AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी खळबळ! ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? हालचाली वाढल्या!

उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार नवा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. कालच ठाकरे यांच्या खासदारांची ठाकरे यांच्या खासदारांची बैठक झाली होती.

ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी खळबळ! ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? हालचाली वाढल्या!
uddhav thackeray mpImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 17, 2026 | 4:14 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. या मोहिमेअंतर्गत ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार फोडण्याचा प्रयत्न केला जातोय, असे म्हटले जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पक्षाच्या सर्वच खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. दरम्यान आता ठाकरेंच्या याच खासदारांबाबत मोठी आणि खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. ठाकरेंचे खासदार फुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून काही खासदार वेगळा गट स्थापन करू शकतात, असे सांगितले जात आहे.

नेमकं काय घडत आहे?

मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार नवा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. कालच ठाकरे यांच्या खासदारांची ठाकरे यांच्या खासदारांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर आमचे सर्वच खासदार आमच्यासोबत आहेत. ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. ऑपरेशन टायगर काहीही नाही. आता आम्हीच ऑपरेशन लांडगा सुरू करणार आहोत, असे राऊत म्हणाले होते. परंतु आता ठाकरे यांचे काही खासदार थेट नवा गटा स्थापन करण्याच्या तयारीत आहेत, असे म्हटले जात आहेत.

दिल्लीत हालचाली वाढल्या

मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंचे काही खासदार हे लोकसभा अध्यक्षांना एक पत्र देण्याची शक्यता आहे. ठाकरे यांचे काही खासदार हे दिल्लीमध्ये शिंदे यांच्या पक्षाचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना भेटले आहेत. त्यामुळे लवकरच हे खासदार नवा गट स्थापन करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले आहे. सध्या दिल्लीत घडत असलेल्या घडामोडी लक्षात घेता ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत हे तातडीने दिल्लीला निघाले आहेत.

5 खासदार होते अनुपस्थित

दरम्यान, ठाकरेंनी 14 जून रोजी आयोजित केलेल्या खासदारांच्या बैठकीला एकूण पाच खासदार अनुपस्थित होते. त्यामुळे लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी