
छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा निघाला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे , संजय राऊत यासोबतच छत्रपती संभाजीनगरमधील महत्वाचे नेते या मोर्चात सहभागी झाले. मोर्चामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आम्हाला कर्जाचं पुनर्गठन नको. आम्हाला कर्जमाफी पाहिजे. मला अधिकार आहे. मी बोलणारच. मुख्यमंत्री असताना मी कर्जमुक्ती दिली होती. मी तुम्हाला अटीतटीत अडकवलं नव्हतं. फक्त अंगठा दिला की तुम्हाला कर्ज दिलं.
आम्हाला कर्जमाफी पाहिजे, मला बोलण्याचा अधिकार
नियमित कर्ज फेड करणाऱ्या व्यक्तीला 50 हजार देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण कोरोना आला. दीड वर्ष देता आले नाही. खोकेवाल्यांनी सरकार पाडलं. त्यामुळे मी देऊ शकलो नाही. सरकार गेलं. आमचं सरकार असतं तर कर्जमुक्ती करून दाखवली असती. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारच्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे. पण एक अट आहे. जीवन उद्ध्वस्त झालं. रब्बी पिक खरडून गेलं.
सरकारच्या पॅकेजचं समर्थन करायला तयार पण माझी एक अट
50 हजार मागत आहोत. जमिनीची हालत पाहा. मुख्यमंत्री म्हणाले, खरडून गेलेल्या जमिनीला मनरेगातून साडे तीन लाख देऊ. दिवाळीपूर्वी त्या तीन लाखातील एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात टाकाच. बाकीचं नंतर बघू असेही त्यांनी म्हटले आहे. फडणवीस सरकारच्या शेतकरी पॅकेजचं समर्थन करतो. मात्र, माझी अट आहे, असे म्हणत सरकारची फिरकी घेताना उद्धव ठाकरे दिसले.
दिवाळीनंतर राज्यातील शेतकऱ्यांना भेटणार उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
उबाठा गटाने आयोजित केलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने लोक दाखल झाले. यासोबतच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, दिवाळीनंतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी मी भेटणार आहे. शेतकऱ्यांना भेटून मदत मिळाली की, नाही हे देखील पाहणार आहे. सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. नुकताच सरकारने शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा केली. मात्र, यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला टार्गेट केले.