AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हगवणे कुटुंबाला पोलिसांचा आणखी एक मोठा दणका, त्या प्रकरणात कारवाई

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे, आणखी एका प्रकरणात पोलिसांनी हगवणे कुटुंबावर कारवाई केली आहे.

हगवणे कुटुंबाला पोलिसांचा आणखी एक मोठा दणका, त्या प्रकरणात कारवाई
| Updated on: Jun 01, 2025 | 8:05 PM
Share

पुण्यातील विवाहित तरुणी वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, सासरच्या छळाला कंटाळून तीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे, या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, दीर सुशील हगवणे, पती शशांक हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना अटक केली आहे. वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद हे न्यायालयीन कोठडीत आहेत तर वैष्णवीचा सासरा आणि दीर हे सध्या पोलीस कोठडीत आहेत.

दरम्यान वैष्णवीचा पती शशांक हगवणेवर पोलिसांनी आता आणखी एका प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी हगवणेंचा जेसीबी जप्त केला आहे. प्रशांत येळवंडे यांची शशांक आणि त्याची आई लता हगवणे यांनी जेसीबी विक्रीच्या नावाखाली फसवणूक केली होती. ऍडव्हान्स आणि कर्ज फेडण्यासाठी दिलेले 11 लाख 70 हजार रुपये हगवणेंनी परत केले नाहीत. उलट प्रशांत येळवंडे यांनाच धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात म्हाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी हगवणेच्या घरातून जेसीबी जप्त केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण 

वैष्णवीचा पती शशांक हगवणे याने जेसीबीच्या व्यवहारामध्ये प्रशांत येळवंडे यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.  25 लाखांमध्ये जेसीबीचा सौदा ठरला होता, समोर आलेल्या माहितीनुसार प्रशांत येळवंडे यांनी शशांकला सुरुवातील पाच लाख रुपये दिले होते, त्यानंतर ते दर महिन्याला जेसीबीचा हाफ्ता भरण्यासाठी त्याला पन्नास हजार देत होते, मात्र शशांकने बँकेचा हाफ्ता भरला नाही, त्यामुळे बँकेनं जेसीबी जप्त केला, शशांकने जेसीबी सोडवला मात्र या प्रकरणात आपली 11 लाख 70 हजार  रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप प्रशांत येळवंडे यांनी केला होता, या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आता हा जेसीबी जप्त केला आहे.

निलेश चव्हाणच्या मैत्रिणीची चौकशी 

दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेल्या निलेश चव्हाणला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी नेपाळमधून अटक केलं होतं, त्याचं पहिलं लोकेशन त्याच्या एका घटस्फोटीत मैत्रिणीमुळे मिळाल्याची माहिती समोर येत आहे, या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या मौत्रीणीची चौकशी केली, मात्र  या प्रकरणाशी निलेशच्या मैत्रिणीचा संबंध नसल्याने तिला सोडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Follow Us
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?