Monsoon Update : या तारखेलाच महाराष्ट्रात धो धो पाऊस, जूनमध्ये मॉन्सूनचा पाऊस नाहीच, थेट आता..

Monsoon Update : जून महिन्याची 21 तारीख उजाडली आहे. मात्र, मॉन्सूनच्या पावसाचा अजिबात पता नाही. यादरम्यानच मॉन्सूनच्या पावसाबद्दल अत्यंत मोठी अपडेट पुढे येत आहे. अजून काही दिवस मॉन्सूनच्या पावसासाठी वाट पाहावी लागणार आहे.

Monsoon Update : या तारखेलाच महाराष्ट्रात धो धो पाऊस, जूनमध्ये मॉन्सूनचा पाऊस नाहीच, थेट आता..
Monsoon Update
| Updated on: Jun 21, 2026 | 7:44 AM

राज्यात मॉन्सूनच्या पावसाचा अजूनही काहीच पत्ता नाही. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला. विदर्भातील काही राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावणार आहे. पुढील काही दिवस राज्यात उष्णतेचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. मुंबईसह राज्यात मॉन्सून अद्याप दाखल झाला नाही. मॉन्सूनची वाटचाल ठप्प आहे. 8 जूनलाच कोकणासह राज्यातील काही भागात मॉन्सून दाखल झाला होता. मात्र, त्याची पुढे काहीच वाटचाल नाही. मॉन्सूनची काही प्रगती नसल्याने राज्यावर संकट आहे, पेरण्या रखडल्या आहेत. जमुई, सोलापूर, हरणई, हैद्राबाद, कोरापुट, भद्राचलम, रांची, फुलबनी या भागात मॉन्सूनची सीमा होती. पुढे सरकण्यासाठी मॉन्सूनला पोषक वातावरण मिळत नसल्याने तो एकाच ठिकाणी रखडला आहे.

अरबी समुद्रात मॉन्सूनची अजिबातच पुढे वाटचाल होत नसल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली. जून महिना पूर्ण कोरडा जाण्याचा अंदाज काही हवामान तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. जुलै महिन्यात मॉन्सूनचा पाऊस येऊ शकतो, असा अंदाज आहे. झारखंड, ओडिसा, तेलंगणा, बिहार या राज्यात आज मॉन्सून पुढे सरकण्याचा अंदाज आहे.

यंदा राज्यात पाऊस कमी होणार हे स्पष्ट आहे. मात्र, जून महिना संपत आला तरीही पावसाचा थांग पत्ता नाही. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आज हजेरी लावण्याची शक्यता आहे. मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळाले अवकाळी पावसालाही सुरूवात झाली. मॉन्सून 15 जूनलाच राज्यात दाखल होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आज 21 जून असूनही मॉन्सूनचा पाऊस आला नाही.

त्यामध्येच जून महिन्यात काही जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढत आहे. पाणी टंचाईचे मोठे संकट आहे. अनेक भागात पाणीकपात सुरू झाली. मॉन्सूनची स्थिती जैसे थेच आहे. जुलै महिन्यात राज्यभरात मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. यासोबतच एल निनोचे देखील संकट उभे आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला. त्याचाही परिणाम पावसावर होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us