खाली खोल दरी आणि वर अभेद्य कडा, अख्खी रात्र तो जीवमुठीत धरुन होता..अखेर
जीव धोक्यात असल्याची जाणीव असूनही कोणताही पर्याय नसल्याने त्याने स्वतःला सावरत सकाळ होण्याची वाट पाहिली. तेवढ्या या परिसरातून जाणाऱ्या एका तरुणाला बचाव..बचाव असा क्षीण आवाज ऐकू आला....

पुण्याच्या राजगडातील कादवे डोंगरावर दीपेश फिरायला गेला होता. जंगलात फिरताना एका कड्यावर तो अडकला. खाली खोल दरी आणि वर अभेद्य कडा जायचे तरी कसे माघारी परतण्याची वाटही बिकट…अखेर रात्र झाली आवाज देऊन देऊन त्याचा घसा कोरडा पडला. रात्र झाल्यामुळे आजूबाजूला काहीच दिसत नव्हते. थंडी असूनही दीपेशला दरदरून घाम फुटला होता. भीतीच्या अशाच असहाय्य अवस्थेत दीपेशने मदतीसाठी जोरजोराने आवाज दिला परंतू कोणताही प्रतिसाद आला नाही. अखेर रात्रभर तो असाच तग धरुन पहाट होण्याची तो वाट पाहू लागला. अखेर सकाळ झाली आणि त्याला धीर आला…
दीपेश हा काल रात्री कादवे येथील डोंगरावर फिरण्यासाठी गेला होता. परतताना तो अंधार, जंगल आणि अवघड भूभागामुळे थेट कड्याच्या मध्यभागी अडकला. रात्र झाल्यामुळे आजूबाजूला त्याला काहीच दिसत नव्हते. भीतीच्या आणि असहाय्य अवस्थेत दीपेशने मदतीसाठी जोरजोरात आवाज दिला. मात्र रात्रीचा अंधार, दाट जंगल आणि निर्जन परिसर यामुळे त्याचा आवाज कोणापर्यंत पोहोचू शकला नाही.दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्या परिसरात असलेले स्थानिक नागरिक राहुल ठाकर यांना “बचाव… बचाव…” असा क्षीण आवाज ऐकू आला. परिस्थितीची गंभीरता ओळखून राहुल ठाकर यांनी वेळ न दवडता तात्काळ वेल्हा पोलीस स्टेशनला ही माहिती दिली. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले.
पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे दीपेश वाचला
माहिती मिळताच रेस्क्यू टीमचे उत्तम पिसाळ, अक्षय जागडे, वैभव जागडे यांच्यासह स्थानिक नागरिक राहुल ठाकर, दत्ता जागडे, संजय चोरघे, वैभव भोसले आणि तानाजी भोसले आणि पोलीस पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत कठीण आणि धोकादायक अशा डोंगराळ भागात योग्य समन्वय साधत, खबरदारीने कड्याच्या मध्यभागी अडकलेल्या दीपेश वर्मा याच्यापर्यंत पथक पोहोचले.
सुमारे काही तासांच्या प्रयत्नांनंतर दीपेशला कड्यातून सुखरूपपणे बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले.या संपूर्ण कारवाईदरम्यान प्रत्येक पावलावर जीव धोक्यात घालून मदत करणाऱ्या रेस्क्यू सदस्यांनी धैर्य,कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. बाहेर काढल्यानंतर दीपेशची प्राथमिक चाौकशी करून त्याला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

तरुणाला वाचवणारे रेस्क्यू टीमचे सदस्य
तरुणाला वाचवणाऱ्या रेस्क्यू टीमच्या सदस्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
या घटनेमुळे स्थानिक प्रशासन, पोलीस, रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थ यांच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला. कादवे परिसरात घडलेल्या या थरारक बचावकार्यात सहभागी सर्वांचे नागरिकांकडून कौतुक होत असून, डोंगराळ भागात फिरताना योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमचे अध्यक्ष तानाजी भोसले यांनी केले आहे.पुण्यातील कादवे (ता. राजगड) परिसरातील डोंगरावर अडकलेल्या तरुण दीपेश वर्मा (वय २१, रा. कुशीनगर, उत्तर प्रदेश) हा तरुण काल रात्री कादवे येथील डोंगरावर फिरण्यासाठी गेला होता. अंधारामुळे अवघड भूभागामुळे तो थेट कड्याच्या मध्यभागी अडकला होता. वर जाण्याचा मार्ग बंद आणि खाली खोल दरी असल्याने तो पूर्णपणे अडकून पडला होता
