
चिकलठाणा विमानतळाचं ‘छत्रपती संभाजीनगर विमानतळ’ असं नामकरण करण्याचं केंद्र सरकारकडून परिपत्रक निघालं आहे. परंतु ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’असे नामकरण करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे ‘छत्रपती संभाजीनगर विमानतळ’ असे नामकरण करणे सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाने थांबवलं आहे. लवकरच नामकरणाचे सुधारित परिपत्रक निघणार आहे. नागपूर महानगरपालिका मतदार यादी बाबत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. महानगरपालिकेच्या मतदार यादीवर आतापर्यंत 1हजार 327 हरकती नोंदविण्यात आल्या.
दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील लक्ष्मी नगर झोन मध्ये सर्वाधिक 663 हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. 2017 च्या झालेल्या महानगर पालिका निवडणुकीत प्रारूप मतदार यादीवर जवळपास 535 आक्षेप नोंदविण्यात आले होते. यावेळी मात्र तब्बल 1 हजार 327 आक्षेप आले आहेत. ही संख्या दुपटीहून अधिक असल्याचं दिसून येते.
सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे या नाशिक तपोवनात दाखल झाल्या आहेत. नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडांची त्या पाहणी करणार आहेत. तपोवनातील वृक्ष तोडीचा मुद्दा सध्या चर्चेत असून वृक्ष तोडीला विरोध करण्यासाठी करुणा मुंडे नाशिकमध्ये दाखल झाल्या आहेत.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची कन्या राजकुमारी ऋणालीराजे आणि चिरंजीव रविराज यांच्या विवाहास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत वधु-वरांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आहेत.
पिंपरी- चिंचवड शहरातील वल्लभनगर येथील किल्लेदार गार्डनसमोर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एक इसम इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर चढला होता.याबाबत नागरिकांनी तक्रार करताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी ताबडतोब धाव घेत सदर व्यक्तीची सुखरूप सुटका केली आहे.
विवेक कॉलेजजवळ बुरखाबंदीविरोधात आंदोलन सुरू केल्यानंतर पोलिसांनी भाजप, बजरंग दल आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांना गोरेगाव पोलिस ठाण्यात आणले आहे. गोरेगाव पोलिस ठाण्यातही वातावरण तंग झाले आहे.
प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी घेतली सक्षम ताटेच्या कुटुंबाची भेट, आंचलचे केले सांत्वन
कुटुंबाला एक कोटींची आर्थिक मदतीची मागणी
आचल मामीडवार हिला पोलीस दलात तर सक्षमच्या भावाला शासकीय सेवेत घेण्याची मागणी
उद्या मुंबईत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्याची घेणार भेट
इगतपुरी शहरात दत्तजयंतीचा उत्साह
खालची पेठ येथील दत्तमंदिरापासून भव्य शोभा यात्रेला सुरुवात
जोगेश्वरी येथील कानिफनाथ मंदिरापर्यंत जाणार शोभायात्रा
महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले हजारो भक्त मिरवणुकीत सहभागी
बाल नवनाथ, बाल वारकरी, विठ्ठल रखुमाई, शिव पार्वती यांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी वेधले लक्ष
टाळ मृदुंग ढोल ताशा व पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघाली शोभायात्रा
संपूर्ण शहराचे वातावरण चैतन्यमय
महाआरती व महाप्रसादाने होणार दत्त जयंती उत्सवाची सांगता
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतीतील ईव्हीएम मशीन छेडछाड प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. आज या प्रकरणाचा निषेध व्यक्त करत सालेकसातील नागरिकांसह भाजप वगळता सर्व उमेदवारांनी एकत्र येत मोर्चा काढला आणि तहसील कार्यालयात निवेदन सादर केले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाली असल्याचा आरोप करत मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा ठपका ठेवत, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ल
गुंडगिरी करणाऱ्या आरोपीला मालवणी पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. आरोपीची दहशत संपवण्यासाठी पोलिसांनी त्याची धिंड काढली आहे. तीन दिवसांपूर्वी या आरोपीने मालवणी पोलिसांसोबत गुंडगिरी केली होती, त्यानंतर आता पोलिसांनी या आरोपीची धिंड काढली आहे.
नागपूरात मध्यरात्री नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुण आणि त्याचीच नातेवाईक असलेल्या मुलीसोबत जखमी अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेजाऱ्यांनी दोघांना रुग्णालयात नेले असता युवकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर मुलगी जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहे.
