Dilip Walse Patil: दिलीप वळसे पाटील आणि विश्वास नांगरे पाटलांमध्ये अर्धा तास खलबतं, महाधिवक्ता, सरकारी वकीलांचीही हजेरी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर एसटी कामगारांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अॅक्शनमोडमध्ये आले आहेत.

Dilip Walse Patil: दिलीप वळसे पाटील आणि विश्वास नांगरे पाटलांमध्ये अर्धा तास खलबतं, महाधिवक्ता, सरकारी वकीलांचीही हजेरी
दिलीप वळसे पाटील आणि विश्वास नांगरे पाटलांमध्ये अर्धा तास खलबतंImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 12:15 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर एसटी कामगारांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यासह पोलीस आयुक्तांबरोबर बैठका घेतल्या आहेत. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर झोन-2चे डीसीपी योगेश कुमार यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. आजही दिलीप वळसे पाटील यांनी सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre-Patil) यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केली. तसेच नांगरे पाटील यांना काही सूचनाही दिल्या आहेत. यावेळी राज्याचे महाधिवक्ता आणि सरकारी वकीलही उपस्थित होते. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते प्रकरणावर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. मात्र, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील मिळू शकला नाही.

मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे आज सकाळीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यावर आले. यावेळी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, विशेष सरकारी वकील प्रदीप घरतही दाखल झाले होते. त्याशिवाय पोलीस आयुक्त संजय पांडे, नवीन डीसीपी निलोत्पल, दिलीप सावंत बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.

सदावर्तेंवरील कारवाईबाबत चर्चा

तसंच सदावर्तेंना जामीन मिळू नये यासाठी कायदेशीर पुरावे योग्य पद्धतीनं मांडण्याबाबत चर्चा झाली. त्याशिवाय सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी वारंवार गृहमंत्र्यांवर आरोप करत आहेत. त्याबाबत काही कारवाई करता येते का याची कायदेशीर तपासणी करण्याबाबत चर्चा झाल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं.

दिलीप वळसे पाटलांच्या जोर बैठका

पवारांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी पवारांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेऊन चर्चा केली. या दोन्ही नेत्यांनी पत्रकारांना मोर्चा जाणार असल्याचं कळतं पोलिसांना का कळत नाही? असा सवाल वळसे पाटील यांना केल्याचं समजतं. त्यामुळे वळसे पाटील चांगलेच अडचणीत आले आहेत. पोलीस यंत्रणेच्या अपयशावर विरोधकच नाही तर सत्ताधारी आणि खुद्द स्वत:च्या पक्षातील नेत्यांकडूनच सवाल केला जात असल्याने वळसे पाटील यांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळे वळसे पाटील यांनी आत बैठकांवर बैठका घेऊन पोलीस दलाची झाडाझडती सुरू केल्याचं समजतं.

संबंधित बातम्या:

Sharad Pawar : पवारांच्या घरावरील राड्यानंतर विश्वास नांगरे पाटलांची मोठी कारवाई, झोन 2 चे DCP योगेश कुमार यांची उचलबांगडी

MNS Vasant More : अखेर वसंत मोरेंना राज ठाकरेंचा रिप्लाय! सोमवारी शिवतीर्थावर बोलावणे

Video Sharad Pawar | शरद पवार यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत, विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी, अमरावतीच्या दिशेने रवाना

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.