Kirit Somaiya| उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्याची लंका कोणत्याही क्षणी जळू शकते.. किरीट सोमय्यांनी काय दिला इशारा?

| Updated on: May 02, 2022 | 2:25 PM

ठाकरे परिवाराची बेनामी संपत्ती आता जप्त व्हायला लागलेली आहे. त्यामुळे त्यांची अस्वस्थता दिसत आहे. कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे घोटाळ्याची लंका जळू शकते, अशी भीती त्यांना आहे, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं.

Kirit Somaiya| उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्याची लंका कोणत्याही क्षणी जळू शकते.. किरीट सोमय्यांनी काय दिला इशारा?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः भाजपाची बुस्टर सभा चांगलीच गाजली. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारच्या घोटाळ्यांना आग लावण्याचं काम भाजप करणार आहे. भाजपाचे नेते आता अॅक्टिव्ह मोडवर असून कोणत्याही क्षणी ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांची लंका जळू शकते. याची भीतीही त्यांना वाटतेय, असं वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किरीट सोमय्याला घाबरून काहीही आरोप करत आहेत. कशालाही सोमय्याची बेनामी संपत्ती म्हणत आहेत. त्यामुळे आता खऱ्या घोटाळेबाजांवर कारवाई होणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.

घोटाळ्यांची लंका कधीही जळणार..

किरीट सोमय्या म्हणाले, ‘ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक क्षणी असे वाटत आहे त्याच्या घोटाळ्याच्या लंकेत हनुमान स्वतः येऊन आग लावणार आहे ठाकरे सरकारला भीती वाटणे ही स्वाभाविकच आहे. मंत्री जेलमध्ये आहेत. अनेक मंत्री बेलवर आहेत. ठाकरे परिवाराची बेनामी संपत्ती आता जप्त व्हायला लागलेली आहे. त्यामुळे त्यांची अस्वस्थता दिसत आहे. कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे घोटाळ्याची लंका जळू शकते, अशी भीती त्यांना आहे, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं.

‘उद्ध ठाकरेंचे आरोप भीतीमुळे’

शिवसेनेचे उद्धव ठाकरे रोज उठून सौमय्याला घाबरून काहीही आरोप करत आहेत.उद्धव ठाकरे सकाळी उठल्यावर हे जे सोमय्या ग्राऊंड आहे इथे भाजपची सभा होत आहे ते ग्राऊंड पण किरीट सोमय्या यांची संपत्ती असे वक्तव्य करून जेलमध्ये टाकण्याचा प्रयास करू शकतात…असे काल च्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्याचं सोमय्या म्ङणाले.

‘आता घोटाळेबाजांवर कारवाई होणार’

आता आग लावण्याचे काम म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्यांना आग लावण्याचे काम आणि घोटाळे बाजांवर कारवाई होणार ..आता आम्ही सर्वच जण ॲक्शन मोडमध्ये गेलो आहोत. आज देखील मी दिल्लीत एका वरिष्ठ नेत्यांशी बोललो. श्रीधर पाटणकर म्हणजे उद्धव ठाकरे यांचे साले त्यांच्या आणखी एका बेनामी कंपनीच्या संपत्तीची माहिती मी दिली आहे. पाठपुरावा करण्यासाठी मी गुरुवार आणि शुक्रवारी दिल्लीला जाणार आहे. आता आदित्य आणी तेजस ठाकरे , श्रीधर पटवर्धन यांच्या बेनामी कंपनी याच शेल कंपनीकडून आलेले पैसे.. हे आमचे टार्गेट आहे, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.