जळगावातील चोपडा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी भाव नसल्याने आर्थिक संकटात सापडला आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने संपूर्ण लागलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना कांदा लागवडीपासून ते काढणी पर्यंत चा खर्च निघेल की नाही या चिंतेत कांदा उत्पादक शेतकरी सापडला आहे.
गोरेगाव विवेक महाविद्यालयातील बुरखाबंदीविरोधात विद्यार्थिनींनी सुरू केलेला आंदोलन सध्या थांबला आहे. पण या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या एमआयएमविरुद्ध मनसे आक्रमक झाली आहे. मनसे विभागाध्यक्ष वीरेंद्र जाधव म्हणाले की, तुम्ही कॉलेजबाहेर आंदोलन करू शकत नाही, आम्ही तुमच्या धर्माविरुद्ध नाही पण कॉलेजमध्ये आंदोलनाला परवानगी दिली जाणार नाही.
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी यांना थोड्या वेळात कोर्टात हजर केल जाईल. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजसानीला अटक करण्यात आली.
रशियाचे अध्यक्ष पुतिन हे भारताच्या दाैऱ्यावर असून ते नुकताच रवाना झाले आहेत. दोन दिवसांच्या भारत दाैऱ्यावर पुतिन आहेत.
शीतल तेजवानीला थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे. शीतल तेजवानीला थोड्याच वेळात पुणे सत्र न्यायलयात हजर केलं जाणार आहे. शीतल तेजवानीकडून पार्थ पवार यांच्या कंपनीला बेकायदा जमीन विक्री करण्यात आली होती.
नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून व्हरायटी चौकात आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. वन विभागाचे मुख्य कार्यालय नागपूर येथून मुंबईला हलवण्याचा कट महाराष्ट्र सरकार करत असल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला.
विदर्भात सर्वाधिक वन असताना वन विभागाचे कार्यालय मुंबईला हलवण्याचा घाट घातला जात आहे. विदर्भात वन आहे म्हणून वनविभागाचे मुख्य कार्यालय नागपुरातच असावे,अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे.
गोरेगावमधील विवेक कॉलेजमध्ये बुरखाबंदी केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. या बुरखाबंदीवरुन वादाला तोंड फुटलं आहे. विद्यार्थ्यांकडून बुरखाबंदी हटवण्यासाठी आंदोलन केलं जात आहे. एमआयएम नेत्या जहांआरा शेख आंदोलनात सहभागी झाल्या.
मालेगावात चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल मालेगावकरांनी उपस्थित केला आहे. 10 दिवसांत 8 मुलींवर लैंगिक अत्याचार झाला. त्यानंतर आज पुन्हा 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. मालेगाव किल्ला आणि मालेगाव कॅम्प पोलिसात पुन्हा दोन गुन्हे दाखल करण्यात आले. मालेगावात लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मंत्री नितीश राणे यांनी तपोवन वृक्षतोडीवरुन विरोधकांना टोला लगावला आहे. वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का? पर्यावरणप्रेमी ईदला बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. बकरी ईदला प्राणीप्रेमी कुठे असतात? असा प्रश्न नितीश राणे यांनी उपस्थित केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी काढलेल्या मतदान यादीच्या घोळावरून मंत्री माणिकराव कोकाटे यांनी टीका केली आहे. ऑब्जेक्शन न घेता घोळ बाहेर काढणं हे राजकीय आहे जागा बदलून घेता येत असेल तर जागा बदलून घ्यावी, असं मंत्री कोकाटे म्हणाले.
तसेच पर्यावरणाचे रक्षण करावं असं आमचं मत आहे, अशी प्रतिक्रिया क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तपोवन वृक्षतोडीवरून दिली.
नाशिक सुरत महामार्गावर रात्रीपासून वाहतूक कोंडी झाली होती. दहा ते पंधरा किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. वाहनाचा अपघात झाल्यामुळे आणि रस्ता खराब असल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे. अपघात झालेली वाहने दूर केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे. पण वाहनं संथ गतीने चालत आहेत.
पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणी राजकारण तापलं आहे. तेजवानीला अटक झाल्याने आता पार्थ पवारांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोंडी केली जात आहे. असं असताना पार्थ पवार यांना अटक करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. शीतल तेजवानी यांना अटक असून थोड्याच वेळात पुणे सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
झाडं तोडून दुसरीकडे लावणं चुकीचं आहे, असं मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. लावलेली झाडं जगली पाहीजेत. माझा मुद्दा फक्त झाडाशी आहे. इतर गोष्टींशी नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच या प्रकरणी राजकारण नको असंही ते म्हणाले. दुसरीकडे, कुंभमेळा व्हावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आज संध्याकाळी 6:35 वाजता भारतात येतील. त्यांचे विमान पालम विमानतळावर उतरेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी आणि पुतिन यांच्या भेटीकडे लक्ष लागून आहे.
गेवराईमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दोन्ही गटात दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि मारहाण झाली होती. याच दरम्यान माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या कृष्णाई या कार्यालयात घुसून आठ ते दहा जणांनी पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्व नियोजित कट होता. माझा जबाब मी पोलिसांकडे दिला आहे, पोलीस दोषींवर योग्य ती कारवाई करतील असा माझा बीड पोलिसांवर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्विय्य सहाय्यक अमृत डावखर यांनी दिली आहे.
नाशिक – अहमदाबाद मार्गांवर आज पुन्हा मोठी वाहतूक कोंडी झाली. पेठ जवळील सावनघाटात 14 तासांपासून वाहतूक कोंडी आहे. एका वाहनाचा अपघात झाल्यामुळे वाहतूक ठप्प असल्याची माहिती मिळत आहे.
अक्कलकोट नगर परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर अक्कलकोट स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा खडा पहारा देण्यात येतोय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 24 तास पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जवळपास 15 पोलीस तसेच नगरपरिषदेचे 5 कर्मचारी स्ट्रॉंग रूमला पहारा देत आहेत. अक्कलकोटमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना पाहायला मिळाला होता.
“नवी मुंबईतील सोयी सुविधांचे भूखंड हे बिल्डरच्या घशात घालण्याचा संकल्प सिडको आणि राज्य सरकारने केला. पाच एकरचा भूखंड नेरूळ सेक्टर 28 ला जो जेष्ठ नागरिक दिव्यांग यांच्यासाठी आहे. 1500 कोटी रुपयाला तो भूखंड गामी बिल्डरला विकला जातो. भारतातील आणि राज्यातील पहिलं उदाहरण असेल की विकास आराखडा राज्य सरकारने मंजूर केल्यानंतर भूखंड विकण्याचे प्रताप सुरू आहेत. सिडकोच्या माध्यमातून राज्य सरकार हे करत आहेत,” अशी टीका मनसेच्या गजानन काळेंनी केली.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्यातील पिवळं सोनं मक्याची मोठी आवक झाली आहे. आशियातील अग्रणी बाजारपेठ लासलगावमध्ये दररोज 400-500 वाहनांतून मक्याची आवक होतेय. रोज 7 ते 8 हजार क्विंटल मका विक्रीसाठी दाखल होतोय.
मक्याला जास्तीतजास्त 1860 रुपये, कमीतकमी 1500 रुपये, सरासरी 1700 रुपये इतका प्रति क्विंटलला बाजार भाव मिळतोय. नोव्हेंबरमध्ये तब्बल 1 लाख 25 हजार क्विंटल विक्रीसाठी दाखल झालेल्या मक्याची नोंद झाली.
पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानी हिला अटक झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यांनी मुद्रांक शुल्क माफ केलं, त्यांची नाव कधी जाहीर होणार, असं म्हणत त्यांनी ट्विटमधून अनेक सवाल विचारले आहेत.
पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला ‘अखेर’ अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे..
१. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही?
२. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर…— Ambadas Danve (@iambadasdanve) December 4, 2025
छत्तीसगडच्या चकमकीत 16 माओवादी मारले गेले होते, त्यांचे शव पोलिसांनी ताब्यात घेतलं. काल संध्याकाळापासून ते रात्री साडेआठपर्यंत ही चमक झाली . या चकमकीत 16 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले, मात्र त्याच चकमकीत तीन पोलीस जवान शहीद झाले.
नागपूर – कामठी तालुक्यातील तरोडी मतदान केंद्रात गोंधळ घातल्या प्रकरणी कॉंग्रेसच्या नेत्या अवंतिका लेकुरवाळे सह १२ जणांवर गुन्हा दाखल. मतदान केंद्र प्रमुख देवानंद डोये यांच्या तक्रारीवरून पारडी पोलिसात गुन्हा नोंद. कामठी बिडगावतरोडी परिसरात घडलेल्या घटनेने जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले. 5 वाजताच मतदान बंद करण्याची मागणी करत आरडाओरड आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
शिरूर कासार तालुक्यातील श्री क्षेत्र येवलवाडी येथील जालंदथनाथ देवस्थानातील दोन दानपेट्या चोरट्यांनी रात्री 1.30 च्या सुमारास तोडुन नेल्या आहेत. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली असून तीन चोरटे यामध्ये दिसत आहेत. या संदर्भातील माहिती गावकऱ्यांनी पाटोदा पोलिसांना दिली असून पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल होत आहेत. सोने, चांदीसह रोकड अशी एकूण 50 लाखांच्या घरात दोन्ही पेट्यांमध्ये ऐवज असल्याचा देवस्थानचा अंदाज आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट मिळाले नसल्यानं कॉलेज समोर विद्यार्थी ठिय्या मांडले आहेत. परीक्षा फी भरूनही परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती आहे. हॉलतिकीट मिळाले नसल्याने काल या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात धाव घेतली. या वेळी तुमच्या कॉलेजने परीक्षा शुल्कच भरले नसल्याने हॉलतिकीट मिळाले नसल्याचे सांगितले. रात्री उशिरा हॉल तिकीट दिल्याचे विद्यापीठाने सांगितले पण मुलांना मिळाले नाही, परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी उकळून व्यवस्थापकांनी फोन केले बंद असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणे आहे. कॉलेजच्या गेटवर सर्व विद्यार्थी गोळा झाले आहेत.
