टवाळखोर बाईकस्वारांना नागपूर पोलिसांनी नाकाबंदीला जुंपलं, पुणे पोलिसांनी टी शर्ट उतरवले

संचारबंदी असूनही काही महाभाग उगाचच रस्त्यावर गाड्या आणून, (Unique punishment for violating curfew Nagpur ) पोलिसांचा ताण वाढवत आहेत.

टवाळखोर बाईकस्वारांना नागपूर पोलिसांनी नाकाबंदीला जुंपलं, पुणे पोलिसांनी टी शर्ट उतरवले

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी असूनही काही महाभाग उगाचच रस्त्यावर गाड्या आणून, (Unique punishment for violating curfew Nagpur ) पोलिसांचा ताण वाढवत आहेत. मात्र अशा महाभागांना पोलीस त्या त्या वेळी लाठ्यांचा प्रसाद देऊन माघारी धाडत आहेत. नागपूर पोलिसांनी अशा टवाळखोरांना अनोखी शिक्षा दिली. (Unique punishment for violating curfew Nagpur )

संचारबंदी असताना रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलीसांनी उन्हातच उभा करुन, त्यांच्याकडून नाकाबंदीचं काम करुन घेतलं. संचारबंदीत नागरिक रस्त्यावर फिरत असल्याने, पोलिसांवर येणारा ताण कळावा म्हणून रिकामे फिरणाऱ्यांना पोलिसांनी ही अनोखी शिक्षा दिली.

कोराडी नाका परिसरात बाहेर फिरणाऱ्या 8 ते 10 जणांना पकडून पोलिसांनी त्यांना नाकाबंदी करण्यासाठी उन्हात उभं केलं. रिकामटेकडे फिरणाऱ्यांना पोलिसांनी नाकाबंदी स्वयंसेवक बनवलं.

पोलिसांच्या या युक्तीची आणि सक्तीने करायला लावलेल्या देशभक्तीची चांगलीच चर्चा नागपुरात सुरु होती. या सर्व टवाळखोरांवर सर्व कायेदशीर कारवाई केल्यानंतर, नाकाबंदीच्या कामाला जुंपलं.

पुण्यात टी शर्ट काढून तोंडाला बांधलं तिकडे पुण्यात बाईकवरुन उगाचच फेरफटका मारणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. तरुणांच्या तोंडाला मास्क किंवा रुमाल नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना टी शर्ट काढायला लावून, तोंडाला बांधायला लावलं.

जे विनाकारण फिरतायत, अशा नागरिकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात जवळपास 180 ठिकाणी नाकाबंदी केली असून सर्व वाहनाची चौकशी करुन त्यांना सोडलं जात आहे. मात्र जे नागरिक विनाकारण गाड्यावरून फिरत आहे अशा जवळपास शंभरहून अधिक जणांवर कलम 144 अंतर्गत कायद्याच उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी कारवाई केलीय.

संबंधित बातम्या 

EXCLUSIVE | विनंती झाली, आता हिसका दाखवा, गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI