Maharashtra Political News live : भाजपच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस; अनेक मोठ्या घोषणा

| Updated on: Apr 15, 2024 | 8:02 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 14 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News live : भाजपच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस; अनेक मोठ्या घोषणा

इराण आणि इस्त्रायल युद्धाला सुरुवात झाली आहे. शनिवारी मध्यरात्री इराणने इस्त्रायलवर २०० क्षेपणास्त्र डागले. त्यानंतर पश्चिम देश इराणच्या विरोधात एकत्र आले आहे. भारतात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान जवळ आले आहे. १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रचारला वेग आला आहे. भाजपाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. सकाळी 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या तिन्ही उमेदवारांचा आज एकत्रित प्रचार होणार आहे. सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव पाटील एकत्रित करणार प्रचार होणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 14 Apr 2024 08:25 PM (IST)

  यशवंत भिंगे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

  नांदेड : अखेर यशवंत भिंगे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.  त्यांनी 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड लोकसभा निवडणूक लढवली होती. यशवंत भिंगे नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक होते. त्यांनी आज मलिकार्जुन खर्गे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नागपूर येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

 • 14 Apr 2024 12:41 PM (IST)

  गोळीबारानंतर पोलिस अ‍ॅक्शन मोडवर

  सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात पोलिसांचे 20 पथके तपासासाठी रवाना.

 • 14 Apr 2024 12:30 PM (IST)

  सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात सुषमा अंधारे यांचे मोठे विधान

  अभिनेता सलमान खानच्या घरासमोर घडलेली घटना ही नक्कीच गंभीर आहे. परंतू, अशा अनेक महाराष्ट्रात घटना घडत आहेत, गाव खेड्यात महिलांची धिंड काढली जातेय, शाळा, कॉलेजमध्ये मुली सुरक्षित नाहीत. दुसरीकडे करोडो रुपयांच ड्रग्स सापडत आहेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

 • 14 Apr 2024 12:13 PM (IST)

  डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक उपकार आपल्यावर आहेत- चंद्रकांत पाटील 

  संपूर्ण देशाला त्यांनी दिलेली घटना फार मोठी देणगी आहे. पुढचे हजार वर्ष घटनेचा मूळ भाव बदलावा लागणार नाही. जगामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.

 • 14 Apr 2024 11:50 AM (IST)

  हेमंत गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

  ठाणे- नाशिकचे खासदार हेमंत गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ-दीप निवासस्थानी दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत चर्चा केली होती. नाशिकची जागा शिवसेनेला मिळावी असा हेमंत गोडसे यांचा आग्रह आहे. नाशिकच्या जागेवरचा तिढा अजूनही कायम आहे.

 • 14 Apr 2024 11:40 AM (IST)

  भाजपच्या सर्व चिल्लर कार्यकर्त्यांनासुद्धा पोलीस संरक्षण आणि सामान्य जनता वाऱ्यावर- संजय राऊत

  भाजपच्या सर्व चिल्लर कार्यकर्त्यांनासुद्धा पोलीस संरक्षण दिलं जातंय. एकनाथ शिंदे यांच्या चिल्लर कार्यकर्त्यांना प्रचंड पोलीस संरक्षण आहे. अजित पवारांच्या चिल्लर कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण आहे आणि सामान्य जनता वाऱ्यावर आहे. सलमान खानच्या घराबाहेर झालेली फायरिंग हा इशारा नाही तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भाजप पक्ष आणि यांचं सरकार यांची पोलखोल केलेली आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले.

 • 14 Apr 2024 11:30 AM (IST)

  मुंबई, महाराष्ट्राचं संपूर्ण पोलीस खातं गद्दार आमदार-खासदारांच्या सुरक्षेसाठी तैनात- संजय राऊत

  सलमान खान हे सिने जगतातलं मोठं नाव आहे. त्यामुळे तुम्ही मला प्रश्न विचारत आहात. पण मुंबईसह महाराष्ट्राची कायदा-व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचं संपूर्ण पोलीस खातं हे गद्दार आमदार, खासदार आणि शिवसेना राष्ट्रवादीतून पक्ष सोडून गेलेल्या त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. गल्लीतला एखादा माणूस पक्ष सोडून शिंदे गटात किंवा अजित पवार गटात जातोय. त्याला सुरक्षा पुरवली जातेय, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीका केली.

 • 14 Apr 2024 11:20 AM (IST)

  माजी आमदार अभिजीत अडसूळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

  ठाणे- माजी आमदार अभिजीत अडसूळ मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. ठाण्याच्या निवासस्थानी अभिजीत अडसूळ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

 • 14 Apr 2024 11:10 AM (IST)

  सलमानच्या घराबाहेर गोळीबारानंतर वरिष्ठ पोलिसांची बैठक सुरू

  सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई गुन्हे शाखा आणि मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या संदर्भात झोन 9 डीसीपी कार्यालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांना असे अनेक सीसीटीव्ही सापडले आहेत ज्यामध्ये दोन्ही आरोपी दिसत आहेत.

 • 14 Apr 2024 11:00 AM (IST)

  Live Update : राजाभाऊ वाजे ठाकरे गटाचे उमेदवार

  राजाभाऊ वाजे नाशिक मधून ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर झाले आहेत त्यांच्या प्रचाराचे रणधुमाळी सुरू आहे. त्यासंदर्भात संजय राऊत यांची भेट घेण्यात आली.राजाभाऊ वाजे हे उमेदवार असल्याने महायुतीला उमेदवार मिळत नसल्याचे सुधाकर बडगुजर यांनी सांगितले

 • 14 Apr 2024 10:49 AM (IST)

  Live Update : विजयसिंह मोहिते लवकरच शरद पवार गटात

  अकलूजला शरद पवारांची मोठी सभा होणार आहे. त्या सभेत विजयसिंह मोहिते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली.

