AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा यांना ‘या’ नेत्याचा थेट सवाल, ‘मागच्या सरकारबद्दल…’

राज्य मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगर येथे पार पडली. राज्याचे सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले. मात्र, यावरून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा यांना 'या' नेत्याचा थेट सवाल, 'मागच्या सरकारबद्दल...'
CM EKNATH SHINDE AND AJIT PAWARImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Sep 16, 2023 | 6:18 PM
Share

संभाजीनगर : 16 सप्टेंबर 2023 | मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगरमध्ये पार पाडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेतले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळावर पुन्हा टीका केली. त्यावरून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने पलटवार केला. हे सरकार मराठवाड्याच खून करत आहे अशी टीकाही या नेत्याने केली.

राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यसरकारवर घणाघाती शाब्दिक हल्ला केलाय. राज्यसरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेतली. मात्र, यातून केवळ फसव्या घोषणा केल्या. हे सरकार मराठवाड्याचा खून करत आहे अशी टीका त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा ग्रीड प्रकल्पाला पैसे दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ते काम केले होते. आता राज्यसरकारने 14 हजार कोटीची तरतूद केली. पण, सर्वेक्षणासाठी 50 कोटी खर्च करता येत नाहीत. सरकार फक्त थापा मारत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यात जलजीवन योजनेमध्ये किती टक्केवारी मिळते यामध्ये मंत्री आणि अधिकारी गुंतले आहेत. अधिकारी आणि मंत्री मिळून राज्यातील जनतेला देशोधडीला लावत आहेत. काही जुन्या घोषणाच पुन्हा नव्याने मांडल्या आहेत.

सरकारने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच दिले नाही. एनडीआरएफ आणि एचडीआरएफ निकष याबाबतचा उल्लेख सरकारने केला होता. पण, त्याचे पुढे काहीच झाले नाही. संभाजीनगर याचा पहिला उल्लेख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शासन निर्णय घेतला. पण, पुढे या सरकारने काहीच केले नाही असा आरोपही त्यांनी केला.

मराठवाड्यात दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, सरकार त्यावर काही बोलत नाही. राज्यात हे करंटे सरकार आल्यावरच आत्महत्या वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री उपमुख्यमंत्री होते. राज्य मंत्रीमंडळामध्ये होणारे निर्णय हे सर्व मंत्री यांच्या मान्यतेने घेण्यात येतात. मग, आता हेच गेल्या सरकारमधील मंत्री, उपमुख्यमंत्री मागच्या सरकारबद्दल कसे बोलतात? असा थेट सवाल त्यांनी केला. जालना शीड पार्कला जागा मिळवून देण्याचे काम सुभाष देसाई यांनी केले होते याची आठवणही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी करून दिली.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...