AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुंभमेळा घोटाळा प्रकरणात गिरीश महाजन यांच्या दोन नातेवाईकांना अटक, काय आहे नेमकं प्रकरण?

कुंभमेळा घोटाळ्यात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या दोन नातलगांना अटक करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांच्या बनावट सह्यांनी 591 कोटींची वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे.

कुंभमेळा घोटाळा प्रकरणात गिरीश महाजन यांच्या दोन नातेवाईकांना अटक, काय आहे नेमकं प्रकरण?
कुंभमेळा घोटाळ्यात महाजनांच्या दोन नातेवाईकांना अटक Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 12, 2026 | 6:59 PM
Share

कुंभमेळा घोटाळ्यात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या दोन नातलगांना अटक करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांच्या बनावट सह्यांनी 591 कोटींची वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे. दरम्यान हा गुन्हा अक्षम्य आहे, नातेवाईक असला तरी गय करणार नाही, अशी प्रक्रिया यावर गिरीश महाजन यांनी दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

35 हजार कोटी रुपयांची तरतूद असलेल्या कुंभमेळ्याच्या नियोजनावरून विरोधकांसह साधूंनी देखील प्रश्न उपस्थित केले असताना आता कुंभमेळ्याच्या नावाने राज्यात फसवणुकीचं रॅकेट देखील सुरू झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्यांच्यावर सरकारने नाशिकच्या कुंभमेळ्याची जबाबदारी सोपवून ज्यांना कुंभमेळा मंत्री केलं, त्या गिरीश महाजन यांचा नातलगच या घोटाळ्यात मास्टमांईड असल्याचं समोर आलं आहे.

बनावट वर्क ऑर्डर तयार करुन तीन कोटी 5 लाखांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या बनावट सहीनं तब्बल 591 कोटींची काम दाखवून वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे. या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातून तनय अनंत महाजन आणि नरेंद्र महाजन यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी हे गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत पाच वर्क ऑर्डर समोर आलेल्या आहेत. या वर्क ऑर्डरची किंमती ही कागदावर त्यांनी 591 कोटी रुपये दाखवली आहे. या प्रकरणात आरोपींविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

तो माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेला आहे. पूर्वीपासूनच त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. मला वाटतं यामध्ये सात ते आठ लोक सापडतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, असं महाजन यांनी म्हटलं आहे. गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत, कुंभमेळ्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे विरोधकांकडून सातत्याने कुभमेळाव्याच्या नियोजनावरून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून देखील कुंभमेळा चर्चेत आला होता.

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल