महादेव मुंडे हत्याप्रकरणात मोठं ट्विस्ट, वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार?

महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणात आता नवं ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे, महादेव मुंडे यांच्या पत्नीनं विष प्राशन केलं होतं, त्यांच्या भेटीसाठी आलेल्या विजयसिंह बांगर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

महादेव मुंडे हत्याप्रकरणात मोठं ट्विस्ट, वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार?
| Updated on: Jul 17, 2025 | 3:11 PM

महादेव मुंडे हत्याप्रकरणात आता मोठं ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केलं होतं, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपाचर सुरू आहेत, दरम्यान दुसरीकडे त्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले बांगर? 

महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत,  बुधवारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केलं होतं. त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आज पुन्हा एकदा विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची रुग्णालयात भेट घेतली. यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.

महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आय विटनेसला वाल्मिक कराड आणि प्रशासनातील टोळीने संपवलं आहे, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. तसेच वाल्मिक कराडने जेलमध्ये गेल्यापासून 42 सराईत गुन्हेगारांचा जामीन केला. ते सर्व सध्या बाहेर आहेत आणि वाल्मिक कराड हा जेलमधून बीड जिल्हा चालवत आहे. असा धक्कादायक आरोप विजयसिंह बांगर यांनी केला आहे. पोलीस प्रशासनासमोर हे मोठं चॅलेंज आहे, त्यांनी यामध्ये तळागाळापर्यंत तपास करावा अशीही मागणी विजयसिंह बांगर यांनी केली आहे.

वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार? 

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड जेलमध्ये आहे. दरम्यान त्यानंतर आता महादेव मुंडे हत्याप्रकरणात देखील त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. विजयसिंह बांगर यांनी हे आरोप केले आहेत. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आय विटनेसला वाल्मिक कराड आणि प्रशासनातील टोळीने संपवलं आहे, असा आरोप बांगर यांनी केला आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.