AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या सोप्या ट्रिक्स वापरा आणि फोनच्या फिंगरप्रिंटने ओपन करा लॅपटॉपचा लॉक

तुम्ही आता तुमच्या स्मार्टफोनच्या फिंगरप्रिटचा वापर करून तुमचा लॅपटॉप सहजरित्या अनलॉक करू शकता. यामध्ये लॅपटॉपवर फिंगरप्रिंट फीचर उपलब्ध असण्याचीही गरज नाही. चला तर मग लॅपटॉप अनलॉकच्या या खास ट्रिक्सबद्दल जाणून घेऊयात.

या सोप्या ट्रिक्स वापरा आणि फोनच्या फिंगरप्रिंटने ओपन करा लॅपटॉपचा लॉक
Laptop
| Edited By: | Updated on: Aug 27, 2026 | 3:37 PM
Share

आजच्या डिजिटल युगात भारतीय बाजारपेठेत अनेक लॅपटॉप उत्पादक त्यांचे लॅपटॉप फिंगरप्रिंट अनलॉक फीचरसह बाजारात आणत आहेत. पण पूर्वी ही फिचर सुविधा लॅपटॉपवर उपलब्ध नव्हती, त्यामुळे जुने लॅपटॉप वापरकरर्त्यांना या सुविधेचा लाभ घेता येत नव्हता. जर तुम्हाला तुमचा लॅपटॉप तुमच्या फिंगरप्रिंटने अनलॉक करायला असेल तर तुम्हाला लॅपटॉपमध्ये कोणत्याही फिंगरप्रिंट हार्डवेअर असण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या फिंगरप्रिंटचा वापर करून तो सहजपणे अनलॉक करू शकता.

हे करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये आणि लॅपटॉपमध्ये हे एक ॲप डाउनलोड करा. यामुळे तुमच्या स्मार्टफोनच्या फिंगरप्रिंटचा वापर करून दोन्हीपैकी कोणतेही उपकरण अनलॉक करणे सोपे होते. चला तर मग स्मार्टफोनच्या मदतीने लॅपटॉप कशा प्रकारे अनलॉक करू शकतो त्याबद्दल जाणून घेऊयात.

तुमच्या स्मार्टफोनवर हे ॲप डाउनलोड करा

तुमच्या स्मार्टफोनवरून तुमचा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर अनलॉक करण्यासाठी, गुगल प्ले स्टोअरवर Bio Unlock सारखे अनेक ॲप्स उपलब्ध आहेत. जसे की त ‘रिमोट फिंगरप्रिंट अनलॉक’ ॲप आहे. हे सर्व वापरकर्त्यांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. याच्या मदतीने तुम्ही कोणताही कॉम्प्युटर व लॅपटॉप फिंगरप्रिंटने सहजपणे लॉक करू शकता. शिवाय, लॅपटॉपमध्ये फिंगरप्रिंट फीचर असण्याची गरज नाही. तुम्ही ॲपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन लॉक करू शकता. महत्वाचे म्हणजे हे ॲप्स तुमच्या फोन आणि लॅपटॉपवर दोन्हींवर डाऊनलोड करणे आवश्यक आहे.

हे ॲप्स तुमच्या लॅपटॉपवर इन्स्टॉल करा. त्यानंतर ॲपद्वारे तुमचा स्मार्टफोन आणि लॅपटॉप कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला दोन्ही डिव्हाइस वाय-फाय किंवा ब्लूटूथसारख्या एकाच नेटर्वकशी कनेक्ट करणे आवश्यक आहे.

कनेक्ट केल्यानंतर तुमचा लॅपटॉप लॉक करा आणि तुमच्या मोबाईलमधील ॲप तपासा की त्यात तुमच्या लॅपटॉपचे किंवा कॅम्प्युटरचे नाव दिसत आहे की नाही.

त्यानंतर स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करून एकदा सर्व सेटिंग्ज झाल्यावर तुम्हाला ॲप उघडावे लागेल. त्यानंतर तुम्ही फोनच्या फिंगरप्रिंट सेन्सरला स्पर्श करून लॅपटॉप अनलॉक करू शकता. या ॲपमुळे महागड्या लॅपटॉपमधील फिंगरप्रिंट अनलॉक फीचर आता सामान्य लॅपटॉपवरही वापरता येते. यामुळे वारंवार पासवर्ड टाकण्याचीही गरज भासत नाही.

Follow Us
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?