‘डॉक्टर मारायच्या लायकीचे, त्यांच्याकडे कधी जाऊ नका!’ संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

| Updated on: Feb 28, 2022 | 10:23 PM

जेवढा शिकलेला माणूस तेवढा तो गाढव. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहेत. डॉक्टर ......खोर आहेत. डॉक्टर मारायच्या लायकीचे आहेत. त्यांच्याकडे कधीही जाऊ नका', असं वादग्रस्त आणि धक्कादायक वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

डॉक्टर मारायच्या लायकीचे, त्यांच्याकडे कधी जाऊ नका! संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य
Image Credit source: TV9
Follow us on

स्वप्निल उमाप, टीव्ही 9 मराठी, अमरावती : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. ‘कोरोनात (Corona) 105 टक्के लोक भीतीनेच मेले. जेवढा शिकलेला माणूस तेवढा तो गाढव. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहेत. डॉक्टर ……खोर आहेत. डॉक्टर मारायच्या लायकीचे आहेत. त्यांच्याकडे कधीही जाऊ नका’, असं वादग्रस्त आणि धक्कादायक वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे डॉक्टर संघटना (Doctors Association) आक्रमक होण्याची आणि नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

यापूर्वीही संभाजी भिडे यांनी कोरोना आणि मास्कबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे”, असं संभाजी भिडे म्हणाले होते. हातावरची माणसं उद्ध्वस्त होत आहेत. शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. लॉकडाऊनची गरज नाही. व्यसने वाढवायची, गांजा अफू दारु दुकाने वाढवायचं काम सुरु आहे, असं संभाजी भिडे म्हणाले होते. तसंच कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

शिवसेना आमदाराला मास्क काढायला लावला

संभाजी भिडे यांनी कोरोना आणि मास्कबद्दल हे वक्तव्य पहिल्यांदाच केलंय असं नाही. त्यांनी यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना आमदाराला मास्क काढायला लावला होता. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन झालं होतं. सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तोंडावर लावलेला मास्क त्यांनी काढायला लावला. यावेळी इतर कार्यकर्ते देखील विना मास्क आढळून आले होते.

आणि संभाजी भिडेंनी शिवी हासडली!

इतकंच नाही तर संभाजी भिडे यांनी मास्कबाबत बोलताना एकदा शिवी हासडली होती. “कोरोना हा रोग नाही. कोरनाने माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत. दारुची दुकाने उघडी त्याला परवानगी आणि कुठं काय विकत बसलाय त्याला पोलीस लाठी मारतात. काय चावटपणा चाललाय? हा नालायकपणा आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही. मी काही राजकीय माणूस नाही, माझ्यासारखी असंख्य लोक अस्वस्थ आहेत संपूर्ण देशात. हा मूर्खपणा सुरु आहे. कोरोना हा रोगच नाहीय. हा गां* वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं.

इतर बातम्या : 

उपोषणाचा निर्णय माझ्यासाठी ऐतिहासिक, संभाजीराजे म्हणतात मी फक्त कोल्हापूरपुरता नाही तर…

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण, काय म्हणाले कोश्यारी?