AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar : ‘गुंगी गुडिया’ हिणवणाऱ्यांना सुनेत्रा पवारांनी दाखवून दिलं, भाजपचा शब्द डावलून घेतला मोठा निर्णय

काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला, त्यानंतर नुकतीच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी प्रशांत किशोर यांची भेट घेतली. भाजपला मात्र हे रुचले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sunetra Pawar :  'गुंगी गुडिया' हिणवणाऱ्यांना सुनेत्रा पवारांनी दाखवून दिलं, भाजपचा शब्द डावलून घेतला मोठा निर्णय
भाजपचा शब्द डावलून सुनेत्रा पवार यांनी घेतला मोठा निर्णय
| Updated on: Aug 07, 2026 | 9:15 AM
Share

विख्यात राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर ( Prashant Kishor) यांनी नुकतीच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची भेट घेतली. मुंबईतील देवगिरी येथील बंगल्यावर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांची प्रशांत किशोर यांच्याशी भेट झाली. तब्बल सहा तास त्यांची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात पक्षनेतृत्व बदला , तसेच राज्यसंघटनेत अमूलाग्र बदल करण्याची शिफारस देखील प्रशांत किशोर यांनी यावेळी केल्याचे समजते. काँग्रेसने नुकतीच सुनेत्रा पवारांवर टीका केली होती. ‘गुंगी गुडिया’ असं म्हणत काँग्रेसने त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं, या मुद्यावरूनही प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजप मात्र नाराज

मात्र सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे राजकीय गोटात खळबळ माजली असून भारतीय जनता पक्ष चांगलाच नाराज असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे महायुतीतल या दोन पक्षात काही यआलेबल नसून त्यांच्यात अतर्गंत मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाचा ज्याने पराभव केला, त्याच्याशी ( सुनेत्रा पवार यांनी) चर्चा करणं अयोग्य असल्याचं म्हणत भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर भाजपच्या महत्वाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली भेट घेतली होती, तेव्हाच भाजप कडून प्रशांत किशोर यांना काम देण्यात येऊ नये असा संदेश घेऊन आमदार प्रसाद लाड यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. मात्र हा मेसेजे मिळूनही, भाजपचा शब्द डावलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रशांत किशोर यांना पक्षाच काम देण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांची नाराजी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपच्या उमेदवाराचा केला होता पराभव

प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. मात्र ते नुकतेच बिहारच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आहेत. बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपच्या उमेदवाराला हरवलं. बिहारच्या भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजपला पराबवाचा सामान करावा लागल. भारतीय जनता पक्षाचे नीरज कुमार सिन्हा यांचा प्रशांत किशोर यांनी तब्बल 19 हजार 324 मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे बांकीपूरची जागा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या राजीनाम्यामुळं रिक्त झाली होती. त्यामुळे ज्याने भाजपच्या उमेदवाराला पराभूत केलं, त्याच्याशीच सुनेत्रा पवार यांनी चर्चा करणं, काम देणं भाजपला रुचलं नसून पक्षात चांगलीच नाराजी पसरली आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?