प्रतापगडावरील आणखी दोन कबरी कुणाच्या ? शिवकालीन कबरी नाही मग त्या कबरी कुणाच्या ?
अतिक्रमणाचा वाद कोर्टात गेला असला तरी अफझल खाणाच्या कबरीजवळ सय्यद बंडाची एक कबर असतांना जवळच काही अंतरावर आणखी दोन कंबर आढळून आल्या आहेत.

प्रतापगड : इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्या लगत असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले आहे. या ठिकाणी अफजलखानाच्या कबरी बरोबर सय्यद बंडा याची देखील कबर शेजारीच होती. मात्र अनधिकृत बांधकाम पाडत असताना या दोन्ही कब्ररींच्या काही अंतरावरच आणखी दोन कबर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आल्या आहेत. यामुळे राज्यभर खळबळ उडाली असून दोरदार चर्चा होऊ लागली आहे. याबाबत यातील एक कबर ही सेविकऱ्याची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि दुसरी कबर शिवकालीन नसल्याचे दिसून येत आहे. इतर दोन कबरी अलीकडच्या काळातील असल्याचे स्पष्ट होत आहे. या कबरीवर कोणतीही माहिती लिहिलेली नसून याबाबत जिल्हा प्रशासन माहिती घेण्याचे काम करत आहे. एकूणच प्रतापगड येथे आणखी दोन कबरी सापडल्याने इतिहासाच्या अभ्यासकांची मदत घेऊन प्रशासन अधिकचा तपास करत आहे.
अफझल खाणाच्या कबरीच्या आजूबाजूचे अतिक्रमण महाराष्ट्र शासनाने काढले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर हे अतिक्रमण काढण्यात आले आहेत.
हे अतिक्रमण काढले गेल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते, सोशल मीडियासह सर्वच ठिकाणी ही अतिक्रमण मोहीम प्रताप गड येथे राबविण्यात आल्याने स्वागत केले जात होते.
याच अतिक्रमणाचा वाद कोर्टात गेला असला तरी अफझल खाणाच्या कबरीजवळ सय्यद बंडाची एक कबर असतांना जवळच काही अंतरावर आणखी दोन कंबर आढळून आल्या आहेत.
त्यातील एक कबर ही सेवेकऱ्याची असल्याची शक्यता वर्तविली जात असून त्यावर कुठलाही मजकूर नसल्याने प्रशासनाला याबाबत ठोस माहिती देता येत नाहीये.
इतिहास अभ्यासकांच्या मदतीने या कबरी कुणाच्या आहे ? या कबरी आत्तापर्यंत का कुणाच्या निदर्शनास आल्या नाही याचा शोध आता घेणे फार गरजेचे झाले आहेत.
महाराष्ट्रातील इतिहास करांच्या मदतीने याचा अभ्यास केला जात असला तरी अतिक्रमणचा मुद्दा कोर्टात गेला असल्याने याबाबत माहिती प्रसिध्द केली जाईल की नाही याबाबत साशंकता आहे.