AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! मी पक्ष सोडलाच नाही, सचिन अहिर यांचे धक्कादायक विधान; नेमकं काय म्हणाले?

सचिन अहिर यांनी वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. मी पक्ष सोडला नाही. तांत्रिक मुद्द्यावर वेगळ्या व्यासपीठावर बोलू. मला उपसभापतीपदाची जबाबदारी दिलेली आहे. हा माझा बहुमानच आहे. या पदाचा मान टेवून मी भविष्यात काम करणार आहे, असे सचिन अहिर म्हणाले आहेत.

सर्वात मोठी बातमी! मी पक्ष सोडलाच नाही, सचिन अहिर यांचे धक्कादायक विधान; नेमकं काय म्हणाले?
sachin ahir and uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 30, 2026 | 3:41 PM
Share

Sachin Ahir Join Eknath Shinde Shivsena : उद्धव ठाकरे यांच्या सहा खासदारांनी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता ठाकरेंना आणखी एक जबर धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाचे विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यांना शिंदे गटाकडून लवकरच विधानपरिषदेचं उपसभापतीपद दिलं जाणार आहे. शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. दरम्यान, सचिन अहिर हे यापुढे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे काम करणार आहेत. शिंदे यांची शिवसेना पुणे, मुंबई तसेच संपूर्ण महाराष्ट्रात कशी वाढेल, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे अहिर यांनी जाहीरपणे सांगितले आहे. अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूला बसून याबाबतची घोषणा केलेली आहे. तसेच मी पक्ष सोडलाच नाही, असं आश्चर्यकारक विधान केलंय. विशेष म्हणजे अहिर यांच्या या विधानानंतर एकनाथ शिंदे यांनीदेखील केलेल्या विधानानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. याआधी ठाकरे यांच्या पक्षाचे काम करणाऱ्या अहिर यांनी पक्ष सोडला नसेल तर मग ते शिंदे यांच्या पक्षाचे काम कसे करणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?

पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांनी वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. मी पक्ष सोडला नाही. तांत्रिक मुद्द्यावर वेगळ्या व्यासपीठावर बोलू. मला उपसभापतीपदाची जबाबदारी दिलेली आहे. हा माझा बहुमानच आहे. या पदाचा मान टेवून मी भविष्यात काम करणार आहे, असे सचिन अहिर म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना, बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन शिंदे काम करत आहेत. एकनाथ शिंदे हे आकर्षण आहेत. खासगीत अनेक लोकप्रतिनिधींना विचारा ते याबाबत सांगतील. असा नेता आम्हाला साथ देणार असेल तर काम करता येते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तसेच काही लोकांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही ते आम्हला शिकवायला लागले तर कसं व्हायचं, असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला.

आम्हीच त्यांना मतदान केलं

अहिर यांच्या मी पक्ष सोडलेला नाही, या विधानावर नंतर एकनाथ शिंदे यांनीही भाष्य केले. ते जेव्हा आमदार झाले, तेव्हा आम्ही त्यांना मतदान केलेलं होतं. ते आमदार झाले तेव्हा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आमच्याकडे होता. आजही शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आमच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेना पक्ष सोडला वगैरे म्हणता येणार नाही, असा तांत्रिक मुद्दा एकनाथ शिंदे यांनी समजावून सांगितला. दरम्यान, आता सचिन अहिर यांची आमदारकी जाणार का? ठाकरे गटाकडून काय पावलं उचलली जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन, पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, पण... राम कदमांची टीका
Video : बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, त्यांच्यानंतर मात्र..., राम कदमांची ठाकरे बंधूंवर टीका