AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी आमदार अमरसिंह पंडित यांना जीवे मारण्याचा कट? हल्ल्याच्या अर्धा तास आधी…, विजयसिंह यांच्या गौप्यस्फोटानं खळबळ

गेवराई नगर परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडलं, मात्र यादरम्यान शहरात जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं, दगडफेक, मारामारी, आणि काही गाड्या देखील फोडण्यात आल्या आहेत.

माजी आमदार अमरसिंह पंडित यांना जीवे मारण्याचा कट? हल्ल्याच्या अर्धा तास आधी..., विजयसिंह यांच्या गौप्यस्फोटानं खळबळ
विजयसिंह पंडित यांचे गंभीर आरोप Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 03, 2025 | 7:09 PM
Share

राज्यात काही ठिकाणी मंगळवारी नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं.  मतदान सुरू असताना काही ठिकाणी राडा झाल्याच्या घटना देखील समोर आल्या, दरम्यान गेवराईमधून मोठी बातमी समोर आली, ती म्हणजे  गेवराईत मतदान सुरू असतानाच  जोरदार राडा झाला आहे, दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि मारहाणीची घटना घडली आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे पीए अमृत डावखर यांना बेदम मारहाण करण्यात आली, सध्या त्यांच्यावर बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, दरम्यान  हा हल्ला माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे उर्फ त्रिंबक पवार यांनी केल्याचा आरोप अमृत डावखर यांनी केला आहे, अमरसिंह पंडित यांना मारण्याचा कट होता असा थेट आरोप अमृत डावखर यांनी केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान डावखर यांच्या प्रतिक्रियेनंतर आता आमदार विजयसिंह पंडित यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले विजयसिंह पंडित? 

काल नगरपरिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत असताना, गेवराईत दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि मारहाणीची घटना घडली होती. या दरम्यान पंडित यांच्या कृष्णाई या कार्यालयावर आठ ते दहा लोकांनी हल्ला करत अमरसिंह पंडित यांचे पीए डावखर यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणावर बोलताना विजयसिंह पंडित यांनी बाळराजे पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अमरसिंह पंडित यांची कट रचून हत्या करण्याचं माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू त्रिंबक पवार यांचं षडयंत्र होतं असा थेट गंभीर आरोप विजयसिंह पंडित यांनी केला आहे.  संघटित गुन्हेगारी करण्यात त्याचा हातखंडा आहे. हा सुनियोजित कट होता, अमरसिंह पंडित अर्ध्या तासापूर्वी तिथेच होते, असं विजयसिंह पंडित यांनी म्हटलं आहे.  अमरसिंह पंडित यांना आज जिवच मारू, त्यांना आज सोडायचं नाही, असं यावेळी बाळराजे पवार म्हणत होते, अमरसिंह पंडित इथे नाही तर आता तुला मारतो म्हणून त्यांनी डावखर यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणात उद्या सकाळी आम्ही   जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेणार आहोत, या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहोत, असं यावेळी आमदार विजयसिंह पंडित यांनी सांगितलं आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी