
Uddhav Thackeray: शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के बसत आहे. कोकणातून पक्षाला सुरु झालेली गळती कमी बंद होत नाही. एकामागे एक नेते पक्ष सोडून जात आहे. काही दिवसांपूर्वीच राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर दापोलीतून माजी आमदार संजय कदम पक्ष सोडत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. दापोलीत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होता. त्यानंतर आता मालवणमधून शिवसेना ऊद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसत आहे.
मालवणमधून ठाकरे सेनेला भाजप मोठा राजकीय धक्का देत आहे. शिवसेना उबाठाचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगरसेवक मंदार केणी भाजपमध्ये जात आहे. बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक यतिन खोत, समाजसेविका तथा कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख सौ. शिल्पा यतिन खोत, माजी नगरसेविका दर्शना कासवकर, समाजेवक भाई कासवकर हे सर्व पक्ष सोडत आहे. या सर्वांचा मंगळवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवसेना उबाठाचे मुंबईतील माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी आज आपल्या हजारो शिवसैनिकांसोबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता कोकणात भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांना हा धक्का दिला आहे.
मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता भाजप प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा होत आहे. शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांना कोकणातून एकामागे एक धक्के बसत आहे. पक्षाला होणारी ही गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आमदार आणि खासदारांची बैठकही घेतली होती. त्यानंतर ही गळती थांबत नाही.