धनुष्यबाण चिन्ह गोठवा, उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी मागणी!
हे. काहीही झालं तरी महापुरुषांच्या बाजूला पंतप्रधानांचा फोटो नकोय, असे ते म्हणाले आहेत. आपल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर सर्वात मोठी भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवून टाका, अशी मागणी त्यांनी केली.

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सण-उत्सवाच्या काळात लावले जाणारे डीजे, होणारा गोंगाट यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रत्येकालाच सण-उस्तव हवे आहेत. पण कोणालाही गोंगाट नको आहे, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. एका प्रकारे त्यांनी डीजे बंदीला पाठिंबाच दिलाय. त्यांनी मोदींचा फोटो हटवण्याचेही समर्थन केले आहे. काहीही झालं तरी महापुरुषांच्या बाजूला पंतप्रधानांचा फोटो नकोय, असे ते म्हणाले आहेत. आपल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर सर्वात मोठी भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवून टाका, अशी मागणी त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वरील भूमिका घेतली. शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्हाच्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत ठाकरे यांच्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता शिंदे गटाकडून युक्तिवाद मांडला जातोय. यावरच बोलताना या खटल्याचा निकाल यायला वेळ लागणार असेल तर शिवसेना हे पक्षचिन्ह गोठवून टाकायला हवे, अशी जाहीर भूमिका ठाकरे यांनी घेतली.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
सध्या सत्तेत बसलेल्या राज्यकर्त्यांना सरकार चालवता येत नाही. आम्हाला आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळायला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. खरं म्हणजे या मागणीसाठी केस व्हायलाच नको होती. कारण बोगस पद्धतीने आमच्याकडून हे सगळं घेण्यात आलं, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.
म्हणून धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवायला पाहिजे
सगळे हातोडे आमच्याच डोक्यावर मारले जात आहेत. या खटल्यात एकूण चार वर्षे निघून गेले. दोन मोठ्या निवडणुका झाल्या. तिसरी निवडणूक महापालिकेची झाली. चौथी निवडणूक जिल्हा परिषदांची झाली. तारीख पे तारीख असं सुरू आहे. कोणत्याही कारणास्तव निकालाला वेल लागणार असेल तर तत्काळ धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवून टाका, अशी मागणी आम्ही केली आहे. या चिन्हाचाच दुरुपयोग करून त्यांनी सत्ता मिळवली. त्यांनी गैरकारभार केले आहेत. त्याला अगोदर पायबंद घातले पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असं ठाकरेंनी स्पष्ट केलं.