AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पुढच्या आंदोलनाची दिशा उद्धव ठाकरे ठरवणार, म्हणाले मी अभिजीतला फोन…, मोठी बातमी समोर

मोठी बातमी समोर येत आहे, अखरे धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

आता पुढच्या आंदोलनाची दिशा उद्धव ठाकरे ठरवणार, म्हणाले मी अभिजीतला फोन..., मोठी बातमी समोर
Uddhav ThackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 25, 2026 | 5:14 PM
Share

राज्यात नीट पेपर फुटीनंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सातत्याने नीट पेपर फुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी दिल्लीमधील जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारण्यात आलं, तब्बल एक महिना हे आंदोलन सुरू होतं. आंदोलकांच्या वतीने संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला, अखेर दबाव वाढत असल्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असून, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख  उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

गेले काही दिवस आपला देश अस्वस्थ आहे. याचं कारण सर्वांना माहीत आहे. मला पहिल्या प्रथम अभिजीत दिपके आणि देशातील सर्व तरुणांचं साहजिकच कौतुक आहे. त्यांना न घाबरता समर्थन देणाऱ्या पालकांचं देखील अभिनंदन. या देशातील तरुणांनी भयाच्या छायेतून काढलं आहे. काही ना काही दबाव देशातील जनतेवर टाकला जात होता. जणू काही या देशात लोकं शिल्लक राहिले नाही, आहे ती झुरळं आहेत, या प्रमाणे लोकांना वागवलं जात होतं. एक मच्छर साला हा संवाद आठवला. एका झुरळाने या सरकारला झुकवलं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. पुढच्या आंदोलनाची दिशा मी अभिजीतला सांगणार आहे. फोन लावतोय पण लागत नाही. जॅमर लागलं आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मुंबईत मोर्चा काढण्यात येणार होता, परंतु त्याआधीच आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे, त्यामुळे उद्या होणारा मोर्चा होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत होता, अखरे यावेळी बोलताना उद्याच्या मोर्चाबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे. उद्या मोर्चा होणार असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?
दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप
Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...