दारू पिताय तर सावधान! गडचिरोलीत दारूमुळे असं काही झालं की दोघांचा गेला जीव

दारू पिताय तर सावधान! गडचिरोलीत दारूमुळे असं काही झालं की दोघांचा गेला जीव

विषारी दारू प्यायल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर, गडचिरोलीमध्ये अनेक गावांत दारूबंदी आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jan 21, 2021 | 6:54 AM

गडचिरोली : राज्यात आधीच कोरोना आणि बर्ड फ्ल्यूमुळे नागरिक त्रस्त असताना आता गडचिरोलीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विषारी दारू प्यायल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर, गडचिरोलीमध्ये अनेक गावांत दारूबंदी आहे. तरीही असा प्रकार समोर आल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. (two man lost their lives due to drinking poisonous alcohol 2 are serious in gadchiroli)

अधिक माहितीनुसार, दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपुर इथं हा प्रकार उघडकीस आला आहे. गावात दारू विक्रीवर बंदी असली तर मद्यप्रेमींसाठी गावठी दारूचे अनेक अड्डे गावात सुरू आहेत. अशात लक्ष्मणपुर इथं विषारी दारू बनवण्यात आली आहे. यामुळे दारूचे सेवन केल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर आहे.

या प्रकरणात पोलिसांना माहिती देऊन पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर असणाऱ्या एका रुग्णास चद्रपुर इथं पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. तर आणखी दोघांवर आष्टी ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी संबंधित दारूच्या दुकानावर जाऊन तपास सुरू केला असून दारू नेमकी कशी बनवली होती. यासाठी दारूचे काही सँपल तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले असून दारू विक्रेत्यांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इतकंच नाही तर सध्या गावातील कुठल्याही दुकानावर जाऊन दारू पिऊ नये अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. (two man lost their lives due to drinking poisonous alcohol 2 are serious in gadchiroli)

संबंधित बातम्या – 

‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद होणारा पहिला भारतीय अधिकारी, कृष्ण प्रकाश यांना ‘आयर्न मॅन किताब’

मुंबईत 1728, तर पुण्यात 1109 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस, कोणत्या शहरात किती? 

(two man lost their lives due to drinking poisonous alcohol 2 are serious in gadchiroli)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें