AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav- Raj Thackrey : ठाकरे बंधूंची पुन्हा भेट, राज यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, पडद्यामागे काय घडतंय ?

शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. गणेशोत्सवा नंतर ही त्यांची दुसरी भेट आहे. संजय राऊत आणि अनिल परब देखील या भेटीला उपस्थित होते. ठाकरे बंधूंच्या या भेटीचा राजकीय अर्थ लवकरच स्पष्ट होईल असे मानले जात आहे. शिवसेना आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीची चर्चा जोरदार सुरू आहे.

Uddhav- Raj Thackrey : ठाकरे बंधूंची पुन्हा भेट, राज यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, पडद्यामागे काय घडतंय ?
उद्धव ठाकरे - राज ठाकरेंची पुन्हा भेट
| Updated on: Sep 10, 2025 | 12:52 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. त्यांच्या सोबत संजय राूत, अनिल परब हेही उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. गणेशोत्सवादरम्यान ठाकरे बंधूंची भेट झाली होती, त्यानंतर आज पुन्हा शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी राज व उद्धव यांची भेट होत आहे.

ठाकरे बंधूंची ही भेट अचानक नसून पूर्वनियोजित बैठक होती. दोन दिवसांपूर्वीच आजची बैठक ठरली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आगामी महापालिका निवडणुका आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वाची असून त्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. राजकीयदृष्ट्या ही भेट महत्वाची मानली जात आहे.

महिन्याभरात दुसरी भेट

ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र कधी येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येदेखील याबाबत उत्सुकता आहे. त्यातच आज शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासोबत राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. आता खऱ्या अर्थाने दोन राजकीय पक्ष एकत्र येण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू होऊ शकते.

मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका या दृष्टिक्षेपात आहेत, त्यासाठी अवघा तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे. अशावेळी सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी कसून सुरूल केली आहे. महायुती असो किंवा महाविकास आघाडीचे पक्ष असो, दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन महापालिका निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सविस्तर चर्चा केली.

उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे महापालिका निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र येणार आहेत, अशी स्पष्ट कल्पना उद्धव यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिली अशी माहिती समोर आली.

आज उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी दुसऱ्यांदा येत आहेत. गणेशोत्सवादरम्यान पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज यांच्या निवासस्थानी आले होते. अनेक कौटुंबिक कार्यक्रमात हे दोन्ही बंधू एकत्र पहायला मिळाले. मात्र आजची त्यांची भेट कौटुंबिक नसून राजकीय आहे, त्यात काय चर्चा होते आणि राजकीय पातळीवर या दोघांची युती कधी होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?