मोठी बातमी! ठाकरे बंधू अन् मुख्यमंत्री फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा, मुंबईत नेमकं काय घडतंय, चर्चेला उधाण
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आज एकाच मंचावर दिसणार आहेत. त्यापूर्वी या तीन्ही नेत्यांची बंद दाराआड चर्चा झाली असून, चर्चेला उधाण आलं आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस तसेच ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आज एकाच मंचावर दिसणार आहेत. कारण देखील खास आहे. ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त या नेत्यांची विशेष उपस्थिती असणार आहे. राज्यात पार पडलेल्या विविध निवडणुकांनंतर आता प्रथमच हे तीन नेते एकत्र येत असल्याने ते कार्यक्रमात नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा देखील झाली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. मात्र नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाहीये. ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने आता चर्चेला उधाण आलं आहे.
‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला राज्यातील या तीन दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. या पुस्ककाच्या माध्यमातून मराठी व्यंगचित्रकलेचा 100 वर्षांचा प्रवास उलगडणार आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी भाजपाचं समर्थन केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी भाजपविरोधात भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युती केली, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर आता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आल्याचं पहायला मिळणार आहे. त्यापूर्वी या तीनही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा देखील झाली आहे. नेमकी चर्चा काय झाली, हे अजून अस्पष्ट आहे.