Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचे आज मतदान, राज्याच्या नजरा निकालाकडे..

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीची जोरदार चर्चा रंगताना दिसली. त्यातच आता आज मतदान होणार आहे. महायुतीमधील वाद यादरम्यान चव्हाट्यावर आली. त्यातच कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचे आज मतदान, राज्याच्या नजरा निकालाकडे..
Jalgaon DCC Bank Election
| Updated on: Nov 29, 2026 | 8:43 AM

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचे आज मतदान आहे. गेल्या काही दिवसांपासून या मतदानाची जोरदार तयारी केली जात आहे. काही जागा अगोदरच बिनविरोध झाल्या. ज्या जागा बिनविरोध झाल्या नाहीत, त्याकरिता आज मतदान होणार आहे. महायुतीमधील वाद पुढे आला. जळगावच्या नेत्यांनी या निवडणुकीसाठी बाजी लावली. गुलाबराव पाटील यांच्याकरिता ही निवडणूक अस्थित्वाची बनली आहे. त्यातच आज जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 21 जागांपैकी 12 जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित नऊ जागांसाठी आज मतदान होणार आहे. भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट प्रणित सहकार पॅनल समोर काँग्रेस आणि महाराष्ट्र शेतकरी संघटना प्रणित शेतकरी एकता पॅनलचे आव्हान आहे. 12 जागा बिनविरोध करून महायुतीने आधीच जिल्हा बँकेवर एक हाती सत्ता स्थापन केले आहे.

मुक्ताईनगर आणि चाळीसगाव येथे भाजप समोर शिंदे सेनेच्या उमेदवारांनी आव्हान दिल्याने चुरशीची लढत आहे.  मुक्ताईनगर या ठिकाणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे तसेच शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची तर चाळीसगावमध्ये भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

Loading...

आमदारांच्या वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोपामुळे नाराजीमुळे जिल्हा बँक निवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. 9 जागांसह प्रतिष्ठेच्या लढती असलेल्या मुक्ताईनगर आणि चाळीसगावात कोण बाजी मारत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रक्षा खडसे या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यात बरेच मोठे नाराजीनाट्य देखील यादरम्यान बघायला मिळाले. या निवडणुकीत नक्की काय होते, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

जळगावमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या उमेदवारीवरुन शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील, त्यांचे सुपुत्र सुमित पाटील विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यामध्ये जोरदार सामना रंगला आहे. अशातच आता किशोर पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्याविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us