AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा

Mumbai LPG Gas Shortage: जनता अगोदरच गॅस टंचाईने हैराण आहे. त्यांच्या या अडचणीचा सायबर भामटे घेत आहेत. मुंबईत चार दिवसात या सायबर भामट्यांनी सर्वसामान्य लोकांना लाखोंचा गंडा घातला आहे. तुम्ही सुद्धा असा कॉल आला तर सतर्क राहा.

सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
गॅस तुटवड्याचा असाही फटका, सायबर भामटे सक्रियImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 13, 2026 | 1:04 PM
Share

Mumbai LPG Gas Fraud: इराण-इस्त्रायल युद्धा दरम्यान देशभरातून LPG गॅस टंचाईचे वृत्त समोर येत आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरात एलपीजी गॅस बुकिंग आणि सिलेंडर नेण्यासाठी एजन्सीबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. याच परिस्थितीचा काही सायबर भामट्यांनी फायदा घेतला आहे. गॅस टंचाईने नागरिक अगोदरच भयभीत झाले आहेत. त्यातच सायबर भामटे नागरिकांशी संपर्क करून गॅस कनेक्शन कट करण्याची भीती दाखवून गंडा घालत आहेत. आतापर्यंत मुंबईत चार दिवसांत 26 लाख रुपयांची लूट सायबर भामट्यांनी केली आहे.

LPG कनेक्शनच्या नावाखाली गंडा

सायबर गुन्हेगार आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचा तुटवडा, इराण-इस्त्रायल युद्धाचा फायदा उचलत लोकांना गंडा घालत आहेत. माहितीनुसार, हे सायबर ठग महानगर गॅस लिमिटेडचे अधिकारी असल्याचे भासवून फोन करत आहेत. तुमचे गॅसचे बिल थकलेले आहे आणि कनेक्शन आता कापणार असल्याची धमकी देत गंडा घालत आहेत. हे कनेक्शन वाचवण्यासाठी अगोदर 10-20 रुपये भरण्यास सांगितले जाते. त्यानंतर ‘mahanagar apk’ फाईल डाऊनलोड करण्यास सांगण्यात येते. त्यावर क्लिक करताच ग्राहकांच्या बँक खात्यातील रक्कम उडवण्यात येते.

4 दिवसात 26 लाख 43 हजारांचा गंडा

गेल्या चार दिवसात विले पार्ले, वडाळा सारख्या भागातून सायबर फसवणुकीच्या चार घटना समोर आल्या आहेत. यामध्ये ग्राहकांना आतापर्यंत एकूण 26 लाख 43 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. अनेक जण पूर्वीपासूनच गॅसच्या टंचाईने हैराण आहेत. त्याचा फायदा ही सायबर गँग उचलत आहे. सायबर भामटे सर्वसामान्य नागरिकांना निशाणा बनवत आहेत. त्यांच्या मेहनतीचा पैसा चोरत आहेत. बँकेतील रक्कमेवर डल्ला मारत आहेत.

दरम्यान महानगर गॅसने ग्राहकांना अशा सायबर भामट्यांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत क्रमांकावरच संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. तर ग्राहकांना कंपनी कोणत्याही प्रकारची लिंक डाऊनलोड करण्यास सांगत नसल्याचे म्हटले आहे. ग्राहकांनी अधिकृत नंबरशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले. तर सायबर भामट्यांपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार