
“माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्रानंतर राज्यातील राजकीय पक्षांची एकजूट पहिल्यांदा झाली असेल. ही विरोधी पक्षांची एकजूट नाही. तर लोकशाहीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्यांची एकजूट आहे. मतचोरी करणाऱ्यांना सांगतो आज ठिणगी बघत आहात. या ठिणगीची आग कधी होईल सांगता येत नाही. तुमच्या बुडाला आग लागेल. शोलेत एक डायलॉग आहे. दूर गाव में बच्चा रोता है तो मां कहती है, सोजा नही तो गब्बर आयेगा. तसं सांगतो, सावध राहा. नाही तर अॅनाकोंडा येईल” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
“राजने डोंगरच उभा केला. तरीही निवडणूक आयोग ऐकत नाही. निवडणूक आयोग यांचा नोकर आहे. मी अॅनाकोंडा का म्हणतोय. यांची भूक थांबत नाही. आपला पक्ष, निशाणी चोरली. वडील चोरत आहेत. ते पुरत नाही म्हणून मतदान चोरी करत आहेत. सर्व आले. पण सत्ताधारी आले नाही” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
शौचालयातील लोकांची नावेही तपासा
“मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, तुम्ही आमचा पर्दाफाश करा. एकदाचं करूनच टाका. दूध का दूध पानी का पानी होऊ द्या. मुख्यमंत्री असं म्हणत आहेत. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना मतचोरी मान्य आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र एकवटला आहे. देशाला दिशा देत आहे. आपण पक्ष बाजूला ठेवून एकवटलो आहोत. आम्ही जे आता करत आहोत, मतदार यादीत नाव आहे की नाही तपासा. तुमच्या घरावर कुणाचे नाव तर नाही ना ते तपासा. शौचालयातील लोकांची नावेही तपासा” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘त्यावर खोटा फोन नंबर आहे’
“मी एक अर्ज दाखवतो. त्याखाली शेरा आहे. तो वाचतो. सदर अर्जाबाबत अर्जदार यांची भेट घेऊन सदर अर्जाची भेट घेऊन हा अर्ज आम्ही केला नाही. हा अभिप्राय मिळाला आहे. त्या आधारे अर्ज रद्द केला आहे. ज्याने अर्ज केला नाही, आपल्या नावाने ज्याने अर्ज केला तो अर्जदार आहे. हा अर्जदार आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. उद्धव ठाकरेंनाच हे माहीत नाही. त्यावर खोटा फोन नंबर आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.