AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा अमेरिकेला पहिला सर्वात मोठा धक्का, करारादरम्यान थेट संदेश…

भारत आणि अमेरिकेतील संबंध कायम चांगले राहिले. मात्र, सध्या टॅरिफच्या मुद्द्यात दोन्ही देशातील संबंध तणावात आहेत. त्यामध्येच अमेरिकेने मोठा निर्णय घेत भारतावरील टॅरिफ कमी केला. यादरम्यान मोठी माहिती पुढे येत आहे.

भारताचा अमेरिकेला पहिला सर्वात मोठा धक्का, करारादरम्यान थेट संदेश...
India and America
| Updated on: Feb 05, 2026 | 8:43 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार मोठा विजय म्हणून साजरा करत आहेत. मात्र, एका नवीन अहवालात या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आली. शिवाय अमेरिका रशियाला अडकवण्यासाठी हे सर्वकाही करत असल्याचेही स्पष्ट आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याचा दावा अमेरिकाच करत आहे. नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार, मोदी सरकारने वॉशिंग्टनला स्पष्टपणे सांगितले, व्यापार करारावर करार होण्यासाठी ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या संपूर्ण कार्यकाळाची वाट पाहण्यास ते तयार आहेत. हा एक प्रकारे भारताने अमेरिकेला थेट मोठा धक्काच दिल्याचे बघायला मिळत आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यातील बैठकीचा अहवाल पुढे आला. या बैठकीत भारताने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

ही बैठक अशावेळी झाली, ज्यावेळी अमेरिका सतत भारतावर आरोप करत होती. अमेरिकेने भारतावर उच्च टॅरिफ लावला. अजित डोभाल यांनी रूबियो यांना म्हटले की, ट्रम्प त्याचे सहकारी भारताला घाबरू शकत नाहीत. भारत यापूर्वी अनेक कठीण काळातून गेलाय. त्यामुळे भारत त्यांच्या संपूर्ण अध्यक्षीय कार्यकाळाची वाट पाहण्यास तयार आहे. ज्याप्रकारे अमेरिका भारताला धमकावत होती, त्यादरम्यान अजित डोभाल हे थेट मैदानात उतरले.

भारतावरील टॅरिफ अमेरिकेने कमी केला ही वस्तू स्थिती नक्कीच आहे. पण यामागे अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. अमेरिकेने भारतावरील दंडात्मक टॅरिफ अजूनही कमी केला नाही. भारत आणि अमेरिकेत संबंध कायमच चांगले राहिले. मात्र, टॅरिफच्या मुद्द्यात दोन्ही देशांमधील संबंध ताणले. भारताने रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद केल्याचे नुकताच अमेरिकेने म्हटले.

अमेरिकेने केलेल्या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली. रशियानेही यावर आपली भूमिका मांडली. भारत आता या घडामोडींवर नक्की काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. जर भारताने खरोखरच रशियाकडून तेल खरेदी बंद केली तर भारतात तेलाच्या किंमतीत मोठी वाढ होण्याचीही शक्यता आहे. त्यामध्येच अजित डोभाल आणि मार्को रुबियो यांच्या बैठकीतील माहिती पुढे आली.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी