मुलांना वाचवण्याच्या नादात नदीत बुडून तरुणासह मुलीचा मृत्यू, जळगावातील दुर्दैवी घटना

जळगावच्या भडगाव येथील गिरणा नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या काही मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणासह सोळा वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मुलांना वाचवण्याच्या नादात नदीत बुडून तरुणासह मुलीचा मृत्यू, जळगावातील दुर्दैवी घटना
नदीत बुडून दोघांचा मृत्यू
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 08, 2026 | 8:29 PM

जळगावमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. गिरणा नदीमध्ये पोहण्यासाठी उतरलेले मुलं पाण्याचा अंदाज न आल्यानं नदी पात्रात बुडू लागले. ही घटना तिथे असलेल्या एका तरुणाच्या लक्षात आली. या मुलांना वाचवण्यासाठी या तरुणाने पाण्यात उडी मारली.  त्याने दोन मुलांचा जीव वाचवला, मात्र तिसऱ्या मुलीला वाचवण्याच्या नादात या तरुणाचा आणि सोबत मुलीचा देखील बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातल्या भडगावमध्ये घडली आहे. दरम्यान नदीपात्रात अवैध वाळू उपशामुळे मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  जळगावच्या भडगाव येथील गिरणा नदीपात्रात आंघोळीसाठी काही मुलं उतरली होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं ही मुलं बुडून लागली. ही घटना तिथे उपस्थित असलेल्या तरुणाच्या लक्षात आली, त्याने या मुलांना वाचवण्यासाठी नदी पात्रात उडी मारली. दोन मुलांना वाचवण्यात यश आलं, मात्र त्यानंतर या मुलांच्या बचावासाठी नदीपत्रात उतरलेला तरुण आणि एका 16 वर्षांच्या मुलीचा बुडून मृत्यू झाला आहे.  खान नदीम खान असं या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर या घटनेत  काफिया शरीफ पिंजारी या 16 वर्षांच्या तरुणीचा देखील मृत्यू झाला आहे.

पाण्याचा अंदाज न आल्याने काही लहान मुले नदीत बुडू लागल्याचे लक्षात येताच खान नदीम खान या तरुणाने तातडीने नदीत उडी घेत दोन मुलांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र काफिया शरीफ पिंजारी या १६ वर्षीय मुलीला वाचवत असताना तो स्वतःही तिच्यासह पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. दरम्यान, नदीपात्रात अवैध वाळू उपशामुळे मोठे खोल खड्डे तयार झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Follow Us