AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ, उबाठा गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरून काडतुसांचा मोठा साठा

महाराष्ट्रातील राजकीय वर्तळातून खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोळीबारांच्या घटनेत वाढ झाल्यावर पोलिसांनी मारलेल्या छाप्यात शिवसेना उबाठा गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरून काडतुसांचा मोठा साठा सापडला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ, उबाठा गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरून काडतुसांचा मोठा साठा
उद्धव ठाकरे
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 03, 2024 | 5:44 PM
Share

चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उबाठा गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरून काडतुसांचा मोठा साठा सापडला आहे. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे याच्या घरी पोलीस पथकाने संयुक्त कारवाई केली आहे. घरी 7.65 mm ची एकूण 40 काडतुसे सापडल्यामुळे पोलीस देखील चक्रावले आहेत. यासाठी शहरातील इंदिरानगर भागातील सहारे याच्या घरात 4 तास शोध अभियान राबविण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील गेले काही दिवस गोळीबारांच्या घटनात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अग्निशस्त्र आणि हत्यार विरोधी विशेष अभियान आरंभले आहे.

या अभियानांतर्गत सहारे यांना शस्त्रे विकण्यासाठी काही युवक येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विक्रांत सहारे याच्या घरावर धाड घातली. धाडीत एक तलवार, 1 मक्झिन आणि बेसबॉल बॅटसह, वाघनखे देखील जप्त करण्यात आली आहेत. सहारे याच्यासह शहराच्या बाबूपेठ भागातील रहिवासी असलेल्या निलेश पराते आणि अमोल कोलतवार नामक 2 विक्रेत्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

विक्रांत सहारे आणि कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. स्वतः पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन व वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाची माहिती घेतली. एवढ्या मोठ्या संख्येत काडतुसे सापडल्यावर पोलिसांना ही काडतुसे वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या शस्त्राचा माग काढावा लागणार आहे. उबाठा गटाच्या युवा सेना जिल्हाप्रमुख या पदावर असलेल्या विक्रांत सहारे याच्यावरील मोठ्या कारवाईने जिल्ह्यातील दहशतीच्या नेटवर्कविरोधातील नेमका मार्ग पोलिसांना सापडल्याची चर्चा आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना