उद्धव ठाकरेंचं शरद पवारांना मोठं आवाहन, म्हणाले, मला बोलायला कमीपणा नाही, पण…

डिलिमिटेशन विधेयकावरून राजकारण तापल्याचे दिसत आहे. या विधेयकावरून चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना मोठं आवाहन केलं आहे.

उद्धव ठाकरेंचं शरद पवारांना मोठं आवाहन, म्हणाले, मला बोलायला कमीपणा नाही, पण...
udddhav thackeray news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 29, 2026 | 6:27 PM

इंडिया आघाडीतील काही घटक पक्षातील नेत्यांनी डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने सकारात्मक दृष्टीकोन दाखवल्याने खळबळ उडाली आहे. डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यास देशाला त्रासदायक ठरू शकतो, अशी भीती उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. तर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना देखील विधेयकाच्या विरोधात भूमिका घ्यावी, असं आवाहन केलं. ठाकरेंनी पवारांना यावेळी पुरोगामी विचारधारेची देखील आठवण करून दिली. तसेच मला देखील विधेयकासाठी कॉल आल्याचा गोफ्यस्फोट ठाकरेंनी केला.

मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे म्हणाले, मला पण जाता आलं असतं, पण मी पक्षाच्या हितापेक्षा राज्याचे आणि देशाचे हित महत्त्वाचे मानतो. शरद पवारांनी हा विचार करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी विचार करा.  ही घटनात्मक नाही तर दुर्घटनात्मक होत आहे. खासदारांचे मतदारसंघ तोडणार आणि दुसरा मतदारसंघ निर्माण करणार आहे.  त्यांच्याकडे शिबिर चिंतन मंथन चालतं, त्यांची सर्व तयारी आहे.  महाराष्ट्र उत्तर प्रदेशच्या पोटात जाईल, इतकी संख्या त्यांची वाढत आहे. मला बोलायला कमीपणा नाही ते अजूनही महाविकास आघाडीचे नेते आहेत.  दोन दगडावर पाय ठेवून चालता येणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही उशीर करू नका आणि तुम्ही हे विधायक थांबवा…तुम्ही विधेयकाच्या विरोधात मतदान करा उशीर होण्याआधी भूमिका घ्यावी.  महिला आरक्षणाच्या विरोधात आम्ही नाही’.

Loading...

डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘850 खासदारांना बोलायची संधी मिळणार का ती एक प्रकारे सभा झाली.  33 टक्के वाढणाऱ्या महिला आहेत. त्यांना तरी बोलण्याची संधी मिळणार का..अधिवेशन 4/5 महिने चालणार का? उद्या लोकसंख्या वाढत असल्यामुळे पंतप्रधान 3/4 वाढवणार का? त्यांच्याकडे पंतप्रधान पदासाठी रांग लागली आहे.  शरद पवार यांच्या विचारापेक्षा यामुळे देशाचे काय होणार हे महत्त्वाचं आहे.  हा खर्च करदात्यांच्या खिशातून होणार आहे. हा खर्च वाढवण्यापेक्षा जनतेच्या हितासाठी का वापरत नाही. त्यांच्या पगारावर करदात्यांचा पैसा  खर्च होणार आहे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us