Umesh Patil : राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहावरून उमेश पाटील घाबरले? रुपाली ढोंबरेंच्या आरोपावर म्हणाले, ‘मी कुणाच्या…’

राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहावर उमेश पाटील यांनी पुन्हा भाष्य केलं. यावेळी त्यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांच्या आरोपांचं खंडन केलं.

Umesh Patil : राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहावरून उमेश पाटील घाबरले? रुपाली ढोंबरेंच्या आरोपावर म्हणाले, मी कुणाच्या...
| Updated on: Aug 08, 2026 | 11:21 AM

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत अतंर्गत कलहाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादावर उमेश पाटील यांनी पोस्ट करत सुनेत्रा पवार आणि कुटुंबाला मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. परंतु उमेश पाटील यांनी पोस्टमध्ये थेट नाव घेऊन आरोप करणे टाळल्याचे पाहायला मिळालं. यावरून रुपाली ठोंबरे पाटील यांनी उमेश पाटील घाबरल्याचा दावा केला. त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांचा दावा खोडून कोणालाच घाबरलो नसल्याचे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

दादांच्या अंत्यविधीला 25 लाख लोक – उमेश पाटील 

रुपाली ढोंबरे पाटील यांच्या आरोपानंतर उमेश पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी उमेश पाटील म्हणाले, ‘मी कोणाला उद्देशून म्हटलं नाही. यात एक व्यक्ती असू शकत नाही. खरंतर अजितदादांच्या पवार कुटुंबावर प्रेम करणारी मोठी जनता आहे. दादांच्या निधनानंतर अत्यंविधीला 25 लाखांपेक्षा अधिक लोक जमा झाले होते. अजितदादांचा सारखा किती मोठा लोकनेता गेल्याचं समोर आलं. दादा गेल्यानंतर त्यांचं महत्व देशाला समजलं’.

दादांच्या कुटुंबाला मानसिक त्रास दिल्याचा उमेश पाटील यांचा आरोप 

‘दादांच्या कुटुंबातील सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांचं दैंनदिन जीवन वेगळं होतं. त्यानंतर त्यांचं आयुष्य 360 डिग्री आयुष्य बदललं. त्यानंतर सुनेत्रा पवारांकडे पक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आली. दादांचा इतका मोठा परिवार सांभाळण्याची जबाबदारी आली. त्यांनी त्यांचाबाबत कधीही विचार केला नव्हता. त्यांना थेटपणे जबाबदारी आली. सुनेत्रा पवार या महिला आहेत. राष्ट्रवादी आणि परिवाराला टार्गेट केलं जातंय. असं माहीत असतानाही राजकीय हेतूने संभ्रम निर्माण होईल, अशा पद्धतीने वातावण निर्मिती केले जात आहे, असा आरोप पाटील यांनी केला.

रुपाली ढोंबरे यांच्या आरोपांचं उमेश पाटील यांच्याकडून खंडन

‘उमेश पाटील कोणाच्या बापाला घाबरत नाही. उमेश पाटील हा अजितदादांचा कार्यकर्ता आहे. अजितदादा निडर होते. त्यांच्या दोन पावले उमेश पाटील निडर आहेत. महाराष्ट्रातील प्रस्थापितांना शिंगावर घेणारा कार्यकर्ता आहे. माझी पोस्ट कुणालाही उद्देशून नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us