AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी दोन्ही बाजुने आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. निकालानंतर काय परिस्थिती निर्माण होते आणि त्यानंतर कशी समीकरण जुळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक शंका उपस्थित केली आहे.

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?
| Updated on: Nov 12, 2024 | 6:35 PM
Share

Maharashtra assembly election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात मुख्य लढत ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आहे. पण प्रकाश आंबेडकर यांच्या एका दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाशी (भाजप) युती करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shiv Sena UBT) स्पष्टपणे भाजपशी जोडलेली दिसते.

वाशिममध्ये बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंची शिवसेना (शिवसेना यूबीटी) स्पष्टपणे भाजपशी जोडलेली दिसते. ते कोणत्या अटींवर पाठिंबा देत आहे, याचा खुलासा त्यांनी करावा. वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यात आले तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे खासदार संसदेत उपस्थित नव्हते.

शिवसेना (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, प्रचारासाठी यवतमाळला पोहोचल्यावर सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांची बॅग तपासली. पण ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांचे सामानही तपासणार का?, असा सवाल त्यांनी केला. यवतमाळमधील वणी येथे शिवसेना (यूबीटी) उमेदवार संजय देरकर यांच्या समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी याची माहिती दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा ते हेलिकॉप्टरने वणीला पोहोचले तेव्हा अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगा तपासल्या. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना त्यांची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे खिसे आणि ओळखपत्रे तपासण्यास सांगितले. आपण निवडणूक अधिकाऱ्यांवर नाराज नसल्याचे ठाकरे म्हणाले. मात्र, ‘तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडत आहात आणि मी माझी जबाबदारी पार पाडेन’, असे ते म्हणाले. ज्या पद्धतीने तुम्ही माझी बॅग तपासली, त्याच पद्धतीने मोदी आणि शहा यांच्या बॅगा तपासणार का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला 288 जागांवर मतदान होणार आहे. यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.