साई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन मॅनेजमेंट या नावाने चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत एक कॉलेज आहे.याठिकाणी एम सी एस प्रथम वर्गातून २१० विद्यार्थी आज परिक्षा देणार आहेत. परिक्षा संदर्भात सर्व अर्ज व फिस कॉलेजमध्ये जमा केली असुन कॉलेज परिक्षेकरीता हॉल टिकीट देत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.याकरिता २१० विद्यार्थी सद्यस्थितीत कालपासून कॉलेजमध्ये ठिय्या देत आहेत.
छत्तीसगड राज्यातील बिजापूर गंगानूर येथील जंगलातील घटना काल सायंकाळी साडेचार वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत ही चकमक चालली. यात चकमकीत 16 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. चकमकीत तीन पोलीस जवान शहीद झाले होते. सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत पोलिसांनी 12 माओवादी यांचे मृतदेह सापडले आहे. त्यानंतर पहाटे शोध मोहीम राबविण्यात आली त्यात चार माओवाद्यांचे मृतदेह आढळले.पोलीस अंदाज व्यक्त करीत आहेत चकमकीत 20 ते 22 माओवादी ठार झाले असावे असा अंदाज आहे.
खासदार चंद्रशेखर आझाद आज सक्षम ताटे यांच्या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधणार आहेत. आचल मामीडवार व ताटे कुटुंबियांकडून खासदार चंद्रशेखर आझाद घटनेची माहिती घेतील. सक्षम ताटे हत्या प्रकरणाचा मुद्दा चंद्रशेखर आझाद लोकसभेत याविषयी सवाल उपस्थित करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंढवा येथील जमीन घोटाळ्याप्रकरणात द्विगविजय पाटील यांना बाहेर जाऊ देणे योग्य नसल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. त्यांनी पोलिसांवर याप्रकरणी नाराजी व्यक्त केली. तर अजित पवारांचा राजीनामा घ्या अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. पार्थ पवारांचं नाव यादीत का नाही असा सवालही त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची काही नियमावली आहे.निवडणूक केंद्रात मतदार नसताना जाणं चुकीच आहे.शिरूरच्या आमदारांनी अनेक मतदार केंद्रावर गेले,काही लोक सोबत घेऊन गेले.सायंकाळी सहा नंतर शिरूरचे आमदार त्या वाड्यासारख्या दिसणार आहे का मतदान केंद्रावर गेले.मी त्या ठिकाणी पोहचलो त्यावेळी विद्यमान आमदार त्या केंद्रावर होते. तुम्ही विद्यमान आमदार असताना नियमावली डाउनलोड केंद्रात जाता सायंकाळी साडेपाच नंतर असं कसं जात येतं, असा सवाल माजी आमदार अशोक पवार यांनी केला.
केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यपालांना राजभवनाचे नाव लोक भवन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार नागपुरातील राजभवनचे नाव आता बदलून लोकभवन करण्यात आले. ब्रिटिश राजवटीत सिपी अँड बेरार प्रांतात असलेल्या नागपुरात 1891 साली गव्हर्नमेंट हाऊस म्हणून राजभवन बांधण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर राजभवन हे राज्यपालांचं अधिकृत कार्यालयाने निवासस्थान आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज सर्व नगरपालिका आयुक्तांची बैठक बोलावली आहे. नगरपालिका निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि मतदार याद्यांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत मतदार यादीत आढळलेल्या मोठ्या चुकांची दुरुस्ती करणे आणि पुढील कार्यवाही निश्चित करणे यावर प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे. ही महत्त्वाची बैठक आज सकाळी ११:३० वाजता आयोगाच्या कार्यालयात होणार आहे.
