Bhiwandi Traffic Jam: खड्ड्यांमुळे भिवंडी ठाणे बायपास रोडवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी; तब्बल 6 किमी पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

| Updated on: Jul 12, 2022 | 4:40 PM

भिवंडी : खड्ड्यांमुळे वाहतूकीचा खेळ खंडोबा झाला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे-भिवंडी महामार्गावर खड्ड्यांमुळे( potholes) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक तासांपासून वाहनांची वाहतूक अतिशय संथगतीने होत आहे. तब्बल 6 किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जवळपास चार तासांपासून अधिक वेळ ही वाहतू ककोंडी झालेली आहे. शेकडो वाहन चालक या वाहतूक कोंडीत अडकून पडले आहे. […]

Bhiwandi Traffic Jam: खड्ड्यांमुळे भिवंडी ठाणे बायपास रोडवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी; तब्बल 6 किमी पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा
Follow us on

भिवंडी : खड्ड्यांमुळे वाहतूकीचा खेळ खंडोबा झाला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे-भिवंडी महामार्गावर खड्ड्यांमुळे( potholes) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक तासांपासून वाहनांची वाहतूक अतिशय संथगतीने होत आहे. तब्बल 6 किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जवळपास चार तासांपासून अधिक वेळ ही वाहतू ककोंडी झालेली आहे. शेकडो वाहन चालक या वाहतूक कोंडीत अडकून पडले आहे. एका बस चालकाने व्हिडिओ द्वारे भिवंडी ठाणे बायपास रोडवर( Bhiwandi-Thane bypass road ) रस्त्यावरील खड्ड्यांची व्यथा मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली आहे. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास मार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आहे. खारीगाव टोल नाका ते येवई येथ पर्यंत तब्बल 6 किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. खड्डयांमुळे वाहतुकीला ब्रेक लागला असून वाहतुक कोंडी झाली आहे.
या वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना देखील मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. संपूर्ण मार्गावर अनेक वाहने अंत्यत संथगतीने पुढे सरकत आहेत. त्यामुळे बराच काळ एकाच जागी नागरिकांना अडकून रहावे लागले आहे. अशामध्ये तातडीची काम असणारे नागरिक चिंतेत सापडले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) साहेब भिवंडी अक्खी खड्यात गेली हो, जरा लक्ष द्या, लोकांना खूप ताप होतो. या खड्यामुळे किती लोकांना त्रास होतो. त्यामुळे खड्डे बुजवा आणि लोकांचा त्रास कमी करा अशी मागणी एका बस चालकाने केली आहे. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

ठाणे ते भिवंडी महामार्ग अक्षरश: खड्ड्यात गेला आहे. वाहनचालकांना खड्डयातूनच मार्ग काढावा लागत आहे. खड्डयांची समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक आंदोलनं झाली. मात्र ज्या दिवशी आंदोलन केली जातात दुसऱ्या दिवशी बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्तीची काम केल जाते. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे पुन्हा काही दिवसांतच हा रस्ता पुन्हा खड्ड्यात जातो.

मागील सात वर्षांपासून एकनाथ शिंहे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आता नुकताच त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्याने भिवंडीच्या रस्त्यावरील खड्यांची समस्या सोडवावी अशी मागणी या बस चालकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केली आहे.

फक्त याच नाही तर राज्यातील अनेक महामार्गांची खड्डयांमुळे चाळण झाली आहे. महामार्गाची ही अवस्था असताना केवळ ग्रामीण भागातच नारही तर शहरी भागात देखील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे.