
राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दाैऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट म्हटले की, शेतकऱ्यांना मदत केलेल्या पॅकेजची नेमकी काय मदत पोहोचली हे मी पाहणार आहे. सर्व आकडेवारी पुढे आहे, अभ्यास करत बसू नका, आमचे सरकारला स्पष्ट म्हणणे आहे, खरडून गेलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना माती द्या. मुळात म्हणजे कर्जमाफी झाली पाहिजे, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. आजही शेतकऱ्यांची तीच मागणी आहे. कर्जमुक्तीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला तर त्याला सरकारने जूनचा वादा केलाय. केंद्रीय पथक राज्यात नुकसानाची पाहणी करणार आहे. जर पुढच्या वर्षी जूनमध्ये कर्जमाफी होणार असली तर आतापर्यंत कर्जाचा डोंगर डोक्यावर असलेल्या शेतकऱ्यांनी हप्ते भरायचे की नाही? सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा चाललीये.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, राज्याकडून केंद्राला कोणताही प्रस्ताव गेल्याचे वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी एक विधान केले आहे की, कर्जमुक्ती केली तर बॅंकांचा फायदा होईल, म्हणून ही कर्जमाफी करत नाहीत. जूनमध्ये कर्जमाफी केली तर बॅंकांचा फायदा होणार नाही. त्यांचे अर्थशास्त्र चांगले आहे असे त्यांना वाटते. मग त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे. माझे स्पष्ट म्हणणे आहे की, मी मुख्यमंत्री असताना एकच अधिवेशन झाले नागपूरला.
त्यावेळी मी कोणत्याही संवाद न करता किंवा कोणीही मागणी न करता मी त्यावेळी कर्जमाफी केली होती. आता ती सिस्टीम लागली आहे. सर्व गोळा केलेली माहिती तशीच आहे, आम्ही ती गोष्ट अंमलात आणली होती. ती संपूर्ण सिस्टिम तशीच आहे. डेटा तसाच आहे. कर्जमुक्तीचा दुसरा टप्पा सरकारने का जाहिर करू नये? ते करू शकतात. कारण त्यांच्याकडे सर्व माहिती आहे सर्वकाही आहे. आम्ही कसे केले काय केले हे सर्व त्यांना माहिती आहे.
पुढे उद्धव ठाकरेंनी म्हटले, मी कुठेही गेलो की, लोक मला सांगतात साहेब तुम्ही हे केले. या सरकारला करता आले नाहीये. आम्ही हे केले होते हे लोक मान्य करतात. आता मी मराठवाड्याच्या दाैऱ्यावर हेच बघणार आहे की, पहिल्या टप्प्यातील हप्तांमध्ये शेतकऱ्यांना नेमकी काय मदत पोहोचली. शेतकऱ्यांच्या हातामध्ये नेमके काय पडले. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावेच लागेल, असे स्पष्टपणे उद्धव ठाकरेंनी म्हटले.