कॅनडातून पतीने पत्नीला फोन करून तीन वेळा तलाक उच्चारत पत्र पाठवले… “मैं पूरे होशो हवास के साथ तुम्हें तलाक देता हूँ” असे लिहून दस्तऐवज पाठविले… पत्नी भारतात, पती कॅनडात असताना ऑनलाइन तलाक देण्याचा प्रयत्न करण्यात आाला आहे. पत्नीच्या तक्रारीनुसार पती, सासू-सासरे यांनी हुंडा, मानसिक-शारीरिक छळ केला. 2021 च्या मुस्लिम महिलांचे विवाह अधिकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्या केलेल्या नेहा पवारला जादू टोन होण्याची भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता आसा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. नेहाच्या सासरी पोलिसांनी घर झडती घेतली असता एका भिंतीवर बिब्बा आणि त्याला नागाच्या आकाराचा खिळा ठोकलेला पोलिसांना मिळाला… पोलिसांनी घेतलेल्या घर झडतीत धक्कादायक बाब समोर आली आहे.