ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंप? सचिन अहिर नंतर आणखी बडा नेता सोडणार साथ? थेट आदित्य ठाकरेंनाच झटका?
उद्धव ठाकरे यांच्या गटाला एका मागून एक मोठे धक्के बसताना दिसत आहेत. आता सचिन आहिरनंतर अजून एक मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. थेट मोठी सुरंग ठाकरे गटाला लागताना दिसत आहे.

उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांनी फोडले. ज्यानंतर मोठा धक्का थेट उद्धव ठाकरे यांना बसला. 6 खासदारांनंतर थेट 1 आमदारानेही एकनाथ शिंदे यांचा हात पकडला. विधान परिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुकीसाठी थेट सचिन आहिर यांचा अर्ज महायुतीकडून दाखल करण्यात आला. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला उपसभापतीची जागा सुटली. ज्यानंतर काही नावांची जोरदार चर्चा रंगताना दिसली. थेट सचिन आहिर यांना संधी देण्यात आली. हा उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आदित्य ठाकरेंना मोठा धक्का होता. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे सेनेतील विधान परिषदेतील आमदार सुनील शिंदे आणि काही नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सचिन आहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे नेते मानले जातात. त्यांनीच ठाकरे गटाची साथ सोडल्याने ठाकरे गट अलर्ट मोडवर आहे. सतत धक्के ठाकरे गटाला बसत असताना आता आमदार सुनील शिंदेही साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. त्यामध्येच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. फक्त सुनील शिंदे हेच नाही तर इतर आमदार बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील शिंदे यांच्यात ठाकरे गटातील 11 आमदारांचा एक गट एकाच वेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. तशी तयारी आणि प्लॅनिंग सध्या सुरू आहे. त्यात सुनील शिंदे हे देखील आहेत. खासदारांनंतर आता मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे आमदारही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे.
खासदारांनंतर आमदारही बंडखोरीच्या तयारीत आहेत. सचिन आहिर यांनी पक्षाची साथ सोडल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची त्यांना संधी मिळतंय. आता सुनील शिंदेंसोबत इतर नक्की कोणते आमदार बंडखोरी करणार यावर जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. कालच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. त्यानंतर 11 आमदारांच्या बंडखोरीची बातमी पुढे येतंय.