 • 14 Apr 2024 10:34 AM (IST)

  Live Update : वन नेशन-वन इलेक्शन

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन नेशन-वन इलेक्शनचा पुन्हा हुंकार भरला. बहुमतातील सरकार कठोर निर्णय घेऊ शकते, याकडे त्यांनी जनतेचे लक्ष वेधले.

 • 14 Apr 2024 10:20 AM (IST)

  Live Update : घरोघरी गॅस पाईपलाईनची सुविधा

  आता घरोघरी गॅस पाईपलाईन पुरविण्याचे उद्दिष्ट भाजपने समोर ठेवले आहे. देशातील प्रत्येक घराला पाईपलाईनद्वारे गॅस पुरविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

 • 14 Apr 2024 10:08 AM (IST)

  Live Update : ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमानचा लाभ

  70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेतंर्गत आणण्यात येणार आहे. गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या जाहिरनामा प्रसिद्ध केल्यानंतर सांगितले.

 • 14 Apr 2024 10:00 AM (IST)

  Live Update : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

  लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आता शंखनाद फुंकला आहे. भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, अमित शाह आणि राजनाथ सिंह यांच्यासह ज्येष्ठ नेते, पदाधिकारी हजर होते.

 • 14 Apr 2024 09:56 AM (IST)

  Live Update | पूर्ण देशाला भाजपच्या संकल्प पत्राची प्रतीक्षा असते - नरेंद्र मोदी

  10 वर्षात भाजपने सर्व संकल्प पूर्ण केले आहेत... पूर्ण देशाला भाजपच्या संकल्प पत्राची प्रतीक्षा असते... भाजपने आतापर्यंत दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली आहेत... देशातील जनतेत भाजपबाबत विश्वास... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपच्या जाहिरनाम्यात वक्तव्य...

 • 14 Apr 2024 09:38 AM (IST)

  Live Update | मंत्री हसन मुश्रीफ यांचा जयंत पाटील यांना मिश्किल टोला

  मतदारांना हेलिकप्टरमधून आणण्याच्या वक्तव्यावर टीका करणाऱ्या जयंत पाटील यांना मुश्रीफ यांनी दिलं उत्तर... मी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येण्यासाठी ते वाक्य बोललो... पण यावर टीका करायला जयंत पाटील स्वतः हेलिकप्टरमधूनच आले... त्यांनी निदान कार ने तरी यायला हवं होत... मंत्री मुश्रीफ यांचा जयंत पाटील यांना टोला

 • 14 Apr 2024 09:25 AM (IST)

  Live Update | मोदी सरकारच्या काळात अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं गेलं - नड्डा

  मोदी सरकारच्या काळात अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं गेलं... गावागावात रस्ते बनले... इंटरनेट पोहोचलं... असं देखील नड्डा म्हणाले...

 • 14 Apr 2024 09:21 AM (IST)

  Live Update | प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गरीबांना हक्काची घरं मिळाली - नड्डा

  प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गरीबांना हक्काची घरं मिळाली... प्रधानमंत्री आवास योजनेतून 4 कोटी घरं बांधली.. ग्रामीण भागातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकारचं मोठं काम... भाजपत्या जाहीरनाम्यात नड्डा यांचं वक्तव्य

 • 14 Apr 2024 08:55 AM (IST)

  पुण्यात वाहतुकीत बदल

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित् आज शहरातील पुणे स्टेशन, अरोरा टॉवर कॅम्प, विश्रांतवाडी आणि दांडेकर पूल परिसरात नागरिक अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार इतर पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे. हा बदल १३ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून १४ एप्रिल रोजी रात्री दोन वाजेपर्यंत राहील.

 • 14 Apr 2024 08:44 AM (IST)

  नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा

  खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा 20 एप्रिलला नांदेड मध्येमध्ये होणार आहे. सकाळी 11 वाजता ही सभा पार पडणार आहे. अमित शहाच्या सभेनंतर आता नरेंद्र मोदी नांदेडमध्ये सभा घेणार आहे.

 • 14 Apr 2024 08:29 AM (IST)

  अमित शाह विदर्भ दौऱ्यावर

  देशाचे गृहमंत्री अमित शाह आज विदर्भ दौऱ्यावर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज भंडारा गोंदियाचे भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ साकोली येथे प्रचार सभा घेणार आहेत. कालच राहुल गांधी यांची साकोलीमध्ये जाहीर सभा पार पडली होती.

 • 14 Apr 2024 08:11 AM (IST)

  इराणने 200 ड्रोन्स, बॅलेस्टिक मिसाइल इस्रायलवर डागले

  इराणने इस्रायलवर भीषण हल्ला केला आहे. इराणने 200 ड्रोन्स, बॅलेस्टिक आणि क्रूझ मिसाइलद्वारे हा हल्ला केला. अजूनही हा हल्ला सुरुच आहे, असं इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आलय. सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये 1 एप्रिलला इराणच्या दूतावासावर इस्रायलकडून एअर स्ट्राइक करण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर हा ड्रोन हल्ला केला आहे.

Published On - Apr 14,2024 8:08 AM

Follow us
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.