‘जीव दया’ आणि ‘कबूतर वाचवा’ अभियानाला बळ देण्यासाठी जैन समाजातर्फे ७ डिसेंबर रोजी मुंबईत एका विराट पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जैनमुनी निलेशचंद्र महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा कुलाबा जैन मंदिरातून सुरू होईल. हा मोर्चा लालबाग, भायखळा, डोंगरी, लोअर परळ मार्गे दादरमधील कबूतरखाना जैन मंदिरापर्यंत जाईल. या संपूर्ण मार्गावर प्रवचन आणि जागरूकता अभियान राबवून जैन समाजाला या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे. या महत्त्वाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जैनमुनी निलेशचंद्र महाराज यांनी दादर येथे पुन्हा उपोषणाचा मानस व्यक्त केला आहे, ज्यामुळे जैन समाज या प्रश्नावर आक्रमक होण्याची शक्यता आहे.
नागपूर येथील राजभवनाचे नाव बदलून आता लोकभवन करण्यात आले आहे. नागपूरचे राजभवन हे ब्रिटिश राजवटीत १८९१ साली गव्हर्नमेंट हाऊस म्हणून बांधले गेले होते. स्वातंत्र्यानंतर ते राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान व कार्यालय बनले. केंद्रीय गृह मंत्रालयाने राजभवनाचे नाव लोकभवन करण्याच्या सूचना राज्यपालांना दिल्या होत्या, त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे.
नागपूरमध्ये ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. अधिवेशनाला फक्त तीन दिवस शिल्लक असल्याने तयारीच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. यावर्षी हे अधिवेशन केवळ एकाच आठवड्याचे असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्री आणि आमदारांचे नागपुरात ७ तारखेपासून आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी रवी भवनमधील मंत्र्यांचे बंगले आणि आमदार निवास पूर्णपणे सज्ज होत आहेत. निवासस्थानांची डागडुजी आणि रंगरंगोटीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथील बोगस आयएएस अधिकारी कल्पना भागवत प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी डिंपी हरजाई याने आपला आयफोनमधील सर्व डेटा डिलीट केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा डेटा रिकव्हर करणे हे पोलिसांसमोरील एक मोठा आव्हान ठरले आहे. या डेटा रिकव्हरीसाठी सायबर तज्ञांची मदत घेतली जात आहे. आरोपी डिंपी हरजाई हा दिल्ली येथे एका केंद्रीय विभागातील अधिकाऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याच्या या भूमिकेचा वापर करून तो कल्पना भागवतच्या बनावट कामात मदत करत होता.
रांजणगाव औद्योगिक वसाहती मध्ये बिबट्या आढळून आला होता. एलजी फॅक्ट कंपनीच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे बिबट्या जेरबंद झाला आहे.बिबट्या कंपनीत मुक्त संचार करताना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने या परिसरात पिंजरे लावले होते. आज सकाळी या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे लक्षात येताच औद्योगिक वसाहतीत मोठी गर्दी जमली.
चिंचवडमधील कोयता गँगला पिंपरी चिंचवड शहर पोलीस गुंडा स्कॉडकडून अटक. स्टाइल्स दुकानामधील मॅनेजरला मारहाण करत 3 लाख 80 हजार लुटले होते. ज्या स्टाई्ल्सच्या मॅनेजरवर कोयता गँगने हल्ला केला, त्याच दुकानासमोर त्या चार आरोपीची काढली धिंड.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये बिबट्या आढळून आला होता. एलजी फॅक्ट कंपनीच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे बिबट्या जेरबंद झाला आहे.बिबट्या कंपनीत मुक्त संचार करताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने या परिसरात पिंजरे लावले होते. आज सकाळी या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे लक्षात येताच औद्योगिक वसाहतीत मोठी गर्दी जमली.
या प्रकरणातील आरोपी डिंपी हरजाईने आपला आयफोन मधील सर्व डाटा डिलीट केला. आयफोन मधील डाटा रिकव्हर करणे पोलिसांसमोरील मोठं आव्हान. डींपी केंद्रातील एका अधिकाऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता.काल दिवसभर तिन्ही आरोपींची दोन पोलीस उपायुक्तांनी केली चौकशी.
अमरावती-मुंबई विमानसेवा 15 दिवसासाठी बंद राहणार.दाट धुक्यामुळे प्राधिकरणाचा निर्णय. प्रवाशांना संदेशातून माहिती दिली. पुढील निर्णय हवामानावर अवलंबून प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर. 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यत अमरावती -मुंबई विमानसेवा राहणार बंद.