शिवसेनेचं चिन्ह आपल्यालाच मिळणार, जर नाही मिळालं तर…, बैठकीमध्ये ठाकरेंचं मोठं विधान

आज शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे, शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीत बोलताना पक्षाच्या चिन्हाबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

शिवसेनेचं चिन्ह आपल्यालाच मिळणार, जर नाही मिळालं तर..., बैठकीमध्ये ठाकरेंचं मोठं विधान
Uddhav Thackeray
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 01, 2026 | 3:41 PM

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या उठावानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, पक्षात दोन गट पडले, एक म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि दुसरा शिवसेना ठाकरे गट. परंतु एकनाथ शिंदे यांनी पक्षातून उठाव केल्यानंतर त्यांना पक्षातील संख्येनं जास्त आमदारांचा पाठिंबा मिळाल्यामुळे निवडणूक आयोगाकडून पक्षाचं चिन्ह आणि नाव देखील शिवसेना शिंदे गटालाच देण्यात आलं होतं.  पक्षाचं चिन्ह आणि नावावरील दाव्यासंदर्भात 2022 पासून सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे. यावर नुकतीच सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी यावेळी न्यायालयात शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडली, दरम्यान पक्षाच्या चिन्हा संदर्भात यावेळी सुप्रीम कोर्टाकडून काही विधानं करण्यात आली, त्यानतंर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षांचे सर्व जिल्ह्यांचे प्रमुख तसेच विधानसभा मतदारसंघाच्या संर्पक प्रमुखांची बैठक बोलावली होती.

या बैठकीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी चिन्ह आपल्यालाच मिळेल, आणि नाही मिळालं तर ते गोठवलं जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.  शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख, तसेच विधान सभा मतदारसंघाचे संर्पप्रमुख यांची ऑनलाईन बैठक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवन येथे पार पडली. सुप्रीम कोर्टात शिवसेना चिन्हाबाबत काल सुनावणी पार पडली होती. या पार्श्वभूमीवर बैठकीत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे, जर चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान  एसआयआरच्या प्रक्रियेकडे गांभीर्याने लक्ष द्या, अशा सूचनाही या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. ज्यांना काही कारणास्तव दिलेली जबाबदारी पार पाडता येत नसेल तर त्यांनी पद सोडावं, त्यांची जबाबदारी इतरांना दिली जाईल, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 2029 च्या निवडणुकीला 3 वर्ष उरली आहेत, निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देखील या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंकडून देण्यात आल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us