नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस? ठाकरेसेनेच्या नेत्याचा खळबळजनक दावा; 38 गुन्ह्यांचा दाखला देत पासपोर्टवरूनही सवाल

Akhil Chitre On Nitesh Rane: नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस काढली होती, असा अखिल चित्रेंनी दावा केला आहे. पासपोर्टवरूनही त्यांनी सवाल उपस्थित केला आहे.

नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस? ठाकरेसेनेच्या नेत्याचा खळबळजनक दावा; 38 गुन्ह्यांचा दाखला देत पासपोर्टवरूनही सवाल
| Updated on: Oct 03, 2026 | 6:05 PM

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंकडून हा आरोप करण्यात आला आहे. यानंतर आता राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. एका कंपनीने नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस काढल्याचा चित्रेंनी आरोप केला आहे.

याबाबत बोलताना अखिल चित्रे म्हणाले की, जे पळून जातात त्यांच्या विरोधात अशी नोटीस काढली जाते. दिवान हॉउसिंग कंपनीने नितेश राणेंच्या विरोधात ही नोटीस काढली आहे. नितेश राणेंनी या कंपनीकडून कर्ज घेतले होते. त्यामुळे ते पैसे न देता देश सोडून जातील, अशी भीती कंपनीच्या मनात होती. म्हणून ही नोटीस काढली आहे. हे ७ एप्रिल २०२१ चे प्रकरण आहे. आता यावर नितेश राणेंनी खुलासा करावा, अशी मागणी यावेळी चित्रेंनी केली आहे.

Loading...

ते म्हणाले की, लुकआऊट नोटीस कुणाविरोधात काढली जाते, हे दाखवण्यासाठी मी हे कागदपत्र दाखवले आहेत. राणेंनी पासपोर्टचा अॅक्ट वाचावा. त्यांच्या वायफळ बडबडीने कुणाचा पासपोर्ट रद्द होत नाही. पण पासपोर्ट अशा व्यक्तींना मिळत नाही, ज्यांच्यावर गुन्हे जास्त असतात. नितेश राणेवर ३८ गुन्हे दाखल आहेत. काही गुन्हे गंभीर आहेत. असे असूनही त्यांना पासपोर्ट कसा मिळाला? कोणत्या कोर्टाच्या आदेशाने त्यांना पासपोर्ट दिला? कारण गुन्हा दाखल असल्यास पासपोर्टसाठी कोर्टाचे आदेश लागतात. हायकोर्टात जाऊन आदेश घ्यावा लागतो. तो त्यांनी घेतला आहे का? असा सवाल यावेळी चित्रेंनी उपस्थित केला आहे.

अखिल चित्रे म्हणाले की, नितेश राणेंनी या सगळ्याचे उत्तर द्यावे. रोज उठून ते वायफळ बडबड करतात. त्यांच्या बोलण्याला कशाचा आधार नसतो. त्यांच्यावर मालवणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ते जामीनावर बाहेर आहेत. दिशा सालियनच्या आईने राणेंविरोधात मालवणी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. ज्यात ते जामिनावर बाहेर आहेत की नाही हे सांगावं, असं चित्रेंनी सांगितलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us