Vidyanand Bapat: तुमचं नेमकं काय दुखतंय? विद्यानंद बापट यांचा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल
Vidyanand Bapat To CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विद्यानंद बापट यांनी आता एक प्रश्न विचारला आहे. ते नेमके काय म्हणाले ते जाणून घ्या...

पुण्यातील गणेशोत्सवात डिजेबंदी या प्रकरणामुळे विद्यानंद बापट चर्चेत आले. काही लोकांनी त्यांचे समर्थन दाखवले तर काही लोकांनी असमर्थन केले. विद्यानंद बापट यांनी उपस्थित केलेल्या मुद्यासोबतच आणखी एका गोष्टीची चर्चा होते ती म्हणजे त्यांची भाषा.
मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व पाहता सगळ्यांनाच त्यांच्या मराठीची भुरळ पडली आहे. चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बापटांच्या मराठीचे कौतुक केले पण त्यांना काही सल्लाही दिला.
फडणवीस यांनी केलेल्या कौतुकावर विद्यानंद बापट म्हणाले की " भाषा हे साधन आहे, ते साध्य नाही. आपला मुद्दा मांडण्याचे आणि दुसऱ्यासोबत संवाद साधण्याचे ते एक माध्यम आहे. भाषेवर तुमचे प्रभुत्व असेल आणि त्याचा वापर तुम्ही योग्य ठिकाणी करत असाल तरच त्याला काही अर्थ उरेल. "
दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री म्हणाले, "दुसऱ्याला त्रास न होता तुम्ही तुमचा मुद्दा मांडायला हवा. म्हणजे दुसऱ्याच्या भावना दुखावणार नाही. पण भावना दुखतात म्हणजे यांना नेमकं काय झालं? नेमकं कुठं यांना दुखलं? डीजेमुळे होणाऱ्या त्रासामुळे लोकांचं डोके दुखते, ह्रदयाला त्रास होतो. तसे यांच्या भावना दुखल्यावर नेमके काय दुखते " असा खोचक टोला बापट यांनी लगावला आहे.
शिवाय बापटांच्या मराठीचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, " बापटांची मराठी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. ती समजून घेण्यासाठी मला त्यांच्याकडून ट्युशनच घ्यावी लागेल,"