AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसईत 108 वर्षाच्या आजीचा मोठ्या थाटामाटात वाढदिवस, अनोख्या बॅनरमुळं सगळीकडं चर्चा

रोजमेरी आजी ह्या 108 वर्षाच्या झाल्या असून, आजही त्यांचा वाढदिवस कुटुंबाकडून साजरा केला जात आहे. आजीला, आईला निरोगी आयुष्य लाभावे अशी प्रार्थना कुटुंबाकडून केली जात आहे.

वसईत 108 वर्षाच्या आजीचा मोठ्या थाटामाटात वाढदिवस, अनोख्या बॅनरमुळं सगळीकडं चर्चा
PalgharImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 09, 2023 | 12:13 PM
Share

पालघर : वसईत 108 वर्षाच्या आजीचा मोठ्या थाटामाटात वाढदिवस (grandma birthday viral) साजरा केला. वाढदिवसाला घरची सगळी मंडळी उपस्थित होती. वाढदिवसाच्या कुटुंबियांकडून लावलेल्या बॅनरमुळं (vasai viral banner) वाढदिवसाची अधिक चर्चा झाली. वसईच्या खरभाट,संडोर पेरिश मधील रोजमेरी (Rojmerry) या आजीचा 108 वा वाढदिवस तिच्या सर्व कुटुंबाने साजरा केला आहे. आजच्या समाजव्यवस्थेत आपली मुलं, पत्नी एवढेच विश्व घेऊन जगणाऱ्या कुटुंबासमोर वसईतील 108 वर्षांचा आजीचा वाढदिवस हा एक आदर्श असणार आहे एवढं मात्र निश्चित, विशेष म्हणजे वसईत सगळीकडे वाढदिवसाची चर्चा आहे.

झालेल्या आजीच्या वाढदिवसाला मुलं, मुली, लेकी, नातवंड, जावई, परतुंड अशा सर्वांनी आजीचे बॅनर लावून आपल्या घरात केक कापून हा वाढदिवस साजरा केला आहे. रोजमेरी टॉमस परेरा असे या आजीचे नाव असून, 8 मार्च 1915 रोजी या आजीचा वसईच्या माधोडी गावात जन्म झाला होता. 17 व्या वर्षी आजीचे लग्न झाले होते. लग्नानंतर आजीला 7 वर्षे मुलं झाली नव्हती. त्यानंतर मात्र तिला सलग 8 मुलं झाली. यात 2 जुळ्या मुलींचा जन्म झाला असल्याची माहिती रुबी मच्याडो यांनी दिली आहे.

Vasai 108 year old grand mother birthday banner 01

Vasai 108 year old grand mother birthday banner 01

रोजमेरी आजी ह्या 108 वर्षाच्या झाल्या असून, आजही त्यांचा वाढदिवस कुटुंबाकडून साजरा केला जात आहे. आजीला, आईला निरोगी आयुष्य लाभावे अशी प्रार्थना कुटुंबाकडून केली जात आहे.

Vasai 108 year old grand mother birthday photo 02

Vasai 108 year old grand mother birthday photo 02

पालघरमध्ये एका शिक्षकाने मागच्या चार दिवसांपुर्वी आपल्या दोन वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाला दोन लाख ६५ हजार रुपयांचा केक आणला होता. मुलाला वेरणा कार आवडत असल्यामुळे वेरणा कारची प्रतिकृती केकच्या माध्यमातून उभारण्यात आली होती. त्या वाढदिवसाचे फोटो सुध्दा सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले होते. त्याचबरोबर त्या वाढदिवसाला सुध्दा अनेक मान्यवर उपस्थित होते.

Follow Us
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल