कबुतरखान्याच्या वादात प्रकाश आंबेडकर तोडगा काढणार? अंजली दमानिया यांचं काय झालं बोलणं?
कोर्टाच्या आदेशानुसार कबुतरखाने बंद करण्यास सांगण्यात आलंय. मात्र, कोर्टाच्या या निर्णयाला जैन समाजाकडून जोरदार विरोध केला जातोय. हेच नाही तर त्यांच्याकडून आंदोलन देखील करण्यात आले. आता या प्रश्नाबद्दल आपली प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा झाल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले.

कोर्टाने कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यानंतर जैन समाज हा आक्रमक होताना दिसतोय. यावर अंजली दमानिया यांनी मोठे विधान केले. दमानिया म्हणाल्या की, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काल संध्याकाळी मी बोलले आहे आणि यातून तोडगा काढला जाईल. आता सरकारकडे प्रकाश आंबेडकर बोलून एक भेट घडवून देणार आहेत, जैन समाजाच्या डॉक्टरांची मुनींची.
पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, मला असं वाटतं की कुठेतरी हे आंदोलन करून काहीच साध्य होणार नाहीये. जैन समाज नेहमी शांत असा समाज आहे आणि आताच्या घटकाला त्यांना योग्य ती दिशा मिळत नाहीये. तर मला असं वाटतं की, जैन समाजाच्या अनेक ज्येष्ठ फिजिशियनकडून त्यांच्या मुनींना समज द्यावी. सरकारने हे घडवून आणावं असा आव्हान मी करते. कारण खरं कसं आहे की, या कबुतरांचे जे ट्रॅपिंग्स असतात त्यांनी अनेक आजार होतात म्हणजे फंगल इन्फेक्शन होतात, अनेक बॅक्टेरियल इन्फेक्शन होतात. मी पथोलॉजी लबाड्री 25 वर्ष चालवली. त्यामुळे बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन्सनी चेस्टवर किती परिणाम होतो हे माहिती आहे.
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद गेले असून त्यांनी अद्याप शासकीय बंगला सोडला नसल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. यावर बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले की, मला असं वाटतं की मलाबार हिलवर ज्यांचं वीरभवन नावाच्या बिल्डींगमध्ये 902 नंबरचा जो फ्लॅट धनंजय मुंडे यांचा आहे. जी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर आहे. मुलीच्या शिक्षणामुळे मला इथे राहावं लागतंय आणि म्हणून ते सातपुडा बंगल्यात आहेत.
हे सांगितलं जातंय मी सगळ्या माध्यमाला विनंती करते की, आज त्यांनी वीरभवन नावाच्या बिल्डिंगमध्ये 902 नंबरचा फ्लॅट कोणाचा आहे याची चौकशी करावी आणि ते लोकांपुढे आणावं म्हणजे हे खोटं किती बोलतात समोर येईल. एक तर त्यांच्या तब्येतीला काहीच झालं नाहीये. माध्यमांशी बोलताना म्हणतात मी फोनवर बोलत नाही पण तिथे सभा गाजवतात हे पदोपदी खोटं बोलणारी व्यक्ती आहे. सातपुडा बंगला हा शासकीय बंगला आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीत 15 दिवसात खाली हा झालाच पाहिजे.
त्यांच्यावर 42 नाही खर तर आतापर्यंत 46 लाख रुपये दंड देणं गरजेचे आहे. त्यांना असं वाटत असेल की मला मंत्रिपदावर परत घेतील…. तुम्हाला जर सरकारने घेतले तर त्याच्याविरुद्ध आम्ही लढू पण घेतलं तर ते पुढचे आहे, आताच्या घटकाला कायद्याप्रमाणे त्यांनी बंगला खाली करणे गरजेचे आहे. मी शासनाला नोटीसच पाठवणार आहे. तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याने यांना तिथे कंटिन्यू करून देतायेत. जर त्यांचा जवळपास एक फ्लॅट असला तर त्यांना कोणत्या कायद्याखाली तुम्ही तिथे राहू देताय, अशी आता लीगल नोटीस आजच पाठवणार आहे.
पुणे रेव्ह पार्टीवर बोलताना दमानिया म्हणाल्या की, मला असं वाटत होतं की याच्यात राजकारणाचा कुठेतरी वास येतोय पण आताच्या घटकेला त्यांच्या ज्या व्हिडिओज आणि फोटोज जे पोलिसांना सापडले तसं जर रूपाली चाकणकरांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं त्याच्यानंतर मला नाही वाटत त्यांचं कोणीही समर्थन केलं पाहिजे. अगोदर त्यांनी रेव्ह पार्टीवरून काही आरोप केली होती.
