
सध्या विरोधी पक्षाकडून निवडणूक आयोगावर वेगवेगळे आरोप होत आहेत. नुकताच दिल्लीत 200 ते 300 खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला होता. त्या बद्दल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांना पत्रकारांनी विचारलं. त्यावर ते म्हणाले की, “मी एवढच म्हणेन की, लोक निवडणूक आयोगाविरोधात लढायला उभे राहिले आहेत. हा एक चांगला संदेश गेला” छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 हजार दुबार नाव आढळून आली आहेत. अनेक मतदारसंघात दुबार नाव आहेत. त्यावर विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. याची कारण काय आहेत’
15 ऑगस्टला मटण, मांसविक्रीवर बंदी आहे, त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “दुर्देव म्हणीन मी, महानगरपालिका, नगरपालिका लोकशाहीच्या साला गप्प मारतात. लोकशाहीत लोकांनी त्या दिवशी काय खावं, काय खाऊ नये, हे हिटलरशाहीच अवशेष दिसू लागलेत. तेच डेंजर आहे. असं मी या ठिकाणी मानतो” प्रकाश आंबेडकर यांनी आज X या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्राची माहिती दिली.
प्रकाश आंबेडकर यांना कुठलं उत्तर मिळालं नाही?
“मी दोघांना पत्र लिहून निवडणुकीतील या फसवणुकीविरोधात संयुक्त लढाई लढण्याच निमंत्रण दिलं होतं. आज 14 ऑगस्ट आहे, मल्लिकार्जुन खर्गे किंवा राहुल गांधी यांच्याकडून अजून उत्तर आलेलं नाही” असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. याआधी प्रकाश आंबेडकर यांनी 16 जानेवारी 2025 रोजी मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिलेलं. त्यावेळी सुद्धा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्याविरोधात संयुक्त लढाई लढण्याचं निमंत्रण दिलं होतं. पण काँग्रेसकडून त्यावेळी सुद्धा त्यांना उत्तर मिळालं नव्हतं.
तुम्ही एक हस्तक्षेप अर्ज करा
“काँग्रेसकडे वेळ आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कायदेशीर लढाईत सहभागी व्हावं. तुम्ही एक हस्तक्षेप अर्ज करा. आम्हाला काही अहंकार नाही, कारण भारताची लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे” असं प्रकाश आंबेडकरांनी पत्रात लिहिलं आहे.
10 अगस्त 2025 को मेरे द्वारा राहुल गांधी को लिखे गए पत्र का हिंदी अनुवाद।
प्रिय श्री राहुल गांधी,
मैं आपको भारत निर्वाचन आयोग (ECI) द्वारा आयोजित चुनावों में विसंगतियों के खिलाफ एक सहयोगात्मक लड़ाई में आपके समर्थन का आह्वान करने के लिए लिख रहा हूँ। मैंने इस्से पेहले 16 जनवरी,…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 14, 2025
याचिका फेटाळताना कोर्टाने काय म्हटलेलं?
जून महिन्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची निवडणूक आयोगाविरोधातील याचिका फेटाळण्यात आली. मुंबई हाय कोर्टने त्यांची याचिका फेटाळली होती. विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतदानावर प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला होता. ही याचिका काल दिवसभर ऐकून आमच्या कामकाजाचा वेळ वाया गेला, असंही हाय कोर्टानं म्हटलं होतं.